निम्म्यापेक्षाही कमी महिलांची ई-केवायसी पूर्ण; 2.40 कोटींपैकी 80 लाख बहिणींनी केली पूर्ण (फोटो - सोशल मीडिया)
महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर यासंबंधित पूर्ण माहिती दिली आहे. मंत्री आदिती तटकरे यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन संपूर्ण ई-केवायसीची प्रक्रिया समजून सांगण्यात आली आहे. या सर्व सूचनांप्रमाणे ई-केवायसी केल्यानंतर पात्र महिलांचा अर्ज आणि योजनेचा लाभा कायम राहणार आहे. यामध्ये कोणतीही चूक झालास मात्र योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय आहे ई-केवायसी प्रक्रिया?
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC साठी
https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
मुखपृष्ठावर असलेल्या e-KYC बॅनरवर क्लिक केल्यावर e KYC फॉर्म उघडेल.
या फॉर्ममध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करून, आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत Send OTP या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर लाभार्थ्याच्या आधार-लिंक मोबाईल क्रमांकावर OTP येईल. हा OTP टाकून Submit बटणावर क्लिक करावे.
यानंतर प्रणाली तपासेल की लाभार्थ्याची KYC आधीच पूर्ण झाली आहे की नाही.
* जर आधीच पूर्ण झाली असेल, तर “e-KYC आधीच पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.
* जर पूर्ण झाली नसेल, तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासले जाईल.
जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल, तर पुढील टप्प्याला जाता येईल.
यानंतर लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करावा. संमती दर्शवून Send OTP वर क्लिक करावे. OTP संबंधित मोबाईलवर प्राप्त झाल्यावर तो टाकून Submit बटणावर क्लिक करावा.
महाराष्ट्रासंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्यानंतर लाभार्थ्याला आपला जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील बाबी प्रमाणित (Declaration) कराव्या लागतील:
शेवटी, “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.






