Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलला आमदार शिवेंद्रराजे भोसलेंकडून ५ लाखांचं बक्षीस

महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावलेल्या मल्लाकडून अशा पद्धतीने नाराजी व्यक्त होणे सातार्‍याच्या संस्कृतीला शोभणारे नाही. मला स्वतःला सातारकर म्हणून या विषयाची खंत वाटली. असं ते म्हणाले.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 11, 2022 | 09:53 AM
महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलला आमदार शिवेंद्रराजे भोसलेंकडून ५ लाखांचं बक्षीस
Follow Us
Close
Follow Us:

सातारा : महाराष्ट्र केसरीची गदा पटकावलेल्या १९ वर्षीय पृथ्वीराज पाटीलला स्पर्धा आयोजित केलेल्या संयोजकांकडून १ रुपयांचीही मदत न मिळाल्याची खंत असलेला पृथ्वीराजचा व्हिडीओ पाहिल्यानंतर सातारा- जावलीचे आमदार व अजिंक्य उद्योगसमुहाचे प्रमुख शिवेंद्रराजे भोसले यांनी तातडीने पृथ्वीराजला सातारा- जावलीकरांच्यावतीने ५ लाख रुपयांची रोख रक्कम जाहीर केली आहे.

या संदर्भात बोलताना शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, महाराष्ट्र केसरी ही कुस्तीची अजिंक्यपद स्पर्धा सातार्‍यात आयोजित करण्यात आली होती. खरंतर राजधानी सातार्‍यात ही स्पर्धा होत असल्याने या स्पर्धेत सर्वांना सामावून घ्यायला हव होतं. मात्र, तसे घडले नाही याउलट ज्याने अत्यंत कष्टाने महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावला त्याचाच व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये आपल्याला संयोजकांनी फक्त महाराष्ट्र केसरीची गदा दिली. याव्यतिरिक्त कोणतेही बक्षीस दिले नाही, अशी खंत पृथ्वीराज पाटील व्यक्त करताना दिसत आहेत. महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावलेल्या मल्लाकडून अशा पद्धतीने नाराजी व्यक्त होणे सातार्‍याच्या संस्कृतीला शोभणारे नाही. मला स्वतःला सातारकर म्हणून या विषयाची खंत वाटली. संयोजकांनी प्रायोजकांच्या माध्यमातून घेतलेले पैसे मग गेले कुठे? असा सवाल अनेक मल्ल आता विचारू लागले आहेत. जिल्हयातून व राज्यातून या महाराष्ट्र केसरीसाठी अनेकांनी मदत दिली आहे. जर महाराष्ट्र केसरीलाच ही मदत मिळालेली नसेल तर या मदतीचे पुढे काय झाले? असा प्रश्न माझ्यासह अनेकांना पडला आहे. त्यामुळेच पृथ्वीराजच्या नाराजीची दखल घेऊन सातारा- जावलीकर म्हणून मी तातडीने माझ्यावतीने महाराष्ट्र केसरी विजेता पृथ्वीराज पाटील यांना ५ लाख रुपयांची रोख रक्कम जाहीर करीत आहे. ही रक्कम आम्ही तातडीने पृथ्वीराजला देत आहोत, असेही आमदार शिवेंद्रराजे यांनी जाहीर केले.

[read_also content=”अभिनेते आणि पटकथा लेखक शिव सुब्रमण्यम यांचं निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास https://www.navarashtra.com/movies/actor-and-screenwriter-shiv-subramaniam-dies-in-mumbai-nrps-267269.html”]

Web Title: Maharashtra kesari prithviraj gets rs 5 lakh from mla shivendra raje bhosale

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2022 | 09:47 AM

Topics:  

  • Maharashtra Kesari
  • MLA Shivendra Raje Bhosale

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.