Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारामतीत आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा; महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखची हरियाणाच्या भोला ठाकूरवर मात

चौथी लढत जागतिक विजेता शिवा चव्हाण विरुद्ध सतपाल सोनटक्के यांच्यात झाली. या लढतीत शिवाजी चव्हाणने डोळ्याचे पारणे फेडणारी कुस्ती करून सतपाल सोनटक्के वर विजय मिळविला.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 07, 2025 | 02:35 AM
बारामतीत आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा; महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखची हरियाणाच्या भोला ठाकूरवर मात

बारामतीत आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा; महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखची हरियाणाच्या भोला ठाकूरवर मात

Follow Us
Close
Follow Us:

बारामती: शहरातील शारदा प्रांगण बारामती येथे आंतरराष्ट्रीय निकाली कुस्त्यांच्या मैदानात महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याने हरियाणा केसरी भोला ठाकूरला एकचाक डावावर चितपत करून विजय मिळवून पहिल्या क्रमांकाचे पाच लाखाचे पारितोषिक जिंकले.दुसऱ्या चित्तथरारक लढतीत डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने पंजाब केसरी शेंडी कुमारला एकचाक डावावर चितपट करून विजय मिळवून पाच लाखाचे पारितोषिक जिंकले. तिसऱ्या लढतीत माऊली कोकाटेने हरियाणाचा आंतरराष्ट्रीय मल्ल  आशिष हुड्डाला सवारी डाव घालून सिंगल निल्सन डावावर आस्मान दाखविले.

चौथी लढत जागतिक विजेता शिवा चव्हाण विरुद्ध सतपाल सोनटक्के यांच्यात झाली. या लढतीत शिवाजी चव्हाणने डोळ्याचे पारणे फेडणारी कुस्ती करून सतपाल सोनटक्के वर विजय मिळविला. ज्येष्ठ नेते  शरद पवार यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित बारामती तालुका कुस्ती संघ व युगेंद्र दादा पवार युवा मंच  यांच्या  वतीने युगेंद्र पवार यांच्या पुढाकारातून या आंतरराष्ट्रीय निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शरद पवार यांच्यासह राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार रणजीतसिंह मोहिते- पाटील, राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, उद्योजक श्रीनिवास पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड एस एन जगताप, इंदापूर तालुकाध्यक्ष  ॲड तेजसिंह पाटील , प्रवीण माने, उद्योजक उत्तम फडतरे, माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष  ॲड अशोक प्रभुणे, ॲड सुभाष ढोले, संदीप गुजर, सत्यव्रत काळे,पै रावसाहेब मगर आदि मान्यवरांसह राज्यातील कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कुस्ती स्पर्धेमध्ये वरील प्रमुख कुस्त्यांसह आखाड्यात एकूण दीडशे नामांकित कुस्त्या पार पडल्या. कुस्ती निवेदक पै धनाजी मदने व प्रा ज्ञानदेव बुरुंगले यांनी बहारदार समालोचन करून उपस्थितांची मने जिंकली तर प्रसिद्ध हलगी वादक राजू आवाळे यांनी आखाड्यात रंगत आणली. विजेत्या मल्लांना शरद पवार यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक प्रदान करण्यात आले.

शरद पवार चिपळूण दौऱ्यावर

चिपळूण शहरात वशिष्ठ डेअरीकडून कृषी महोत्सावाचं आयोजन करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना शेतीची प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करता यावा तसंच शेतीविषय आणि दुग्धव्यवसाया संबंधित या कृषी महोत्सावाचे आयोजन करण्यात आलं आहे.  यावेळी शरद पवार म्हणाले की, आपण केंद्रीय कृषिमंत्री पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी देशात धान्य आयात करावे लागत होते. मात्र, नंतर देशातील शेती फायदेशीर कशी होईल? या दृष्टीने धोरणात्मक निर्णय घेतले गेले. यामध्ये कृषी क्षेत्रात आधुनिकता, नवीन तंत्रज्ञान याचा उपयोग करून शेतकऱ्यांचे हित जोपासून देश कृषी क्षेत्रात अग्रेसर राहिल, यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले गेले. यामुळे भारत देश तांदूळ उत्पादनात जगात प्रथम क्रमांकाचा देश बनला. कालांतराने भारत देश धान्य निर्यातीत १८ व्या क्रमांकाचा बनला, असे शरद पवार यांनी आपल्या भाषणात नमूद केले. 

Web Title: Maharashtra kesari sikandar shaikh won haryana bhola thakur baramati wrestling tournament

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • baramati

संबंधित बातम्या

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर
1

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Ajit Pawar: बारामती शहरात मुख्य ठिकाणी ‘सिग्नल यंत्रणा’ बसवा; अजित पवारांचे निर्देश
2

Ajit Pawar: बारामती शहरात मुख्य ठिकाणी ‘सिग्नल यंत्रणा’ बसवा; अजित पवारांचे निर्देश

Baramati Crime: भीषण अपघातानंतर पोलिसांना जाग; ओव्हरलोड वाहनांवर मोठी कारवाई, १४ वाहने जप्त
3

Baramati Crime: भीषण अपघातानंतर पोलिसांना जाग; ओव्हरलोड वाहनांवर मोठी कारवाई, १४ वाहने जप्त

बारामतीत बँक मॅनेजरची गळफास लावून आत्महत्या; सुसाईड नोटही आली समोर
4

बारामतीत बँक मॅनेजरची गळफास लावून आत्महत्या; सुसाईड नोटही आली समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.