बारामती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना उपमुख्यमंत्री पवार यांनी बारामतीकरांना भावनिक साद घातली. तसेच शरद पवार यांच्या कामाचेही त्यांनी कौतुक केले.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढले असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा अनुभव, तांत्रिक ज्ञान आणि उद्योजकीय कौशल्य विकसित झाले आहे.
वाहतूक सुरळीत ठेवण्याच्यादृष्टीने प्रशासनाला सूचना देण्यात आल्या असून नागरिकांनीही वाहतूक सुरक्षा विषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पवार यांनी केले.
बारामती परिसरात मोठ्या प्रमाणावर खडी, मुरूम व इतर बांधकाम साहित्याची वाहतूक ट्रकमधून होत असते. मात्र, या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक वजन भरले जात असल्याने रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
बारामतीमधील भिगवण रोडवरील बँक ऑफ बडोदाच्या शाखेत व्यवस्थापक शिवशंकर मित्रा (वय52 वर्ष) यांनी काल गुरुवारी 17 जुलै रोजी रात्री बँकेच्या शाखेतच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
नीलकंठेश्वर पॅनलला माझ्यासह उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून दिले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करण्याकरता व आभार व्यक्त करण्याकरता आज आलो आहे, असे पवार म्हणाले.
सलग दोन दिवस चाललेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीमध्ये सर्वच ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळाली, काही गटात पॅनल टू पॅनल, तर अनेक ठिकाणी क्रॉस वोटिंग झाल्याचे समोर आले.
विरोधी चंद्रराव तावरे व रंजनकुमार तावरे यांच्या नेतृत्वाखाली सहकार बचाव पॅनेल मधील महिला राखीव मधील राजश्री कोकरे या ५०० मतांनी आघाडीवर होत्या. एकूण मतमोजणी पहाटेपर्यंत सुरू राहणार होती.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून इच्छुक असलेले उमेदवार आता आपल्या भागात सक्रिय झाले आहेत.
शेती कामांसाठी सध्या मजुरांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच कांदा हे पीक वेळेवर काढणे गरजेचे असते. त्यामुळे कांदा काढणे,पात कापणे व पिशवीत भरून देण्यासाठी एकरी १५ हजार रुपये घेत…
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये ब वर्ग संस्था प्रतिनिधी मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने माळेगाव कारखान्याची निवडणूक राज्यात गाजणार आहे.
वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांनी 24 तास सुरु असलेल्या 1912, 18002333435 व 18002123435 या तीन पैकी एका टोल फ्री क्रमांकावर विजेशी संबंधित तक्रारी नोंदवाव्यात.
बारामती जिल्ह्यातील एका गावात अल्पवयीन मुलीने तरुणाच्या त्रासाला कंटाळून काही दिवसापूर्वीच स्वतःचा जीवन संपवलं. ती पीडित मुलगी दहावीच्या परीक्षेत शाळेतून पहिली आली आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.