Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्राला दोन ‘वंदे भारत’ स्लीपर मिळणार; नागपूर-पुणे, नागपूर-मुंबई मार्गावर धावणार रेल्वे

नागपूर ते पुणे यादरम्यान धावणारी स्लीपर वंदे भारत वर्धा, धामणगाव, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, दौंड या स्टेशनवर स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस थांबण्याची शक्यता आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 10, 2025 | 07:51 AM
श्रीनगरमध्ये धावली 'वंदे भारत'

श्रीनगरमध्ये धावली 'वंदे भारत'

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : हायस्पीड ट्रेन अशी ओळख असलेल्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या यशानंतर आता रेल्वेच्या ताफ्यात ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेनही येणार असून, सर्वप्रथम ही ट्रेन राजधानी दिल्लीत चालवण्यात येणार आहे. दिल्लीला जोडणाऱ्या शहरांमधून ही ट्रेन धावणार आहे. तर महाराष्ट्रासाठीही दोन ट्रेन मिळणार आहेत. सर्वप्रथम नागपूर विभागीय मंडळावर ही ट्रेन चालवण्याची शक्यता आहे.

देशात ‘वंदे भारत ट्रेन’ला चांगला प्रतिसाद मिळत असून, सुमारे 100 हून अधिक वंदे भारत ट्रेन धावत आहेत. आता लवकरच वंदे भारत स्लीपरही धावणार आहे. त्याची चाचणीही झाली आहे. महाराष्ट्रात ही ट्रेन नागपूर-पुणे, नागपूर- मुंबई मार्गावर धावण्याची शक्यता असून, त्या अनुषंगाने नागपूर विभागाने रेल्वे बोर्डाला प्रस्ताव पाठवला आहे.

नागपूर ते पुणे यादरम्यान धावणारी स्लीपर वंदे भारत वर्धा, धामणगाव, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, दौंड या स्टेशनवर स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस थांबण्याची शक्यता आहे. नागपूर, वर्धा, अकोला, शेगाव, जळगाव, मनमाड, नाशिक, कल्याण ठाणे, दादर, मुंबई याठिकाणी स्लीपर वंदे भारत थांबण्याची शक्यता आहे. नागपूर- सिंकदराबाद, नागपूर-इंदूर, नागपूर-बिलासपूर या तीन मार्गावर स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत.

बोगी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात

मोदी सरकारने सुरू केलेली वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रमुख आणि सर्वाधिक मागणी असलेली ट्रेन आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी वंदे भारतला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. लवकरच वंदे भारत एक्सप्रेसची स्लीपर ट्रेन येणार आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनसाठी बोगी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. काही दिवसांत पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनचे मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.

पुणे, मुंबईकरांना फायदा होणार

महाराष्ट्रातील पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनचा मान नागपूरला मिळण्याची शक्यता आहे. नागपूर विभागाने रेल्वे बोर्डाकडे स्लीपर वंदे भारत ट्रेनसाठी प्रस्ताव मांडला आहेह. त्यावर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे समजते. नागपूर ते पुणे आणि नागपूर ते मुंबई यादरम्यान या दोन ट्रेन धावणार आहेत. त्यामुळे पुणे, मुंबईकरांना याचा फायदा होणार आहे.

अनेक मार्गात ‘वंदे भारत’

सध्या पुण्यापासून मुंबई, नागपूर आणि दिल्लीसारख्या प्रमुख शहरांना वंदे भारत एक्स्प्रेस सेवा चालवली जात आहे. नवीन ट्रेन्स सोडल्यामुळे पुणेकरांना विविध शहरांमध्ये सोयीने आणि जलद प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. या निर्णयामुळे पुणे शहराच्या विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. रेल्वे मंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयाने पुणेकरांच्या जीवनशैलीत एक महत्त्वपूर्ण बदल घडवून आणला आहे.

Web Title: Maharashtra will get two vande bharat sleepers train nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2025 | 07:51 AM

Topics:  

  • Indian Railways
  • vande bharat express

संबंधित बातम्या

Ahilyanagar : नागपूर–पुणे वंदे भारतचे अहिल्यानगरमध्ये जल्लोषात स्वागत ‪
1

Ahilyanagar : नागपूर–पुणे वंदे भारतचे अहिल्यानगरमध्ये जल्लोषात स्वागत ‪

पुणे ते नागपूर प्रवास होणार सुपर फास्ट; PM मोदींनी वंदे भारत एक्सप्रेसला दाखवला हिरवा कंदील
2

पुणे ते नागपूर प्रवास होणार सुपर फास्ट; PM मोदींनी वंदे भारत एक्सप्रेसला दाखवला हिरवा कंदील

नागपूर-पुणे वंदे भारतचंं स्वप्न पूर्ण, १० ऑगस्टला PM नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण
3

नागपूर-पुणे वंदे भारतचंं स्वप्न पूर्ण, १० ऑगस्टला PM नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण

1500 किमी अंतर फक्त ६ तासांत; या दोन शहरांदरम्यान धावणार भारतातील दुसरी बुलेट ट्रेन
4

1500 किमी अंतर फक्त ६ तासांत; या दोन शहरांदरम्यान धावणार भारतातील दुसरी बुलेट ट्रेन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.