
सांगलीकरांनी महाराष्ट्राला दिला सर्वात तरुण आमदार; पहिल्याच निवडणुकीत मिळवली सव्वा लाख मतं
राज्यातील जवळपास २५ विधानसभा मतदारसंघांच्या निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. त्यात सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ मतदारसंघाचाही समावेश होता. या मतदारसंघात यंदा चुरशीची लढत पहायला मिळाली होती. अखेर या मतदारसंघातील निकाल जाहीर झाला असून राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांनी बाजी मारली असून सर्वात तरुण उमेदवार म्हणून विधानसभेत मतदारसंघाचं नेतृत्व करणार आहेत.
शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पक्षफुटीच्या राजकारणानंतर ही पहिलीच निवडणूक होती.शरद पवार गटाकडून रोहित पालटल यांना पहिल्यांदाच उमदेवाही मिळाली होती. अजित पवार गटाने त्यांच्याविरोधात संजयकाका पाटील यांना उमेदवारी दिली होती. पण माजी खासदार संजय काका यांचा पराभव करत रोहित पाटील यांनी एक लाख २६ हजार मत मिळवत आघाडी घेतली. संजयकाका पाटील यांना ९९ हजार मतांवर समाधान मानावं लागलं.
माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील शरद पवार गटाकडून पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांच्याविरोधात भाजपचे नेते आणि माजी खासदार संजयकाका पाटील निवडणूक लढवत होते. तर रोहित पवार यांचा पराभव करण्यासाठी त्यांच्या नावासारखेच तीन इतर उमेदवारही देण्यात आले होते. मात्र, रोहित आर. पाटील यांनी या सर्वांमध्ये बाजी मारली.
रोहीत पवार यांचं वय २५ वर्ष असून त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील सर्वात कमी वयाचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळाली.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर रोहित पाटील आणि त्यांच्या मातोश्री सुमनताई पाटील यांनी शरद पवार गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. रोहित पवारांना यावेळी उमदेवारी मिळाली मात्र तुल्यबल उमदेवार निवडणुकीच्या रिंगणात होते. माजी खासदार संजयकाका पाटील यांचे आव्हान होतं.
१९९० पासून तासगाव मतदारसंघात पाटील यांच्या कुटुंबाचे वर्चस्व आहे. आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील २०१४ च्या पोटनिवडणुकीत आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्या होत्या. त्यामुळे सुमनताई पाटील यांच्यानंतर आता रोहित पाटील यांना संधी देण्यात आली होती.
रोहित पवार यांच्या नेतृत्वात कवठेमहांकाळ नगरपंचायतीत १७ पैकी १० जागांवर विजय मिळाला होता. १९ जानेवारी २०२२ ला हे निकाल जाहीर झाले होते. त्यानंतर विधानसभेला रोहित पाटील यांना संधी मिळणार हे जवळपास निश्चित झालं होतं. त्यानुसार शरद पवार यांनी रोहित पाटील यांना निवडणुकीचं तिकिट दिलंय. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीतले दोन तरुण उमेदवार चर्चेचा विषय ठरले आहेत.