
Maharashtra ZP Election 2026: Traffic changes in Panvel city due to Zilla Parishad and Panchayat Samiti elections
तसेच निवडणूक कामासाठी शेकडो बसेसची ये-जा असल्याने सामान्य वाहनधारकांनी शहराच्या अंतर्गत रस्त्याऐवजी हायवे किंवा बाह्य वळण रस्त्यांचा वापर करणे सोयीचे ठरेल अशी माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे.मतदान साहित्य संकलन, वितरण आणि मतमोजणीसाठी पनवेलमधील व्हि. के. हायस्कूल येथे मुख्य केंद्र असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून या परिसरातील चार प्रमुख मार्ग सर्वसामान्य वाहतुकीसाठी ६ आणि ७फेब्रुवारी रोजी रात्री बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणीसाठी दोन मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे आदेश नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलिस उप आयुक्त तिरुपती काकडे यांनी दिले आहेत.
Maharashtra Politics: शिवसेनेची ताकद वाढणार; माजी आमदारासह आख्खा पक्ष शिवसेनेत विलीन होणार
निवडणूक प्रक्रियेदरम्यान प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून करण्यात आलेले बदल खालीलप्रमाणे आहेत:
– बंद राहणारे प्रमुख मार्ग आणि वेळापत्रक
६ फेब्रुवारी (रात्री १२ पासून) ते ७ फेब्रुवारी (रात्री ११ पर्यंत) मतदान साहित्य वाटप १. अमरधाम ते व्ही. के. हायस्कूल (वडाळे तलाव रोड)
२. वडाळे तलाव बीट चौकी ते व्ही. के. हायस्कूल
३. नवीन पनवेल सिग्नल ते व्ही. के. हायस्कूल
४. नवीन पनवेल सिग्नल ते अमरधाम सर्व्हिस रोड
९ फेब्रुवारी मतमोजणी १. अमरधाम ते व्ही. के. हायस्कूल
२. नवीन पनवेल सिग्नल ते व्ही. के. हायस्कूल
Mamata Banerjee on SIR : धक्कादायक! SIR प्रत्येकमध्ये 107 लोकांचा अंत? बंगालच्या विधानसभेमध्ये मो
वाहतूक पोलिसांनी वाहनधारकांसाठी खालील पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे:
अमरधामकडून येणारी वाहने: ही वाहने अमरधामवरून उजवीकडे वळून पनवेल कोर्ट, नवीन पनवेल सिग्नल किंवा सावरकर चौक मार्गे लाईन आळीतून आपल्या इच्छित स्थळी जाऊ शकतात.
वडाळे तलाव परिसरातील वाहने: या भागातील वाहनधारकांनी वडाळे तलाव बीट चौकीकडून उजवीकडे वळून पर्यायी रस्त्याचा वापर करावा.
बस आणि अवजड वाहने: निवडणूक कामासाठी शेकडो बसेसची ये-जा असल्याने सामान्य वाहनधारकांनी शहराच्या अंतर्गत रस्त्याऐवजी हायवे किंवा बाह्य वळण रस्त्यांचा वापर करणे सोयीचे ठरेल.