सोलापूर : उमेद अभियानात सोलापूर जिल्हा महाराष्ट्रात नंबर वन आहे. हे टिकून ठेवण्यासाठी शाश्वत विकासासाठी या वर्षासाठी २१२ कोटींचे उदिष्ट्ये पूर्ण करा, असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी पूनम दुध्याल तालुका अभियान व्यवस्थापक उत्तर सोलापूर यांच्यासह अभियान व्यवस्थापकांचे गौरव करण्यात आला.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागात आज उमेद अभियानातील तालुका व जिल्हा स्तरावरील कर्मचारी यांचे बैठकीचे आयोजन करणेत आले होते. या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या प्रसंगी प्रकल्प संचालक तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, जिल्हा अग्रणी बॅंकेचे नाशिककर, सहाय्यक प्रकल्प संचालक कुलकर्णी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, मिनाक्षी मडिवाळ, प्रमुख उपस्थित होतें ग्रामीण भागातील गरीबी निर्मुलन करून महिलांचा सर्वांगीण विकास साधणेसाठी उमेद अभियान अंतर्गत निर्माण करणेत आलेल्या स्वयंयहाय्यता बचत गट, ग्रामसंघ, प्रभाग संघ, उत्पादक गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यामार्फत महिलांना शास्वत उपजिविकेचे स्त्रोत व त्यांनी तयार केलेल्या वस्तु व उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी महाजिविका अभियान राबविण्यात येत असल्याचे सीईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.
१५ ऑगस्ट 2022 पर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे. उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, मिनाक्षी मडिवाळ, यांनी मनोगत व्यक्त केले.
कर्जवाटपासाठी योगदान देणाऱ्या सर्व घटकांचे अभिनंदन ..!
दिलीप स्वामी यांनी उपस्थित कर्मचारी व उमेद अभियानात काम करणारे सर्व बचत गट, बॅंकेचे अधिकारी व उमेद च्या सर्व कर्मचारी यांचे सह प्रकल्प संचालक संतोष धोत्रे व त्यांचे टीम ने चांगले काम केले मुळे जिल्हा राज्यात पहिला आला. हे सातत्य टिकवून ठेवा. असे आवाहन सीईओ स्वामी यांनी केले.
शासनाचे योजनांचा कृतीसंगम करा
उपजिविकेशी संबंधित सक्षम संस्था निर्माण करून त्याचे आराखडे तयार करा. सुक्ष्म नियोजन करा. उत्पादनांची विक्री मोठ्या प्रमाणात होणे साठी आकर्षक पॅकेजींग, ब्रॅन्डींग, व मार्केटींग करावे. असेही सिईओ स्वामी यांनी सांगून तालुका स्तरावर काम केलेले संस्था व कर्मचारी व बचत गटाचे अघ्यक्ष व सचिव यांचा गौरव करा. त्यांना सक्षम करणेसाठी प्रशिक्षण द्या असे आवाहन केले.
जिल्हा यंदाही टाॅपवर राहणार : अतिरिक्त सीईओ
सोलापूर जिल्हा राज्यात नंबर वन आहे. सिईओ दिलीप स्वामी यांचे मार्गदर्शन व सातत्याने पाठपुरावा केलेमुळे कर्ज वाटप शंभर टक्के झाले. या वर्षा देखील चांगले रितीने नियोजन करूयात. सन 2021-22 मध्ये सोलापूर जिल्हाने चांगले पध्दतीने काम केले. प्रत्येक तालुक्यांत तीन रूरल हट कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे सांगितले.