Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : साक्षीदार फितूर होण्याची मालिका सुरूच, फितूर साक्षीदारांची संख्या ३४ वर

या साक्षीदाराने महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल केली होती की राज्य एटीएस अधिकाऱ्यांनी त्याला दंडाधिकार्‍यांसमोर जबाब देण्याची धमकी दिली होती. या साक्षीदाराने यापूर्वी राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) निवेदन दिले होते की, जेव्हा तो कर्नल प्रसाद पुरोहित यांनी २००६ मध्ये लेफ्टनंटला पहिल्यांदा भेटला होता.

  • By Vivek Bhor
Updated On: Apr 05, 2023 | 09:46 PM
malegaon bomb blast case update witness disappearance continues number of dismissed witnesses rises to 34 nrvb

malegaon bomb blast case update witness disappearance continues number of dismissed witnesses rises to 34 nrvb

Follow Us
Close
Follow Us:

मयुर फडके, मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी (Malegaon Bomb Blast Case Update) आणखी एक साक्षीदार (Witness) फितूर (Fitur) झाल्याचे एनआयएकडून घोषित करण्यात आले (Declared By NIA). या खटल्यातील साक्षीदार असलेल्या एका माजी लष्कारी अधिकाऱ्याने मालेगाव ब्लास्ट प्रकरणात राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) अधिकार्‍यांवर खोटी साक्ष देण्यासाठी आपल्यावर दबाव टाकल्याचा आरोप केला. त्यामुळे हा साक्षीदार फितूर झाल्याचे एनआयएने जाहीर केले. त्यामुळे साक्षीदार फितूर झाल्याची संख्या ३४ वर गेली असून या खटल्यात अजुनही २० साक्षीदार तपासायचे बाकी आहेत.

या साक्षीदाराने महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल केली होती की राज्य एटीएस अधिकाऱ्यांनी त्याला दंडाधिकार्‍यांसमोर जबाब देण्याची धमकी दिली होती. या साक्षीदाराने यापूर्वी राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) निवेदन दिले होते की, जेव्हा तो कर्नल प्रसाद पुरोहित यांनी २००६ मध्ये लेफ्टनंटला पहिल्यांदा भेटला होता. तेव्हा, पुरोहितने त्याला अभिनव भारत संस्थेत त्याच्यासोबत काम करण्यास सांगितले होते.

[read_also content=”आमदार निधीत तफावत प्रकरण : घाईघाईने केलेल्या प्रतिज्ञापत्रावर न्यायालयाची नाराजी, राज्य सरकारकडून प्रतिज्ञापत्र मागे https://www.navarashtra.com/maharashtra/mla-fund-discrepancy-case-court-displeased-with-hasty-affidavit-state-govt-withdraw-nrvb-381442.html”]

त्या वर्षाच्या शेवटी पुण्यात पुरोहित यांच्या घरी बैठकीसाठी त्याला बोलावण्यात आले. पुरोहित आणि एक अज्ञात व्यक्ती या बैठकीला उपस्थित होते, जिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यावर चर्चा झाली होती. आरएसएसने “आक्रमक आणि राष्ट्रवादी कार्य” करावे अशी या बैठकीत चर्चा झाली. असेही साक्षीदाराने तपास यंत्रणेला सांगितले होते. तसेच २००८ मधील मध्य प्रदेशातील पचमढी येथे पुरोहित यांनी आयोजित केलेल्या प्रशिक्षण सत्रातही त्यांने सहभाग घेतला होता. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सुमारे २० युवक शिबिरात सहभागी झाले होते. इतर आरोपी समीर कुलकर्णी आणि सुधाकर चतुर्वेदी हे देखील तेथे उपस्थित असल्याचेही साक्षीदाराने तपास संस्थेला सांगितले होते.

[read_also content=”ऐन गर्दीच्या वेळी केली चूक, लोकलचं दार अडवणं आलं अंगलट, प्रवाशांनी लाथाबुक्क्यांनी लाथाबुक्क्यांनी तुडव-तुडव तुडवला; दिवा स्टेशनवरची घटना झाली VIRAL https://www.navarashtra.com/viral/horrible-crime-news-mumbai-local-man-beaten-by-mob-on-diva-station-video-viral-on-social-media-381361.html”]

काय आहे प्रकरण

२९ सप्टेंबर २००८ मालेगावमधील एका मशिदीत बॉम्बस्फोट झाला होता. यात ७ जणांना आपले प्राण गमवावे लागले. याप्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी, अजय राहिरकर यांना अटक करण्यात आली होती सध्या सर्व आरोपी जामीनावर बाहेर आहेत. मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयात न्यायाधीश प्रशांत सित्रे यांच्यापुढे या खटल्याची सुनावणी सुरू आहे.

Web Title: Malegaon bomb blast case update witness disappearance continues number of dismissed witnesses rises to 34 nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2023 | 09:46 PM

Topics:  

  • Malegaon Bomb Blast Case
  • number
  • Witness

संबंधित बातम्या

Malegaon Blast Case Verdict:  १७ वर्षांनंतर मालेगाव स्फोटात नवा ट्विस्ट! कोण करतोय मोठे खुलासे?
1

Malegaon Blast Case Verdict: १७ वर्षांनंतर मालेगाव स्फोटात नवा ट्विस्ट! कोण करतोय मोठे खुलासे?

मालेगाव बॉम्बस्फोटात नवा ट्वीस्ट! RSS च्या मोहन भागवतांना अडकवण्याचा होता प्लॅन, ATS अधिकाऱ्याचा दावा
2

मालेगाव बॉम्बस्फोटात नवा ट्वीस्ट! RSS च्या मोहन भागवतांना अडकवण्याचा होता प्लॅन, ATS अधिकाऱ्याचा दावा

सैन्यातले सहकारी ब्रिगेडियर बनले, कर्नल पुरोहित यांचं काय? सैन्यात बढती मिळणार का?
3

सैन्यातले सहकारी ब्रिगेडियर बनले, कर्नल पुरोहित यांचं काय? सैन्यात बढती मिळणार का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.