जरांगे पाटील यांची सभा : जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी काही दिवसांपासून मराठवाडा दौरा सुरु केला आहे. मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण द्यावं या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केले. ७ जुलै रोजी जरांगे पाटील यांचा परभणी दौरा झाला होता. यावेळी हिंगोलीमधून शांतता रॅली काढण्यात आली होती. त्यानंतर आज जरांगे पाटील यांची आज शांतता रॅली आणि सभा नांदेडमध्ये (Nanded) आयोजित करण्यात आली आहे. परभणीमध्ये त्यांच्या रॅली आणि सभेला चांगला प्रतिसाद मिळाला होता.
आजच्या नांदेड सभेची आज जोरदार तयारी करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर जरांगे यांच्या सभेमुळे नांदेड शहरातील शाळांना सुट्टी देण्याचे आदेश शिक्षणाधिकारी यांनी काढले आहेत. यावेळी वादाला सुरुवात झाली आहे. आज दुपारी १२ वाजता नांदेडमध्ये जनजागृती यात्रा सुरु झाली आहे, या सभेसाठी आजूबाजूच्या गावांमधील नागरिक सुद्धा नांदेड शहरामध्ये येणार आहेत. या रॅलीमुळे रस्त्याच्या वाहतुकीतही बदल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर नांदेडमधील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, नांदेड यांच्या आदेशान्वये ही सुट्टी जाहीर केली आहे. हे पत्र शाळेंमधील प्राचार्य आणि मुख्याध्यापकांना पाठवण्यात आले आहे.
जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत शहरातील राज कार्नर ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या पर्यंत जनजागृती शांतता रॅली काढली जाणार आहे. या रॅलीमध्ये जिल्ह्यातील लाखो मराठा बांधव सहभागी झाले आहेत. तसेच या रॅलीत जरांगे पाटील यांच ठिकठिकाणी जेसीबी द्वारे स्वागत देखील केलं जाणार आहे. एकाच वेळी लाखों मराठा बांधव या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे पोलिसांचा तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच शहरातील त्याचबरोबर वाहतुकीमध्ये देखील बदल करण्यात आला आहे.