मुंबई : देशाची एकता व अखंडता अबाधित ठेवण्यासाठी कष्टकरी माथाडी कामगार व समाजाने कार्य करावे (hard working mathadi workers and society should work), असे आवाहन महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील (Narendra Annasaheb Patil) यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्व विशद करताना माथाडी कामगार व उपस्थितांना मार्गदर्शन केले.
देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त युनियनच्या मशीद बंदर येथील कार्यालयासमोर आयोजित केलेल्या झेंडावंदन कार्यक्रमात माथाडी कामगार नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील बोलत होते. यावेळी युनियनचे कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप, अध्यक्ष एकनाथ जाधव, जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख, संयुक्त सरचिटणीस दिलीप खोड उपाध्यक्ष सूर्यकांत पाटील, माथाडी पतपेढीचे व्यवस्थापकीय संचालक रमेश अण्णासाहेब पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
ज्याप्रमाणे स्वातंत्र्य सैनिकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्याप्रमाणे वर्षानुवर्षे अन्यायाच्या खाईत तडफडणाऱ्या कष्टकरी कामगारांना देखील स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कायदा व विविध माथाडी बोर्डांच्या योजनेचे संरक्षण व स्वातंत्र्य मिळवून दिले.