27 Aug 2025 04:35 PM (IST)
मुंब्र्याच्या रेतीबंदर गणेश घाट परिसरातील कचऱ्यात शेकडो मतदान कार्ड सापडले आहेत. हे सर्व मतदान कार्ड कळवा विभागातील असल्याचे समोर आले आहे.या मतदान कार्डच्या मदतीने यादी क्रमांक 72 मध्ये झोल झाल्याचा आरोप काँग्रेसचे मुंब्रा कळवा विधानसभा अध्यक्ष वसीम सय्यद यांनी केला आहे.
27 Aug 2025 04:30 PM (IST)
राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून राज्यातील सर्वच मानाच्या श्रीगणेशांच्या प्राणप्रतिष्ठापना संपन्न झाले आहे. अशातच अहिल्यानगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात देखील आज सकाळी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते श्री विशाल गणेश मंदिरामध्ये श्रींची विधिवत प्राणप्रतिष्ठापना संपन्न झाली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नगरकरांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत हा सण कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत आनंदाने साजरा करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जनतेला केले आहे. जिल्ह्यामध्ये गणेशोत्सव शांततेत पार पाडावा यासाठी अहिल्यानगर पोलीस दल सतर्क असून महत्त्वाचे मंदिरे त्याचप्रमाणे गणेश मंडळ तसेच मोठी गर्दी होणाऱ्या ठिकाणी पोलिसांचा चौक बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.
27 Aug 2025 04:25 PM (IST)
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) यांच्या वतीने ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील खड्ड्यांच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार ठाणे जिल्हा अध्यक्ष सुवास देसाई. ठाणे शहर युवा काँग्रेस अध्यक्ष विक्रम खामकर यांच्या उपस्थितीमध्ये ओवाळा माजिवडा १४६ चे युवक अध्यक्ष श्रीकांत भोईर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. विशेष म्हणजे, या आंदोलनात खड्डे फक्त दाखवले गेले नाहीत, तर कार्यकर्त्यांनी स्वतःच्या खिशातून खर्च करून प्रत्यक्ष खड्डे बुजवले.
27 Aug 2025 04:20 PM (IST)
गेल्यावर्षी “सिंधुदुर्गचा राजा”च्या चरणी निलेश राणे हे निवडणुकीमध्ये निवडून यावेत असा नवस कार्यकर्त्यांनी केला होता. त्यानंतर भक्तांच्या हाकेला सिंधुदुर्ग राजा पावला आणि निलेश राणे हे कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार झाले. त्यांचा हा नवस आज ६५ ग्रॅम सोने आणि अर्धा किलो चांदीमिश्रित “सोन्याचे पाऊल” अर्पण करून फेडण्यात आला. ही प्रतिष्ठापना शहरातील प्रतिष्ठित डॉ. जी. टी. राणे यांच्या हस्ते करण्यात आली.
कुडाळ येथे सिंधुदुर्ग राजाची प्रतिष्ठापना गेली १७ वर्ष राणे कुटुंबीयांच्या माध्यमातून होत आहे. यावर्षी या गणेशोत्सवाला विशेष असे महत्त्व प्राप्त झाले आहे, असं राकेश नेमळेकर या कार्यकर्त्याने सांगितलं आहे.
27 Aug 2025 04:13 PM (IST)
पनवेलमधील गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात घरोघरी गणपतींचे आगमन झाल्याने अनेकांनी गणपती भोवती आकर्षक आरास तयार केल्या आहेत. तालुक्यातील धानसर गावात देखील गणपतीचे आगमन झाले असून, गावातील रहिवासी बाबुराव पोरजी यांनी गणपती शेजारी केलेली केदारनाथ धाम येथिल मंदिराची आरास गणेश भक्तांसाठी आकर्षण ठरत आहे.
27 Aug 2025 03:55 PM (IST)
Chitra Wagh: राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे पाटील हे आज मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी एका भाषणात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आईबाबत अपशब्द वापरल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. त्यानंतर भाजप नेत्यांनी जरांगे पाटलांवर टीका केली. त्यात चित्रा वाघ यांचा समावेश देखील होता. त्यानंतर जरांगे पाटील यांनी तुझ गबाळ उचकिन असा इशारा वाघ यांना दिला होता. त्याला आता भाजप नेत्या आणि आमदार चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
27 Aug 2025 03:30 PM (IST)
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) या महारत्न दर्जाच्या सरकारी कंपनीने फिल्ड इंजिनिअर व फिल्ड सुपरवायझर या पदांसाठी मोठी कराराधिष्ठित भरती जाहीर केली आहे. जाहिरात क्र. CC/03/2025 (दि. 27 ऑगस्ट 2025) अंतर्गत या भरतीची घोषणा करण्यात आली असून...
27 Aug 2025 03:13 PM (IST)
अमेरिका आणि भारतामध्ये सध्या टॅरिफवरुन मोठा वाद सुरु आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतावर ५०% टॅरिफ (Tarrif) लावला आहे. रशियाकडून तेल खरेदी करत युक्रेनविरुद्धच्या युद्धात भारत रशियाला अप्रत्यक्ष साथ देत असल्याचे ट्रम्प यांचे मत आहे.
27 Aug 2025 03:04 PM (IST)
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क (Michael Clarke) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्वचेच्या कर्करोगाशी झुंजणाऱ्या या दिग्गज खेळाडूने नुकतीच एक शस्त्रक्रिया करून घेतली आणि सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत लोकांना एक महत्त्वाचे आवाहन केले.
27 Aug 2025 03:03 PM (IST)
भारतीय संघाचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज आर आश्विनने मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या आर आश्विनने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
27 Aug 2025 02:45 PM (IST)
ठाणे/ स्नेहा जाधव,काकडे : वाहतूक कोंडी आणि रस्त्यावरील खड्डे यामुळे नागरिकांच्या डोक्याचा ताप वाढत चालला आहे. सततच्या या त्रासाला कंटाळेले नागरिक प्रशासनाने दखल घ्यावी याकरिता आता रस्त्यावर उतरले आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) यांच्या वतीने ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील खड्ड्यांच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.
27 Aug 2025 02:45 PM (IST)
गणपती बाप्पाचे सगळीकडे मोठ्या आनंद आणि उत्साहात स्वागत झाले आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी मोठ्या जलौषात सगळीकडे तयारी करण्यात आली होती. बाप्पाचे आगमन झाल्यानंतर घरी अनेक गोडाचे पदार्थ बनवले जातात. पण बाप्पाच्या प्रसादासाठी नेमकं काय बनवावं, हा प्रश्न कायमच सगळ्यांना पडतो. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये शाही बदामाचा हलवा बनवू शकता. बदाम हलवा चवीला अतिशय सुंदर लागतो. कमीत कमी साहित्यामध्ये तुम्ही झटपट बदाम हलवा बनवू शकता. प्रसादामध्ये दिले जाणारे पदार्थ थोडेसे खाल्ल्यानंतर सुद्धा पोट भरते आणि मनाला आनंद मिळतो. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये बदाम हलवा बनवण्याची सोपी रेसिपी.
27 Aug 2025 02:44 PM (IST)
मल्याळम मनोरंजन उद्योगातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेता राजेश केशव एका कार्यक्रमादरम्यान स्टेजवर बेशुद्ध झाला, ज्यामुळे त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याची प्रकृती खूपच गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. अभिनेत्याचे नक्की काय झाले आहे आपण आता जाणून घेणार आहोत.
27 Aug 2025 02:44 PM (IST)
मुंबई : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहिला मिळत आहेत. यादरम्यान त्यांनी सरकारविरोधात भाष्य केलं होतं. त्याचा समाचार आता महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. ‘महायुती सरकार तीन कोटी १७ लाख मते आणि ५१.७८ टक्के मताधिक्याने निवडून आले आहे. अशा मजबूत सरकारला उलथवण्याची भाषा चीड आणणारी आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
27 Aug 2025 02:44 PM (IST)
Pradhan Mantri Matru Vandana Yojna: केंद्र सरकारने देशातील नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. ज्याचा महिलांना थेट फायदा होत असतो. अशीच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री मातृ वंदना योजना. या योजनेअंतर्गत, केंद्र सरकारकडून काही अटींसह गर्भवती महिलांना ११ हजार रुपयांपर्यंतची मदत दिली जाते. जर तुम्हीही गर्भवती असाल आणि या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हीही या याोजनेत आपली नोंदणी करू शकता.
27 Aug 2025 02:43 PM (IST)
मुंबई: मुंबईतून एक संतापजनक घटना समोर आली आहे. तीन अल्पवयीन मुलींसमोर अश्लील कृत्य केल्याचे समोर आले आहे. अश्लील कृत्य करणाऱ्या ५८ वर्षीय आरोपीला पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. आरोपी दारूखाना परिसरातील रहिवासी असून त्याच्याविरोधात विनयभंग व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
27 Aug 2025 02:43 PM (IST)
Apple Launch Event 2025: सध्या सर्वच स्मार्टफोन युजर्सच्या मनात एकच प्रश्न आहे, तो म्हणजे आगामी आयफोन सिरीजचं लाँचिंग कधी होणार? मात्र आता युजर्सच्या या प्रश्नाचं उत्तर कंपनीने दिलं आहे. कंपनीने आगामी ईव्हेंटबाबत अधिकृतपणे माहिती दिली आहे. म्हणजेच ईव्हेंट कधी आयोजित केला जाणार, कोणत्या ठिकाणी आयोजित केला जाणार याबाबत आता कंपनीने माहिती शेअर केली आहे. तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर देखील यासंबंधित काही पोस्ट शेअर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता आगामी आयफोन 17 सिरीजची लाँच डेट कन्फर्म झाली आहे.
27 Aug 2025 02:43 PM (IST)
शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव म्हणजे पोट. अन्नपदार्थ साठवण्यासाठी आणि खाल्ले अन्नपदार्थ पचन होण्यासाठी पोट अतिशय महत्वाचे आहे. शरीरात असलेले सगळ्यात लहान अवयव कायम निरोगी राहण्यासाठी अनेक महत्वपूर्ण कामे करत असतात. त्यातील महत्वाचा अवयव म्हणजे पित्ताशय. यकृताखालील अवयवात पित्तरस साठून राहतो. शरीरातील पित्तरसामुळे अन्नातील चरबी पचन होते. पण जीवनशैलीतील चुकीच्या सवयी फॉलो केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. पित्ताशयात कोलेस्टेरॉल, कॅल्शियम किंवा इतर घटक साचून राहिल्यामुळे आरोग्याला हानी पोहचते. हे घटक पित्ताशयात तसेच साचून राहतात. त्यानंतर ते हळूहळू मुतखड्याचे स्वरूप घेतात. ज्यामुळे सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणतीही लक्षणे शरीरात अजिबात दिसून येत नाहीत. मात्र कालांतराने अपचन, पोटात जडपणा, सौम्य वेदना इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात.
27 Aug 2025 02:13 PM (IST)
Asia cup 2025 : आशिया कप २०२५ स्पर्धेला ९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ आधीच जाहीर करण्यात आला आहे. या १५ सदस्यीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे. तर उपकर्णधार म्हणून शुभमन गिलची निवड करण्यात आली आहे. अशातच आता भारतीय संघासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने त्याच्या दुखापतीबाबत माहिती दिली आहे. तो आता ठीक असल्याचे त्याने सांगितले आहे.
27 Aug 2025 02:13 PM (IST)
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात, तर कधी भयावह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये तुम्ही प्राण्यांचे देखील व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. यामध्ये काही हैराण करुन सोडणारे व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ हैराण करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
27 Aug 2025 02:13 PM (IST)
ठाणे/ स्नेहा जाधव,काकडे : राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरु झाली आहे. अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने गणपतीचीम मुर्तीची मनोभावी सेवा करतात. याचपार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात भाद्रपद गणेश चतुर्थी निमित्ताने दीड लाखाहून अधिक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना झाली. यामध्ये 1 लाख 56 हजार 782 घरगुती आणि 1 हजार 60सार्वजनिक गणेशमूर्तीचा सामावेश आहे. सर्वाधिक सार्वजनिक गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा ठाणे शहरात झाली आहे. सर्वाधिक घरगुती गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा उल्हासनगर ते बदलापूर या भागात झाली आहे.
27 Aug 2025 12:47 PM (IST)
OnePlus ने त्यांच्या ग्राहकांसाठी नवीन आणि अनोखी डिझाईन असलेले ईअरबड्स लाँच केले आहेत. कंपनीने नवीन ईअरबड्स OnePlus नॉर्ड बड्स 3आर या नावाने लाँच केले आहेत. या ट्रूली वायरलेस स्टीरियो हेडसेटमध्ये चार्जिंग केससह एकूण 54 तासांची बॅटरी लाईफ देण्यात आली आहे. या नव्या ईअरबड्सना पाणी आणि धूळीपासून संरक्षणासाठी IP55 रेटिंग देण्यात आले आहे. याशिवाय हे बड्स 12.4 मिमी टाइटेनियम डायनेमिक ड्राइवर आणि खास AI-Supported कॉल नॉइज कँसलेशन सुविधा देखील ऑफर करतात. यासोबतच या बड्समध्ये डुअल-डिवाइस कनेक्टिविटी देखील ऑफर केली जाते.
27 Aug 2025 12:28 PM (IST)
आज गणेश चतुर्थीनिमित्ताने सर्वत्र गणपती बाप्पांचं आगमन झाले आहे. सगळीकडे उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक कलाकारांनी घरी बाप्पाचं स्वागत केले आहे. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मराठी अभिनेता स्वप्निल जोशीच्या घरी देखील बाप्पाचं मोठ्या थाटात आगमन झालं आहे. स्वप्निल जोशीच्या घरचा बाप्पा हा दरवर्षी स्पेशल असतो. स्वप्निल जोशीच्या घरी बाप्पांची धातूची मूर्ती बसवली जाते. यावर्षी देखील स्वप्निलने आनंदाने बाप्पाचे स्वागत केले. तसेच स्वप्निलने घरी येणाऱ्या पाहुण्यांना खास आवाहन देखील दिले होते. की मिठाई नको तर येताना अर्धा किला तांदूळ आणा असे त्याने म्हटले होते.
27 Aug 2025 11:20 AM (IST)
आज, २७ ऑगस्ट हा गणेश चतुर्थीचा सण आहे, ज्याची लोक आतुरतेने वाट पाहत होते. आज सर्वत्र उत्साह पाहायला मिळत आहे. दहा दिवसांचा गणेशोत्सव या दिवसापासून सुरू होतो. लोक बाप्पाला म्हणजेच भगवान श्री गणेशाला त्यांच्या घरी आणतात आणि मोठ्या थाटामाटात त्यांची सेवा करतात. अनेक सेलिब्रिटी दरवर्षी ही परंपरा पाळतात आणि त्यांच्या घरात बाप्पाची मूर्ती स्थापित करतात. यावेळीही सोनू सूद, अंकिता लोखंडेपासून ते भारती सिंगपर्यंत सर्वांनी त्यांच्या घरी बाप्पाचे स्वागत केले, ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
27 Aug 2025 11:11 AM (IST)
US 50% tariff on Indian goods : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताच्या अर्थव्यवस्थेवर कर प्रहार केला आहे. भारतावरील अतिरिक्त २५% शुल्काची मुदत संपल्यानंतर आता एकूण ५०% कर आकारणी करण्यात आली आहे. हा निर्णय केवळ व्यापारापुरता मर्यादित नसून, तो भारतातील लाखो कामगारांच्या भवितव्याशी जोडलेला आहे. कारण या निर्णयाचा सर्वाधिक फटका भारताच्या कापड, दागिने, फर्निचर, स्टील-अॅल्युमिनियम अशा महत्त्वाच्या निर्यात क्षेत्रांना बसणार आहे.
27 Aug 2025 10:58 AM (IST)
जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगावात भाजपच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. हल्ला झालेल्या माजी नगरसेवकांचे नाव प्रभाकर चौधरी आहे. मात्र हा हल्ला कोणत्या कारणावरून करण्यात आला हे अध्यापत स्पष्ट झालेले नाही आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.
27 Aug 2025 10:40 AM (IST)
Garh Ganesh Temple Jaipur : भारत हा मंदिरांचा देश म्हणून ओळखला जातो. येथे प्रत्येक राज्यात, प्रत्येक प्रदेशात श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचा अनोखा संगम अनुभवायला मिळतो. गणपती बाप्पा म्हणजे मंगलकर्ता आणि विघ्नहर्ता. कोणत्याही कार्याची सुरुवात करण्यापूर्वी प्रथम बाप्पांची पूजा करण्याची परंपरा आपल्या संस्कृतीत हजारो वर्षांपासून आहे. भारतभरात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. याच बाप्पाच्या अनोख्या आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांपैकी एक आहे जयपूरमधील गढ गणेश मंदिर.
27 Aug 2025 10:30 AM (IST)
कल्याण: कल्याणमधून डॉक्टरांचा निष्काळजीपणा समोर आला आहे. 10 वर्षाच्या मुलाला टायफाईड आणि निमोनियाची लागण झाला होती. त्याच्या उपचारासाठी त्याच्या कुटुंबीयांनी कल्याण आधारवाडी चौकातील मनोमेय मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मुलाचा उपचार करून या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र संबंधित डॉक्टरने या मुलाला टायफाईड निमोनियाच्या औषधांसह दुसऱ्याच रुग्णाची औषधे देखील प्रिस्क्रिप्शनमध्ये लिहून दिली आहे. मुलाचे नातेवाईक मुलाला घेऊन दुसऱ्या डॉक्टरकडे इंजेक्शन घेण्यासाठी गेले असता हा प्रकार उघडकीस आला. जर ही औषधें आजारी मुलाने घेतली असती तर त्याच्या आरोग्याला उपाय होण्याऐवजी अपाय होण्याची शक्यता होती.
27 Aug 2025 10:20 AM (IST)
Samsung Galaxy Tab S10 Lite हा बहुप्रतिक्षित टॅबलेट आता अखेर अधिकृतपणे लाँच करण्यात आला आहे. हा नवीन टॅबलेट तीन रंगाच्या पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. तसेच या टॅबलेटमध्ये पावरफुल बॅटरी देखील देण्यात आली आहे. Samsung Galaxy Tab S10 Lite मध्ये 10.9-इंच डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 600 निट्स पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे. हे टॅबलेट 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेजसह लाँच करण्यात आले आहे. यामध्ये 8-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 8,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
27 Aug 2025 10:10 AM (IST)
जम्मू : गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यांत मुसळधार पाऊस होत आहे. त्यात जम्मू-काश्मीरमध्येही मुसळधार पाऊस सुरु आहे. या मुसळधार पावसाने कहर केला. या पावसाचा फटका श्री माता वैष्णोदेवी यात्रा मार्गाला बसला आहे. या मार्गावरील अर्धकुंवारी भागात भूस्खलन झाले. तर दोडा येथे ढगफुटीमुळे एकूण 30 जणांचा मृत्यू झाला.
27 Aug 2025 10:00 AM (IST)
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, भारतातील चौथे अॅपल स्टोअर कोरेगांव पार्क पुणे येथे ओपन करण्यात येणार आहे. येत्या काहीच दिवसांच म्हणजेच 4 सप्टेंबर रोजी या स्टोअरचे उद्घाटन केले जाणार आहे. ही घोषणा Apple द्वारे बंगळुरुमध्ये करण्यात आलेल्या तिसऱ्या रिटेल स्टोअरच्या घोषणेनंतर करण्यात आली आहे. चौथ्या रिटेल स्टोअरची घोषणा अॅपलने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या त्यांच्या मोठ्या आयफोन लाँच कार्यक्रमासाठी अधिकृतपणे आमंत्रणे जारी करण्याच्या काही दिवस आधी केली आहे.
27 Aug 2025 09:56 AM (IST)
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर दबाव आणल्याचा दावा केला आहे. ट्रम्प म्हणाले की, वॉशिंग्टनकडून व्यापार नाकेबंदी आणि उच्च कर लावण्याची धमकी देऊन त्यांनी भारताला सावध केले. “मी मोदींना सांगितले की मला तुमच्याशी कोणताही व्यापार करार करायचा नाही... कारण तुम्ही लोक अणुयुद्धात अडकणार आहात. मी त्यांना म्हटलं उद्या फोन करा, पण आम्ही करार करणार नाही. जर केला तर इतके जास्त कर लादू की तुमचे डोके फिरेल,” असे ट्रम्प यांनी म्हटले.
27 Aug 2025 09:53 AM (IST)
मुंबईच्या नालासोपाऱ्याच्या पूर्व मोरेगाव येथे इंस्टाग्रामवर मित्राच्या प्रेयसीला अश्लील मॅसेज पाठवल्याच्या रागातून मित्रांनीच मॉब लिंचिंग करत एक तरुणाची हत्या केल्याचं समोर आलं आहे. मृतकाचे नाव प्रतीक वाघे (वय 24) असे आहे तर भूषण पाटील हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. आरोपी हा व्यायाम पट्टू आहे.
27 Aug 2025 09:43 AM (IST)
स्मार्टफोन युजर्सची सर्वात मोठी समस्या म्हणजे अँड्रॉइडवरून आयफोनवर किंवा आयफोनवरून अँड्रॉइडवर स्विच होणे. ही समस्या सर्वाधिक तेव्हा जाणवते जेव्हा तुम्ही आयफोन सारख्या हाय अँड डिवाइसवरून एखाद्या अँड्रॉइड स्मार्टफोनवर स्विच करता. कॉन्टॅक्ट, फोटोज, व्हाट्सअप चॅट, पासवर्ड आणि इतर महत्त्वाचे ॲप्स नव्या डिवाइसमध्ये सुरक्षित रहातील की नाही, याबाबत अनेक यूजरच्या मनात चिंता असते.मात्र गुगलने युजर्सच्या या समस्येच समाधान शोधलं आहे. अलीकडेच लाँच करण्यात आलेल्या गुगल पिक्सेल 10 सिरीज स्मार्टफोनमुळे डेटा ट्रान्सफरची समस्या आता संपली आहे. गुगल पिक्सेल 10 सिरीजमध्ये केवळ 30 मिनिटात आयफोन वरून गुगल पिक्सेलवर त्यांचा डेटा ट्रान्सफर करू शकता.
27 Aug 2025 09:34 AM (IST)
सकाळी झोपेतून उठल्यानंतर डोकं दुखणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. अपुऱ्या झोपेमुळे किंवा शरीरात वाढलेल्या थकव्यामुळे सामान्यपणे डोकं दुखीची समस्या उद्भवू लागते. धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल, बिघडलेली पचनक्रिया इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीरात होणाऱ्या बदलांकडे योग्य लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा आरोग्यासंबंधित अतिशय गंभीर समस्या उद्भवू शकतात. नीट झोप न लागणे, वारंवार जाग येणे किंवा झोपेत श्वास रोखला जाणे इत्यादी अनेक गोष्टींमुळे कायमच डोके दुखीची समस्या उद्भवू लागते.
27 Aug 2025 09:25 AM (IST)
भारतात आज सर्वत्र गणेशोत्सव साजरा केला जात आहे. आजचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो, यादिवशी अनेक लोकं सोनं खरेदी करण्याला प्राधान्य देतात. तुम्ही देखील गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याचा विचार करताय का? तर त्यापूर्वी भारताच्या वेगवेगळ्या शहरात सोन्याचे भाव काय आहेत, याबाबत जाणून घेऊया. 27 ऑगस्ट रोजी आज भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,207 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,356 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,656 रुपये आहे. 26 ऑगस्ट रोजी काल भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,150 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,304 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,613 रुपये होता.
27 Aug 2025 09:25 AM (IST)
आशिया कप 2025 स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार असून अंतिम सामना 28 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. यूएईमधील दुबई आणि अबुधाबी येथे सामने पार पडणार आहेत. या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी होणार असून त्यांचे दोन गट करण्यात आले आहेत. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, हाँगकाँग आणि ओमान यांनी आपापले संघ जाहीर केले आहेत, तर श्रीलंका आणि यूएई यांनी अद्याप संघाची घोषणा केलेली नाही. सर्व संघांना 30 ऑगस्टपर्यंत परवानगीशिवाय संघात बदल करता येणार आहेत. त्यानंतर बदल करण्यासाठी आशियाई क्रिकेट कौन्सिलची परवानगी घ्यावी लागेल.
27 Aug 2025 09:16 AM (IST)
मुंबई : राज्यभरातील सार्वजनिक मंडळांसोबतच घराघरात लाडक्या गणपती बाप्पाचे आज आगमन होत आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ अशा जयघोषात गणरायाचे स्वागत करण्यासाठी सर्व जण आतूर आहेत. सार्वजनिक मंडळांच्या आगमन मिरवणुका सकाळपासूनच सुरू होतील. ढोल-ताशांच्या दणदणाटात एका लयीत सगळी वाद्ये वाजवत जल्लोषात बाप्पाची मिरवणूक निघणार आहे.
27 Aug 2025 09:05 AM (IST)
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली बुधवारी (२७ ऑगस्ट) अंतरवली सराटी येथून मराठा मोर्चा मुंबईकडे रवाना झाला. सकाळी १० वाजता जरांगे पाटील हे मोठ्या संख्येने मराठा आंदोलकांसह जालन्यातून निघाले.या मोर्चाचा आजचा मुक्काम जुन्नर येथे असणार आहे. त्यानंतर राजगुरुनगर, खेड, चाकण, तळेगाव, लोणावळा, पनवेल, वाशी आणि चेंबूर मार्गे मोर्चा २८ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचणार होता.दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी महत्त्वपूर्ण आदेश देत पुढील दोन आठवड्यांसाठी पूर्वपरवानगीशिवाय कोणालाही आंदोलन करता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मोर्चाच्या नियोजित आंदोलनावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे.
27 Aug 2025 08:58 AM (IST)
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्याबद्दल युट्यूबरने अपशब्द वापरल्याने त्यांच्या समर्थकांनी चांगलाच गोंधळ घातला. संतप्त समर्थकांनी संबंधित तरुणाला गाठून त्याचे कपडे फाडले तसेच तोंडाला काळे फासून अपमानित केले. हा प्रकार पैठण तालुक्यातील बस स्थानकासमोरील चौकात घडला. घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि जरांगे समर्थकांच्या तावडीतून युट्यूबरची सुटका केली. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून परिसरात मोठी चर्चा रंगली आहे.
27 Aug 2025 08:57 AM (IST)
नालासोपारा पूर्व मोरेगाव परिसरात इंस्टाग्रामवर प्रेयसीला अश्लील संदेश पाठवल्याच्या रागातून मित्रांनीच एका तरुणाची मॉब लिंचिंग करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.प्रतीक वाघे (२४) असे मृत तरुणाचे नाव असून, भूषण पाटील हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. विशेष म्हणजे, आरोपी भूषण हा व्यायामपटू असून प्रतीक वाघेचा जुना मित्र होता. दोघेही तीन वर्षांपासून एकमेकांच्या परिचयात होते. पूर्वी ते दोघे मिरारोड येथील भक्तिवेदांत हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉय म्हणून कार्यरत होते. प्रतीक सध्या तेथे नोकरी करत होता, तर भूषणने दोन वर्षांपूर्वी नोकरी सोडली होती. दरम्यान, प्रतीकने भूषणच्या प्रेयसीला इंस्टाग्रामवर अश्लील संदेश पाठविल्यानंतर भूषणने हा राग मनात धरला. २४ ऑगस्टच्या रात्री त्याने प्रतीकला मोरेगाव येथे बोलावून घेतले व आपल्या मित्रांसोबत बेदम मारहाण केली. यात प्रतीकचा मृत्यू झाला.
27 Aug 2025 08:55 AM (IST)
एकीकडे राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. त्यानुसार, अनेक तयारीही करण्यात आली. मात्र, विरारमध्ये एक दुर्घटना घडली. विरार पूर्वेच्या नारंगी येथील रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीची एक बाजू कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून, या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
27 Aug 2025 08:52 AM (IST)
गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना राज्यभरातील गणेशभक्तांचे विशेष आकर्षण असणाऱ्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखोंची गर्दी उसळते. यंदा भक्तांसाठी प्रसादाच्या स्वरूपात भोजन मिळावे यासाठी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पेरू कंपाऊंड परिसरात तीन अन्नछत्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या व्यवस्थेमुळे एकावेळी 500 हून अधिक भक्तांना जेवण घेता येईल, अशी सोय करण्यात आली होती. मात्र, संभाव्य गर्दी, चेंगराचेंगरीचा धोका आणि कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी या अन्नछत्राला परवानगी नाकारली. अग्निशमन दलानेही सुरक्षा धोक्याचे कारण देत प्रस्ताव फेटाळला.
27 Aug 2025 12:10 AM (IST)
आगामी पुणे महापालिका निवडणुकीत महायुतीतील तिन्ही घटक पक्षांनी एकत्रितपणे लढण्याचा निर्णय घेतला, तर महायुतीतील नाराज आणि बंडखोर नेत्यांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून मैदानात उतरावे लागणार आहे. दरम्यान, महायुतीने एकत्रित निवडणूक न लढवल्यास पुण्यातील बहुतांश प्रभागांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात थेट संघर्ष रंगण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे महापालिका निवडणुकीपूर्वी महायुतीसमोर युतीचा पेच कायम राहणार असून, राजकीय समीकरणे कशी बदलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Marathi Breaking news live updates: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतलेल्या मनोज जरांगे पाटील आज (२७ ऑगस्ट) मुंबईकडे रवाना होणार आहेत. आंतरवली सराटी येथून सकाळी १० वाजता ते निघणार असून, त्यांच्या सोबत लाखो मराठा आंदोलकही सहभागी होणार आहेत. जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. मात्र, या आंदोलनासाठी उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. तरीदेखील आपल्या निर्णयावर ठाम राहून ते मुंबईत पोहोचणार असल्याची माहिती समोर आली आहे.