Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today: इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल कोसळला; चार मृत, अनेक गंभीर

Marathi breaking live marathi : तळेगाव दाभाडे येथील मायमर रुग्णालयात 10 जणांना दाखल करण्यात आले असून, त्यातील दोघे आयसीयूमध्ये आहेत. इतरांना किरकोळ इजा झाल्यामुळे रात्रीच घरी सोडण्यात आले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 16, 2025 | 07:57 PM
Top Marathi News Today: इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल कोसळला; चार मृत, अनेक गंभीर
Follow Us
Close
Follow Us:

Marathi Breaking news live updates : मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवर असलेला कुंडमळा पूल रविवारी अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेच्या वेळी पुलावर सुमारे 100 पर्यटक उपस्थित असल्याची माहिती आहे. पूल कोसळताच अनेकजण नदीत वाहून गेले. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने (NDRF) काल बचावकार्य राबवून 51 नागरिकांना नदीतून सुरक्षित बाहेर काढले. यामध्ये दुर्दैवाने चार जणांचा मृत्यू झाला असून आठ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर सध्या पवना रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

 

The liveblog has ended.
  • 16 Jun 2025 07:23 PM (IST)

    16 Jun 2025 07:23 PM (IST)

    Uday Samant: संजय राऊतांच्या आरोपांना उदय सामंतांचे प्रत्युत्तर; म्हणाले...

    रत्नागिरी: आज राज्याचे उद्योगमंत्री उदयसामंत यांनी रत्नागिरी येथे पत्रकार परिषद घेऊन अनेक विषयांवर भाष्य केले आहे. त्यांनी आज संजय राऊत, बच्चू कडू आंदोलन, कुंडमळा दुर्घटना आशा अनेक विषयांवर भाष्य केले आहे. तर त्यांनी कुंडमळा दुर्घटनेवर संजय राऊत यांनी केलेल्या टिकेला देखील प्रत्युत्तर दिले आहे.

  • 16 Jun 2025 06:17 PM (IST)

    16 Jun 2025 06:17 PM (IST)

    Big Breaking: दिल्ली पोलिसांचे घुसखोरांविरुद्ध मोठे ऑपरेशन; तब्बल 36 बांग्लादेशींना थेट...

    दिल्ली: केंद्र सरकारने सध्या देशातील घुसखोरांविरुद्ध मोठी कारवाई सुरू केली आहे. प्रत्येक राज्यातून मोठ्या प्रमाणात बांग्लादेश घुसखोरांना पकडले जात आहे. दरम्यान दशाची राजधानी असलेल्या नवी दिली येथे देखील पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तब्बल 36 बांग्लादेशी घुसखोरांना पोलिसांनी अटक केली आहे.

  • 16 Jun 2025 05:59 PM (IST)

    16 Jun 2025 05:59 PM (IST)

    इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेवरुन नीलम गोऱ्हेंचं शिवेंद्रराजेंना पत्र

    पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे झालेल्या दुर्दैवी पुल दुर्घटनेत अनेक निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडले व काहीजण गंभीर जखमी झाले. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना पत्र लिहून या घटनेबाबत चिंता व्यक्त केली आहे.

    सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

  • 16 Jun 2025 05:25 PM (IST)

    16 Jun 2025 05:25 PM (IST)

    Mumbai Rain Update : मुसळधार पावसामुळे बदलापूर ते सीएसएमटी लोकलला गळती

    काही दिवस उसंत घेतलेल्या पावसाने शनीवारपासून जोरदार बॅटींगला सुरुवात केली आहे. मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्याचबरोबर या पावसाचा फटका रेल्वेवाहतूकीला ही मोठ्या प्रमाणात बसला आहे. बदलापूरकरांना रेल्वेच्या साडेसातीने अक्षरशः हैराण केले आहे. बदलापूर स्थानकातून सीएसएमटी कडे सकाळी 10.58 लोकलच्या छपराला गळती लागली असल्याने, पावसाचे सगळे पाणी थेट डब्यात साचत होते. यामुळे ऐन गर्दीत लोकल मध्ये असूनही चिंब भिजून, आणि आसनांवर देखील पाणी पडल्याने, प्रवाशांचे मोठे हाल झाले.

  • 16 Jun 2025 05:02 PM (IST)

    16 Jun 2025 05:02 PM (IST)

    बच्चू कडूंना मिळाली आंदोलनाच्या बदल्यात शिक्षा?

    प्रहार संघटनेचे नेते व माजी मंत्री बच्चू कड़ू हे मागील आठवड्यापासून चर्चेमध्ये आहेत. बच्चू कडू यांनी सात दिवसांचे अन्नत्याग आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि दिव्यागांसाठी हे त्यांनी आंदोलन केले. बच्चू कडू यांच्या या आंदोलनाची चर्चा राज्यभर झाली. मंत्र्यांनी मध्यस्थी केल्यानंतर बच्चू कडू यांनी उपोषण मागे घेतले. मात्र त्यानंतर बच्चू कडू यांना मोठा दणका मिळला आहे.

    (सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा)

  • 16 Jun 2025 05:00 PM (IST)

    16 Jun 2025 05:00 PM (IST)

    राजस्थान रॉयल्सचा ‘हा’ डॅशिंग फलंदाज बनला जुळ्या मुलांचा बाप

    कोलकाता नाईट रायडर्सचा माजी कर्णधार आणि सध्या राजस्थान रॉयल्सचा डॅशिंग फलंदाज नितीश राणाच्या घरी दोन गोंडस पाहुण्यांचे आगमन झाला आहे. त्याने सोमवारी स्वत: ही आनंदाची बातमी सांगितली आहे. भारतीय क्रिकेटपटू नितीश राणाच्या पत्नीने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. ज्यामुळे त्याचे चाहते खूप खुश असल्याचे दिसत आहेत.

  • 16 Jun 2025 04:56 PM (IST)

    16 Jun 2025 04:56 PM (IST)

    सेन्सेक्स ६७८ अंकांनी वाढला; आयटी, मेटल, तेल आणि रिअल्टी शेअर्स सर्वाधिक वधारले

    इस्रायल आणि इराणमधील वाढत्या भू-राजकीय तणावा असूनही, भारतीय शेअर बाजारांनी ताकद दाखवली आणि सोमवार, १६ जून रोजी तीक्ष्ण उडी नोंदवली. बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी५० मध्ये सुमारे १ टक्क्यांची वाढ दिसून आली. व्यवहाराच्या शेवटी, आयटी, धातू, रिॲलिटी आणि तेल समभागांमध्ये झालेल्या तेजीमुळे बीएसई सेन्सेक्स ६७७.५५ अंकांनी वाढून ८१,७९६.१५ वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी-५० २२७.९० अंकांच्या वाढीसह २४,९४६.५० वर बंद झाला.

    (सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा)

  • 16 Jun 2025 04:49 PM (IST)

    16 Jun 2025 04:49 PM (IST)

    इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेवरुन काँग्रेस आक्रमक

    पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील पुल कोसळून झालेले मृत्यू हे सरकारच्या हलगर्जीपणाने घेतलेले बळी आहेत. कुंडमळा येथे पावसाळ्यात शेकडो पर्यटक येतात याची माहिती असतानाही तो धोकादायक पुल खुला का ठेवला? असा प्रश्न विचारून हे सरकारने घेतलेले बळी आहेत, जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

    (सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा...)

  • 16 Jun 2025 04:34 PM (IST)

    16 Jun 2025 04:34 PM (IST)

    PM मोदींना सायप्रसचा सर्वोच्च नागरी सन्मान

    पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या G7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी कॅनडा दौऱ्यावर आहेत. त्याआधी त्यांनी सायप्रसला भेट दिली. यावेळी सायप्रस सरकारने सर्वोच्च नागरी सन्मान ‘ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस III’ने नरेंद्र मोंदींचा सन्मान करण्यात आला. सायप्रसची राजधानी निकोसिया येथील राष्ट्रपती भवनात झालेल्या भव्य समारंभात राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडुलाइड्स यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.

    (सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा...)

  • 16 Jun 2025 04:33 PM (IST)

    16 Jun 2025 04:33 PM (IST)

    ग्रेनस्पॅनचे इथेनॉल उत्पादन क्षेत्रात मोठे पाऊल

    केंद्रीय अन्न मंत्रालयाच्या व्याज अनुदान योजनेचा फायदा घेत , ग्रेनस्पॅन न्यूट्रिएंट्सने अहमदाबादमध्ये दोन धान्य-आधारित इथेनॉल प्लांट उभारण्यासाठी ५२० कोटी रुपये गुंतवले आहेत. आता कंपनी पेट्रोलमध्ये मिश्रण करण्यासाठी हिरव्या इंधनाचा पुरवठा करत आहे. हे दोन्ही प्लांट कच्चा माल (फीडस्टॉक) म्हणून मका आणि तांदूळ वापरतात आणि त्यांची एकूण क्षमता दररोज ३५० किलोलिटर आहे.

    ग्रेनस्पॅनचा पहिला इथेनॉल प्लांट मे २०२३ मध्ये अहमदाबादमधील भामसरा गावात सुरू करण्यात आला. त्याची क्षमता दररोज ११० किलोलिटर होती आणि तो गुजरातचा पहिला धान्य-आधारित इथेनॉल प्लांट होता. त्याच्या यशानंतर, कंपनीने गेल्या महिन्यात त्याच ठिकाणी दुसरा प्लांट सुरू केला, ज्याचा खर्च ३६० कोटी रुपये होता आणि ज्याची क्षमता दररोज २४० किलोलिटर होती.

    (सविस्तर बातमीच्या लिंकसाठी येथे क्लिक करा)

  • 16 Jun 2025 04:12 PM (IST)

    16 Jun 2025 04:12 PM (IST)

    कुंडमळा दुर्घटनेप्रकरणी मराठमोळ्या दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत

    पुण्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा हे एक पर्यटनस्थळ आहे. या पर्यटनस्थळाला भेट देण्यासाठी दरआठवड्याला हजारो पर्यटक येत असतात. विशेष म्हणजे, सुट्टीच्या दिवशीही याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी येतात. सुट्टीच्या दिवशी म्हणजेच, रविवारी १५ जून रोजी याठिकाणी एक मोठी दुर्घटना घडली. रविवारी दुपारी इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून काही पर्यटक वाहून गेले. या नदीच्या प्रवाहात तब्बल ३० ते ४० पर्यटक वाहून गेल्याचे वृत्त आहे. तर या घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी पुलावर जवळपास ५० च्या आसपास पर्यटक होते. त्यांच्या वजनामुळेच हा पुल पडल्याची चर्चा सुरु आहे, त्यासोबतच हा पुल देखील फार जुना होता.

    या घटनेनंतर राजकीय नेत्यांसोबत आता सेलिब्रिटींकडूनही प्रतिक्रिया येत आहे. अशातच मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक- लेखक हेमंत ढोमेनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्याने एक्सवर (ट्वीटर) ही विशेष पोस्ट शेअर केलेली आहे.

    (सविस्तर बातमीची लिंक येथे आहे.)

  • 16 Jun 2025 04:00 PM (IST)

    16 Jun 2025 04:00 PM (IST)

    ‘आनंदी, सुरक्षित अशी संस्कृती निर्माण करू..’, भारताच्या नवीन कसोटी कर्णधार शुभमन गिलचा दावा..

    भारताचा नवीन कसोटी कर्णधार शुभमन गिलने कधीही राष्ट्रीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करण्याचे स्वप्न पाहिले नव्हते, परंतु त्याने स्वतःसाठी एक ध्येय ठेवले आहे की अशी संघ संस्कृती निर्माण करावी जिथे प्रत्येक खेळाडू ‘सुरक्षित आणि आनंदी’ असेल. बदलाच्या टप्प्यातून जात असलेला भारत २००७ नंतरची पहिली कसोटी मालिका जिंकण्याच्या उद्देशाने इंग्लंडमध्ये आलाय. दोन्ही संघांमधील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना २० जूनपासून खेळला जाणार आहे.

  • 16 Jun 2025 03:48 PM (IST)

    16 Jun 2025 03:48 PM (IST)

    कोणत्याही परिस्थितीत सायंकाळपर्यंत तेहरान सोडा, परराष्ट्र मंत्रालयाचे आदेश

    इराण इस्रायलमधील तणाव वाढत असून इराणने तेल अविवमधील अमेरिकेच्या दूतावावर हल्ला केला आहे. युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारत सरकारने इराणची राजधानी तेहरानमधील भारतीय नागरिकांना सायंकाळपर्यंत शहर सोडण्याचे आदेश दिले आहेत. सध्या इराणमध्ये 10000 भारतीय नागरिक आणि 1500 विद्यार्थी अडकले आहेत.इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावाच्या पाश्वभूमीवर भारतीय विद्यार्थी आणि नोकरीसाठी इराणमध्ये गेलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येत आल्याची माहिती आहे.

  • 16 Jun 2025 03:44 PM (IST)

    16 Jun 2025 03:44 PM (IST)

    ठाण्यात दोन दिवस पाणीपुरवठा राहणार बंद

    ठाणे महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा अत्यावश्यक दुरुस्तीच्या कामामुळे गुरूवार दि.१९.०६.२०२५ रोजी सकाळी ९.०० वा. ते शुक्रवार दि.२०.०६.२०२५ रोजी सकाळी ९.०० वा पर्यंत बंद रहाणार आहे. त्या काळात ठाण्याच्या काही भागात १२ तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

  • 16 Jun 2025 03:43 PM (IST)

    16 Jun 2025 03:43 PM (IST)

    पलटी झालेल्या ट्रकची बसला भीषण धडक; चालक गंभीर…, चांदणी चौकात घडले काय?

    पुण्यात अपघातांचे सत्र सुरूच आहे. पुण्यातील महत्वाचे ठिकाण असणाऱ्या चांदणी चौकात भीषण अपघात घडला आहे. पुण्याच्या चांदणी चौकात तेलगळती झाल्याने एक ट्रक पलटी झाला आहे. त्यामुळे या ट्रकची बसला भीषण धडक बसली आहे. ट्रक पलटी झाल्यानंतर पाच ते सहा गाड्या एकमेकांना धडकल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातामुळे चांदणी चौकातील वाहतूक ठप्प झाली आहे. पुण्यातील चांदणी चौकात भीषण अपघात झालेला आहे. तेलगळती झाल्याने एक ट्रक उलटला आणि तो जाऊन बसला धडकला. या दहकेत बसचे मोठे नुकसान झाले आहे. या धडकेत बसचा चालक गंभीर जखमी झाला आहे. तसेच 5 ते 6 गाड्या एकमेकांना धडकल्याची माहिती समोर येत आहे. या भीषण अपघातामुळे चांदणी चौकात वाहतूक कोंडी झाली आहे.

  • 16 Jun 2025 03:31 PM (IST)

    16 Jun 2025 03:31 PM (IST)

    माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; अमित शहा राहणार उपस्थित

    गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. यामध्ये विमानातील एक प्रवासी सोडून सर्व प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचबरोबर क्रू मेंबर्स आणि विमान कोसळलेल्या वसतिगृहातील डॉक्टरांचा देखील यामध्ये मृत्यू झाला. यामध्ये आता मृतांचा आकडा 275 झाला असून यामुळे देशभरामध्ये हळहळ व्यक्त केली आहे. या अपघातामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला होता. अपघाताच्या तीन दिवसांनंतर रुपाणी यांचा मृतदेह सापडला असून आज (दि.16) त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

  • 16 Jun 2025 03:14 PM (IST)

    16 Jun 2025 03:14 PM (IST)

    महायुद्ध अटळ! ‘इराणने इस्रायलसाठी नरकाचे दरवाजे उघडले’; प्रचंड क्षेपणास्त्र हल्ल्याने तणाव शिगेला

    इस्रायलच्या अणुविरोधी कारवाईनंतर इराणने इस्रायलवर जोरदार प्रत्युत्तरात्मक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा करून जगाला हादरवून सोडले आहे. इराणने एकाचवेळी २०० हून अधिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले असून, यामध्ये १५० पेक्षा अधिक मध्यम पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे होती. त्यातील काही क्षेपणास्त्रे इस्रायलच्या अत्याधुनिक संरक्षण यंत्रणेला भेदून गेली असून, देशांतर्गत मोठा विनाश झाला आहे. इराणने अनेक वर्षांपासून विकसित केलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र क्षमतेचा हा परिणाम असून, इस्रायलसाठी हे युद्ध ‘नरकाचे दरवाजे’ उघडणारे ठरत आहे.

  • 16 Jun 2025 03:00 PM (IST)

    16 Jun 2025 03:00 PM (IST)

    उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं पहिलीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत

    उन्हाळी सुट्टीनंतर आता पुढील शैक्षणिक वर्षाची सुरुवात विदर्भ वगळता इतर सर्व विभागांत आजपासून तर विदर्भात सोमवार 23 जूनपासून होत आहे. शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी ‘शाळा प्रवेशोत्सवा’च्या माध्यमातून मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येत आहे. शाळा प्रवेशोत्सव २०२५ कार्यक्रमाअंतर्गत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शाळा सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा आलेगाव पुनर्वसन या शाळेत विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले.

  • 16 Jun 2025 02:45 PM (IST)

    16 Jun 2025 02:45 PM (IST)

    उल्हासनगरात नाल्यावरील पूल कोसळला

    गणेशनगर भागातील हा पूल कोसळल्याने ५०० पेक्षा जास्त घरांचा येण्या-जाण्याचा रस्ता बंद झालाय. या पुलाची मागील काही वर्षांपासून दुरावस्था झाली होती. मात्र उल्हासनगर महापालिकेनं त्याकडे दुर्लक्ष केल्यानं रविवारी सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास हा पूल कोसळला. हा पूल कोसळल्याने ५०० घरांचा येण्या-जाण्याचा मार्ग बंद झाला असून पालिकेच्या कारभारावर स्थानिकांनी संताप व्यक्त केलाय.

  • 16 Jun 2025 02:44 PM (IST)

    16 Jun 2025 02:44 PM (IST)

    चोर की साप? चक्क बियर शॉपच्या काउंटरमधून आत शिरला अन्…, पोलिसही झाले हैराण!

    नागपूरच्या एका बियर शॉपमध्ये २५ हजारांची चोरी झाली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी शॉपमधलं सीसीटीव्ही फुटेज हस्तगत केलं आणि ते तपासलं असता समोर जे दिसलं ते पाहून पोलीस हैराण झाले. पैश्यांसाठी त्या चोराने जे केलं त्याने सगळेच हैराण झाले. दुकानातून बॉटल विक्री करणाऱ्या खिडकीतून चक्क आत घुसून चोरी केली. बिअर शॉपच्या काऊंटरला असलेले ग्रील न कापता आत घुसणं आणि चोरी करणं म्हणजे अश्कयचं होतं. पण तरीही चोर आत घुसला आणि कॅश काऊंटरमधील 25 हजार रुपये पळवले. हे बघून सगळेच हैराण झाले. आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. आरोपीचं नाव शेख बाबा असे अटकेतील आरोपीचं नाव आहे. ही चोरीची घटना ६ जून रोजी घडली आहे.

  • 16 Jun 2025 02:43 PM (IST)

    16 Jun 2025 02:43 PM (IST)

    पायलट सुमित सभरवाल यांचे पार्थिव त्यांच्या घरी आणणार

    गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात पायलट सुमित सभरवाल यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मुंबईतील घरी आणि सोसायटीमध्ये सध्या दुःखाचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार DNA टेस्ट चा अहवाल आल्यानंतर सुमित सभरवाल यांचे पार्थिव त्यांच्या घरी आणले जाईल. त्यानंतर पवई येथे त्यांचे अंत्यसंस्कार केले जातील.

  • 16 Jun 2025 02:43 PM (IST)

    16 Jun 2025 02:43 PM (IST)

    सर्जरीनंतर दीपिका कक्करने मुलगा रुहानसोबत घालवला वेळ, कठीण काळ आठवून झाली भावुक!

    टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर हिच्या यकृताची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. सुमारे एक आठवडा रुग्णालयात राहिल्यानंतर, अभिनेत्री अखेर घरी परतली आहे. शोएब इब्राहिम तिच्या प्रकृतीबद्दल सतत चाहत्यांना अपडेट देत आहे. व्हीलॉगद्वारे शोएबने सांगितले होते की गेल्या काही काळ त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी खूप कठीण होता. सध्या, अभिनेत्री पूर्वीपेक्षा खूपच बरी आहे आणि तिचा मुलगा रुहानसोबत दर्जेदार वेळ घालवत आहे. शोएब इब्राहिम देखील तिच्यासोबत आहे आणि त्याने व्हीलॉगद्वारे एक झलक दाखवली आहे.

     

  • 16 Jun 2025 02:42 PM (IST)

    16 Jun 2025 02:42 PM (IST)

    Firecracker Factory Blast: मोठी बातमी! फटाक्यांच्या अवैध कारखान्यात भीषण स्फोट; 6 कामगार ठार

    उत्तर प्रदेशमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. उत्तर प्रदेशच्या अमरोहा जिल्ह्यात फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. अमरोहा जिल्ह्यातील अतरासी या गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे. या गावात अवैधरीत्या फटाक्यांचा कारखाना चालवला जात होता. या कारखान्यात मोठ्या संख्येने कामगार काम करत होते. काम सुरू असताना अचानक या कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे.

    या फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला असल्याने संपूर्ण फॅक्टरीच उद्ध्वस्त झाली आहे. या भीषण स्फोटामध्ये 6 मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर 6 पेक्षा जास्त कामगार हे जखमी झाले आहेत. या भीषण स्फोटात संपूर्ण करखानाच उद्ध्वस्त झाला आहे. या ढीगाऱ्याखाली 12 पेक्षा जास्त कामगार अडकल्याचे समजते आहे.

  • 16 Jun 2025 02:41 PM (IST)

    16 Jun 2025 02:41 PM (IST)

    IND Vs ENG : Shardul Thakur ने फोडली डरकाळी! इंग्लंडच्या गोटात चिंता; कसोटी मालिकेपूर्वी ठोकले शतक..

    टीम इंडियाचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंडविरुद्ध २० जूनपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. तथापि, ही मालिका सुरू होण्यापूर्वी, भारतीय अष्टपैलू शार्दुल ठाकूरने आपली शानदार कामगिरी दाखवून दिली आहे.  त्याच्या कामगिरीने एकप्रकारे त्याने  ब्रिटिशांना इशाराच दिला आहे.  अधिक माहिती अशी की, शार्दुल ठाकूरने भारतीय कसोटी संघात पुनरागमन केले आहे. रविवारी, १५ जून रोजी, त्याने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये निवडीसाठी जोरदार दावा ठोकला आहे. उजव्या हाताच्या या फलंदाजाने सध्या सुरू असलेल्या आंतर-संघ सामन्यात नाबाद १२२ धावांची खेळी केली आहे.

  • 16 Jun 2025 02:41 PM (IST)

    16 Jun 2025 02:41 PM (IST)

    Viscacha : किती गोड! दक्षिण अमेरिकेतील आळशी दिसणारा, पण साहसी आणि कणखर असा ‘हा’ गोंडस छोटा प्राणी

    दक्षिण अमेरिकेच्या नैसर्गिक जैवविविधतेत एक अद्भुत आणि लक्षवेधी प्राणी आहे विस्काचा उंदीर. चिंचिलाचा जवळचा भाऊ असलेला हा उंदीर दिसायला थोडा आळशी व थकलेला भासतो, पण त्याचा स्वभाव मात्र त्याच्या चेहऱ्याशी फारकत घेणारा आहे. विस्काचा हा उंदीर खरं तर खूपच चैतन्यशील, कणखर आणि आव्हानात्मक वातावरणाशी जुळवून घेणारा एक सामाजिक प्राणी आहे. विस्काचा या प्राण्याचे दोन मुख्य प्रकार आढळतात मैदानी विस्काचा आणि पर्वतीय विस्काचा. हे दोन्ही प्रकार त्यांच्या निवासस्थानी, स्वभावात आणि सवयींमध्ये स्पष्ट फरक दर्शवतात. मैदानी विस्काचा प्राणी दक्षिण अमेरिकेतील गवताळ व सखल प्रदेशांमध्ये आढळतो. हे विस्काचे मोठे बिळे खोदण्याची क्षमता असते, आणि ते आपल्या कळपाशी संवाद साधण्यासाठी मोठ्याने आवाज करतात. त्यांच्या आवाजातून एक प्रकारचा सामाजिक संवाद घडतो, ज्यामुळे त्यांच्या वसाहती अधिक सशक्त व सुरळीत राहतात.

  • 16 Jun 2025 02:40 PM (IST)

    16 Jun 2025 02:40 PM (IST)

    महिलांच्या त्वचेसाठी वरदान ठरेल कोरफड गर! ‘या’ पद्धतीने करा नियमित वापर, त्वचेवर दिसून येईल चमकदार ग्लो

    पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत महिलांसह पुरुष सुद्धा त्वचेसाठी कोरफड जेल वापरतात. कोरफड जेलच्या वापरामुळे त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार होते. त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कोरफड जेल वापरावे. कोरफड जेल त्वचेसोबत केसांसाठी सुद्धा वापरले जाते. यामध्ये आढळून येणारे अ‍ॅंटी-ऑक्सीडेंट्स त्वचेचे फ्री रिडिकोल्सपासून रक्षण करतात. उन्हामुळे वाढलेले टॅनिंग किंवा चेहऱ्यावर आलेले पिंपल्स आणि मुरूम घालवण्यासाठी कोरफड जेलचा वापर तुम्ही करू शकता. त्वचा स्वच्छ करण्यासाठी कोरफड जेल वापरावे. यामुळे चेहऱ्यावर आलेले डाग, पिंपल्स, ब्लॅकहेड्स आणि पिगमेंटेशन कमी होऊन त्वचा सुधारते. अनेक लोक कोरफड जेलचा वापर करून त्वचा स्वच्छ करतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोरफड जेलचा वापर कसा करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

  • 16 Jun 2025 02:39 PM (IST)

    16 Jun 2025 02:39 PM (IST)

    शेअर बाजार तेजीत, मात्र टाटा मोटर्सच्या शेअरच्या किमतीत मोठी घसरण, कारण काय?

    सोमवारी बाजार उघडताच टाटा मोटर्सचे शेअर्स कोसळले. कंपनीचे शेअर्स बीएसईमध्ये ५ टक्क्यांहून अधिक घसरून ६७२.७५ रुपयांवर आले. टाटा मोटर्सची युकेस्थित उपकंपनी जग्वार लैंड रोव्हर (जेएलआर) ने चालू आर्थिक वर्षात कमकुवत आर्थिक कामगिरीचा अंदाज वर्तवला आहे, त्यानंतर टाटा मोटर्सचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. गेल्या एका वर्षात टाटा ग्रुपच्या ऑटोमोबाईल कंपनीचे शेअर्स ३२ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. टाटा मोटर्सच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी ११७९.०५ रुपये आहे. त्याच वेळी, कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ५४२.५५ रुपये आहे.

  • 16 Jun 2025 01:55 PM (IST)

    16 Jun 2025 01:55 PM (IST)

    कुंडमळा दुर्घटनेवर राज ठाकरे स्पष्टच बोलले

    मावळ भागातील कुंडमळा येथील पुल पडून दुर्घटना झाली आहे. लोखंडी असलेला हा पुल कोसळल्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रविवार असल्यामुळे कुंडमळ्यावर मोठी गर्दी होती. पुलाची दुर्घटना झाल्यानंतर पुलावरुन 50 हून अधिक पर्यटक खाली कोसळले. या घटनेमध्ये चार पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे करण्यात येईल, तसेच जखमींच्या उपचाराचा खर्च सुद्धा राज्य सरकार करणार आहे.

  • 16 Jun 2025 01:54 PM (IST)

    16 Jun 2025 01:54 PM (IST)

    मुंबई मेट्रो 1 मध्ये तांत्रिक बिघाड

    मुंबई मेट्रो 1 मध्ये तांत्रिक बिघाड झाला असून वर्सोवाकडे जाणाऱ्या मार्गिकेवर तांत्रिक बिघाड झाला आहे. बिघाडामुळे गेल्या 15 मिनिटांपासून घाटकोपर – वर्सोवा मेट्रो खोळंबल्या आहेत.

  • 16 Jun 2025 01:53 PM (IST)

    16 Jun 2025 01:53 PM (IST)

    शेअर बाजार तेजीत, मात्र टाटा मोटर्सच्या शेअरच्या किमतीत मोठी घसरण, कारण काय?

    सोमवारी बाजार उघडताच टाटा मोटर्सचे शेअर्स कोसळले. कंपनीचे शेअर्स बीएसईमध्ये ५ टक्क्यांहून अधिक घसरून ६७२.७५ रुपयांवर आले. टाटा मोटर्सची युकेस्थित उपकंपनी जग्वार लैंड रोव्हर (जेएलआर) ने चालू आर्थिक वर्षात कमकुवत आर्थिक कामगिरीचा अंदाज वर्तवला आहे, त्यानंतर टाटा मोटर्सचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. गेल्या एका वर्षात टाटा ग्रुपच्या ऑटोमोबाईल कंपनीचे शेअर्स ३२ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत.

  • 16 Jun 2025 01:40 PM (IST)

    16 Jun 2025 01:40 PM (IST)

    सर गंगाराम रुग्णालयात भरती; आता कशी हे सोनिया गांधींची तब्येत?

    काँग्रेसच्या माजी  अध्यक्षा सोनिया गांधी यांना रविवारी (१५ जून)  रात्री अचानक दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोटाशी संबंधित समस्येमुळे त्यांना गॅस्ट्रो विभागात दाखल करण्यात आले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशी माहिती अहवालातून समोर आली हे. जूनमध्ये ७८ सोनिया गांधी  यांना एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  • 16 Jun 2025 01:38 PM (IST)

    16 Jun 2025 01:38 PM (IST)

    तेल अवीवमधील अमेरिकन दूतावासावर इराणचा हल्ला

    मध्य पूर्वेत इराण आणि इस्रायलमध्ये तीव्र संघर्ष सुरु झाला आहे. दोन्ही देश एकमेकांवर तीव्र हल्ले करत आहेत. दरम्यान या युद्धात अमेरिका देखील ओढली गेली आहे. इराणने इस्रायलच्या तेल अवीव येथील अमेरिकन दूतावासांवर क्षेपणास्त्रे डागली आहे. या हल्ल्या दूतावासाच्या इमारतीचा एक भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. अद्याप कोणत्याही जीवितहानीची माहिची समोर आलेली नाही.

  • 16 Jun 2025 01:27 PM (IST)

    16 Jun 2025 01:27 PM (IST)

    Apple फ्रीमध्ये दुरुस्त करणार हे डिव्हाईस

    टेक जायंट कंपनी अ‍ॅपल केवळ त्यांच्या प्रिमियम डिव्हाईससाठीच नाही तर त्यांच्या सर्विससाठी देखील जगभरात प्रसिद्ध आहे. अ‍ॅपलच्या प्रत्येक डिव्हाईसची युजर्समध्ये एक वेगळीच क्रेझ आहे. या डिव्हाईसची किंमत जास्त असली तरी त्यामध्ये अनेक फीचर्स आणि सिक्योरिटी अपडेट देखील दिलेले असतात. इतर टेक कंपन्यांच्या डिव्हाईसशी तुलना करता अ‍ॅपल डिव्हाईसमध्ये फार कमी समस्या पाहायला मिळतात.

  • 16 Jun 2025 01:25 PM (IST)

    16 Jun 2025 01:25 PM (IST)

    पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे लग्न का बनले आहे चर्चेचा विषय?

    पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान शाहबाज शरीफ हे केवळ त्यांच्या राजकीय भूमिकेमुळेच नव्हे, तर त्यांच्या वैयक्तिक आणि वैवाहिक जीवनामुळेही सातत्याने चर्चेत असतात. त्यांच्या विवाहांचे आणि नातेसंबंधांचे अनेक पदर पाकिस्तानी समाजमाध्यमांपासून ते राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यांनी आतापर्यंत अधिकृतपणे चार वेळा लग्न केले असून, या विवाहांभोवती अनेक गुप्तता, गोंधळ आणि वाद आहेत.

  • 16 Jun 2025 01:18 PM (IST)

    16 Jun 2025 01:18 PM (IST)

    पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ महिला नेत्याने दिला राजीनामा

    महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले आहे. सर्व एक्झिट पोलचे निष्कर्ष खोटे ठरवत महायुतीने जोरदार मुसंडी मारली. यानंतर महाविकास आघाडीतील अनेक नेते महायुतीत प्रवेश करत आहेत. काँग्रेस पक्षामधून सुरू झालेले आऊट गोइंगही थांबायला तयार नसल्याचे दिसत आहे. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सात वर्षे महिला पुणे शहराध्यक्ष म्हणून काम केलेल्या सोनाली मारणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना पाठविल्याची माहिती समोर आली आहे.

  • 16 Jun 2025 01:15 PM (IST)

    16 Jun 2025 01:15 PM (IST)

    पोलो क्लबमधून संजय कपूर यांचा समोर आला शेवटचा फोटो

    बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा एक्स पती आणि उद्योगपती संजय कपूर यांच्या निधनाला चार दिवस उलटले आहेत. त्यांच्या अंत्यसंस्कारांना बराच वेळ लागत आहे. दोन दिवसांपूर्वी सासरे अशोक सचदेव यांनी सांगितले होते की, लंडनहून भारतात मृतदेह आणण्यासाठी कागदपत्रांचे काम सुरू आहे, ज्यामध्ये वेळ लागत आहे. दरम्यान, संजय कपूर यांचा त्यांच्या मृत्यूपूर्वीचा शेवटचा फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे.

  • 16 Jun 2025 01:13 PM (IST)

    16 Jun 2025 01:13 PM (IST)

    MHT CET Result 2025: PCM गटाच्या सीईटीचा निकाल आज; PCB चा निकाल लवकरच

    आज म्हणजे १६ जून (सोमवारी) पीसीएम (PCM) गटाचा निकाल जाहीर झाला आहे. तर पीसीबी (PCB) गटाचा निकाल उद्या म्हणजेच १७ जूनला जाहीर होणार आहे. https://cetcell.mahacet.org/ या वेबसाईटवर तुम्हाला निकाल पाहायला मिळेल.  चला जाणून घेऊया कोणतया वेबसाईट वर जाहीर निकाल होणार, कधी आणि कसा बघता येईल?  सविस्तर बातमी

  • 16 Jun 2025 01:05 PM (IST)

    16 Jun 2025 01:05 PM (IST)

    सौदी एअरलाईन्सच्या विमानाची लखनऊमध्ये आत्पातकालीन लँडिंग

    सौदी अरेबियाहून येणाऱ्या विमानाच्या चाकांमधून अचानक ठिणग्या आणि धूर येऊ लागल्याने लखनऊ विमानतळावर गोंधळ उडाला. फ्लाइट एसव्ही ३११२ रात्री १०:४५ वाजता जेद्दाहहून निघाली. हज यात्रा पूर्ण केलेल्या २५० प्रवाशांना घेऊन जाणारे हे विमान सौदी अरेबियाहून लखनौ विमानतळावर पोहोचले होते. विमान धावपट्टीवरून पुढे जात असताना, डाव्या चाकातून धूर आणि ठिणग्या बाहेर पडताना दिसल्या, त्यामुळे वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमान लँडिंग रोखले.

  • 16 Jun 2025 01:00 PM (IST)

    16 Jun 2025 01:00 PM (IST)

    ‘Air India’च्या विमानात पुन्हा तांत्रिक बिघाड

    एअर इंडियाच्या विमानांमध्ये तांत्रिक बिघाडांच्या घटनांची मालिका सुरूच असून सोमवारी पुन्हा एक घटना समोर आली. हाँगकाँगहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर विमानात उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याचा संशय आल्याने विमानाला मध्येच परत वळवण्यात आले. सुदैवाने, या घटनेत सर्व प्रवासी, पायलट आणि केबिन क्रू सुरक्षित असून कोणत्याही जणास इजा झाल्याचे वृत्त नाही.

  • 16 Jun 2025 12:46 PM (IST)

    16 Jun 2025 12:46 PM (IST)

    भारतात जनगणना दोन टप्प्यात होणार

    अखेर जनगणनेची दीर्घकाळापासूनची प्रतीक्षा संपली आहे. याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली असून गृहमंत्री अमित शहा यांनी ही माहिती दिली. केंद्र सरकारने २०२७ मध्ये भारताची जनगणना केली जाईल अशी घोषणा केली आहे, त्यासाठी एक राजपत्र अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

  • 16 Jun 2025 12:16 PM (IST)

    16 Jun 2025 12:16 PM (IST)

    इराण हल्ल्यात अमेरिकन दूतावासाचेही नुकसान

    अमेरिकेचे राजदूत माइक हकाबी यांनी सोमवारी सांगितले की, तेल अवीवमधील अमेरिकन दूतावासाजवळ इराणी क्षेपणास्त्र पडल्याने त्याचे किरकोळ नुकसान झाले.

  • 16 Jun 2025 11:42 AM (IST)

    16 Jun 2025 11:42 AM (IST)

    विजय रुपानी यांचा मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द करणार

    गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या मृतदेहाची काल ओळख पटली असून त्याचा मृतदेह आज नातेवाईकांना सुपूर्द करणार आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हजर राहणार आहेत. थोड्याच वेळात विजय रूपानी यांचा मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द केला जाणार आहे.

  • 16 Jun 2025 11:26 AM (IST)

    16 Jun 2025 11:26 AM (IST)

    कुंडमळा पूल दुर्घटनेची जबाबादारी अजित पवारांनी स्वीकारावी - संजय राऊत

    कुंडमळा पूल दुर्घटना ही सरकारच्या नाकर्तेपणाची बेजबाबदारपणाची आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या घटनेची जबाबदारी घेतली पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.

  • 16 Jun 2025 11:14 AM (IST)

    16 Jun 2025 11:14 AM (IST)

    सौदी एअरलाइन्सच्या विमानाचे आपात्कालीन लँडिंग

    अहमदाबादच्या विमान दुर्घटनेची आठवण ताजी असतानाच, लखनौच्या चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी पहाटे मोठा अपघात टळला. सौदी अरेबियातून हज यात्रेकरूंना घेऊन येणाऱ्या सौदी एअरलाइन्सच्या विमानात लँडिंगदरम्यान तांत्रिक बिघाड झाला.विमानात एकूण २५० प्रवासी प्रवास करत होते. उतरताना विमानाच्या चाकात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने ठिणग्या उडाल्या आणि चाकातून धूर बाहेर येऊ लागला. काही क्षणासाठी घबराटीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने आग भीषण स्वरूप धारण करण्यापूर्वीच ती नियंत्रणात आली आणि मोठी दुर्घटना टळली. विमानातील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

  • 16 Jun 2025 11:14 AM (IST)

    16 Jun 2025 11:14 AM (IST)

    कोथरुडमध्ये चार चाकी वाहनाचा मध्यरात्री अपघात

    कोथरूड, वेदभवन येथील पुलावर पहाटे पाच वाजता ३ ते ४ चारचाकी वाहनांचा अपघात झाला. या अडकलेल्या एका वाहनचालकाला अग्निशमन दलाने जखमी अवस्थेत बाहेर काढून रुग्णवाहिकेतून रुग्णालयात रवाना केले

  • 16 Jun 2025 11:07 AM (IST)

    16 Jun 2025 11:07 AM (IST)

    सिंधुदुर्ग – कोल्हापूर वाहतूक ठप्प

    करुळ घाटामध्ये दरड कोसळल्याची माहिती मिळत आहे.दरड कोसळल्यामुळे सिंधुदुर्ग – कोल्हापूर वाहतूक ठप्प झाली आहे.

  • 16 Jun 2025 11:00 AM (IST)

    16 Jun 2025 11:00 AM (IST)

    दौंड-पुणे रेल्वेला आग

    दौंडहून पुण्याला येणाऱ्या डेमू ट्रेनच्या एका डब्यात आग लागली. ट्रेनच्या तिसऱ्या बोगीला आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 07:05 वाजता दौंडवरून निघालेल्या शटल ट्रेनच्या एका डब्यातील टॉयलेटमध्ये अचानक आग लागली. घटनेची माहिती प्रवाशांनी तातडीने स्टेशन मास्तरला दिली. आग आटोक्यात आणण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न करण्यात आले.

  • 16 Jun 2025 10:56 AM (IST)

    16 Jun 2025 10:56 AM (IST)

    मुंबईत बेस्ट बसचा अपघात

    गिरगावातील मेट्रो स्थानकाजवळ बस पाच फूट खड्ड्यात गेली. रस्ता खचल्याने बेस्ट बस खड्ड्यात गेली.

  • 16 Jun 2025 10:55 AM (IST)

    16 Jun 2025 10:55 AM (IST)

    इराणमध्ये 244 नागरिकांचा मृत्यू

    इस्त्रायल इराण एकमेकांवर हल्ला प्रतिहल्ला करत आहेत. मात्र, इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये इराणची प्रचंड हानी झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरु असणाऱ्या हल्ल्यांमध्ये इराणीमधील 224 लोकांचा मृत्यू 1200 हून अधिक जखमी झाल्याचे इराणच्याच आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे.

  • 16 Jun 2025 09:54 AM (IST)

    16 Jun 2025 09:54 AM (IST)

    इराणमध्ये सत्तापालट घडवून आणण्याबद्दल इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांचा मोठा दावा

    मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने एक मोठा आणि स्पष्ट भूमिका मांडत इराणच्या सत्तास्थितीबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. इस्रायलचे परराष्ट्रमंत्री गिदोन सार यांनी म्हटले आहे की, इस्रायलला इराणमध्ये सत्तापालट घडवून आणण्याची इच्छा नाही, आणि इराणच्या सर्वोच्च नेत्यांना मारण्याचा कोणताही सरकारचा अजेंडा नाही. ही प्रतिक्रिया सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत आली असून, अलीकडेच इस्रायल-इराण दरम्यान वाढलेले लष्करी तणाव, आणि इस्रायलकडून इराणच्या सुमारे ३० लष्करी अधिकाऱ्यांवर केलेले लक्ष्यबद्ध हल्ले, यामुळे चर्चेचा विषय बनले होते की इस्रायल इराणच्या सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनाही लक्ष्य करणार का?

Web Title: Marathi breaking news today live updates political sports crime national international business breaking news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2025 | 08:47 AM

Topics:  

  • Maharashtra Breakig News

संबंधित बातम्या

Top Marathi News Today Live: अमरावती एटीएस आणि ग्रामीण पोलिसांची संयुक्त कारवाई; ११ जण शस्त्रांसह जेरबंद
1

Top Marathi News Today Live: अमरावती एटीएस आणि ग्रामीण पोलिसांची संयुक्त कारवाई; ११ जण शस्त्रांसह जेरबंद

Top Marathi News Today: अखेर 12 दिवसानंतर इराण-इस्त्रालय देशांमध्ये युद्धबंदीची घोषणा
2

Top Marathi News Today: अखेर 12 दिवसानंतर इराण-इस्त्रालय देशांमध्ये युद्धबंदीची घोषणा

Top Marathi News Today: IG जालिंदर सुपेकरांचा कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार काढला
3

Top Marathi News Today: IG जालिंदर सुपेकरांचा कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार काढला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.