Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बीड जिल्ह्यातील टोळीवर सलग दुसऱ्यांदा मोक्काची कारवाई

सातारा जिल्ह्यातील वडूज, औंध, उंब्रज येथे दरोडा टाकणे, जीवे मारण्याची धमकी देणे, जबरी चोरी, घरफोडी अशा गुन्ह्यांच्या माध्यमातून दहशत निर्माण करणाऱ्या होमराज उर्फ होम्या उद्धव काळे याच्यासह नऊ जणांच्या बीड जिल्ह्यातील टोळीला पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दुसऱ्यांदा मोक्काअंतर्गत कारवाई केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 09, 2022 | 07:30 PM
बीड जिल्ह्यातील टोळीवर सलग दुसऱ्यांदा मोक्काची कारवाई
Follow Us
Close
Follow Us:

सातारा : सातारा जिल्ह्यातील वडूज, औंध, उंब्रज येथे दरोडा टाकणे, जीवे मारण्याची धमकी देणे, जबरी चोरी, घरफोडी अशा गुन्ह्यांच्या माध्यमातून दहशत निर्माण करणाऱ्या होमराज उर्फ होम्या उद्धव काळे याच्यासह नऊ जणांच्या बीड जिल्ह्यातील टोळीला पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दुसऱ्यांदा मोक्काअंतर्गत कारवाई केली. या प्रस्तावाला विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांनी नुकतीच मंजुरी दिली आहे.

होमराज उर्फ होम्या उद्धव काळे (वय 40 रा. वाकी शिवार, तालुका आष्टी, बीड) हा टोळीचा प्रमुख आहे. अजय उर्फ आजा सुभाष भोसले (वय 23 रा. माहिजळगाव, तालुका कर्जत, नगर), सचिन उर्फ आरसी सुभाष भोसले (वय 24 रा. माहिजळगाव तालुका कर्जत) अविनाश उर्फ महिंद्रा सुभाष भोसले वैद्य (वय 22 माहिजळगाव तालुका कर्जत), राहुल भोसले (वय 28 रा. पारगाव पोस्ट पाथर्डी, नगर), अतुल लायलन भोसले (रा.आष्टी, बीड), भल्या उर्फ धर्मेंद्र काळे (रा. चिखली तालुका आष्टी), कानिफनाथ उद्धव काळे (रा. वाकी तालुका आष्टी), गणेश उर्फ बन्‍सी काळे (रा. राशीन) अशी टोळी सदस्यांची नावे आहेत.

या टोळीने उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये लुटमारीचे गुन्हे केले होते. वडूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत खडकाचा माळ शिवारात फिर्यादीच्या घराचा दरवाजा उचकटून फिर्यादीची पत्नी शांताबाईच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांच्या घरातील एक लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला होता.

वडूज पोलीस ठाण्यामध्ये यासंदर्भात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या टोळीने आर्थिक फायद्यासाठी सातारा जिल्ह्यातील वडूज, औंध, उंब्रज तसेच महाराष्ट्रातील पुणे, बीड, नगर जिल्ह्यातील पोलिस ठाणे हद्दीत जबरी चोऱ्यांचे प्रकार केले होते. सोन्या-चांदीचे दागिने लांबवणे, रोख रकमेची लूटमार करणे, जबर दुखापत करणे, इत्यादी गुन्ह्यांची नोंद या टोळीवर होती.

Web Title: Mcoca action by satara sp on gang of beed nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2022 | 07:30 PM

Topics:  

  • MCOCA Action

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.