Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवी मुंबई पालिकेचे वैदयकीय महाविदयालय होणार सुरु,नॅशनल मेडिकल कमिशनची परवानगी प्राप्त

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगामार्फत नवी मुंबई महानगरपालिकेचे 'पदव्युत्तर पदवी वैद्यकीय महाविद्यालय ’ सुरु करण्यास परवानगी प्राप्त झाली आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना गणेशोत्सवात आरोग्यपूर्ण भेट मिळाली आहे.

  • By नारायण परब
Updated On: Sep 10, 2024 | 07:48 PM
फोटो सौजन्य- प्रतिनिधी

फोटो सौजन्य- प्रतिनिधी

Follow Us
Close
Follow Us:

नवी मुंबई महानगरपालिकेचे ‘पदव्युत्तर पदवी वैद्यकीय महाविद्यालय ’ सुरु करण्यास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगामार्फत परवानगी प्राप्त झालेली आहे. यामुळे नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणे महानगरपालिकेस शक्य होणार असून महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेचे सक्षमीकरण होणार असल्याचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले आहे.यामुळे नवी मुंबईकर नागरिकांना गणेशोत्सवाची आरोग्यपूर्ण भेट मिळाली आहे.

महानगरपालिकेचे पदव्युत्तर वैदयकीय महाविदयालय सुरु करण्यासाठी राज्य शासन व केंद्र शासन पातळीवर सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. राज्य शासनामार्फत आवश्यक परवानगी प्राप्त होण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले व त्यांनी संबंधित विभागांस जलद कार्यवाहीचे निर्देश दिले होते. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री .देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही आवश्यक परवानगी प्राप्त व्हावी यादृष्टीने सहकार्य लाभले.

त्यानुसार राज्य शासनामार्फत आवश्यक परवानग्या प्राप्त झाल्यानंतर ठाणे लोकसभा सदस्य खा. नरेश म्हस्के यांनी यामध्ये विशेष पुढाकार घेत केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री प्रतापराव जाधव व केंद्रीय आरोग्य विभाग यांच्याकडे परवानगी मिळण्याबाबत पत्रव्यवहार करुन व प्रत्यक्ष भेटून सातत्याने पाठपुरावा केला. याचा सकारात्मक परिणाम होत राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची नवी मुंबई महानगरपालिका पदव्युत्तर पदवी वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यास परवानगी प्राप्त झाली असून ही नवी मुंबईकरांना गणेशोत्सवात मिळालेली मौल्यवान आरोग्यपूर्ण भेट आहे.

चार शाखांच्या इतक्या जागा मिळाल्या

सदर मंजूरीनुसार पीजी मेडीकल सायन्स इन्स्टिटयुटमध्ये पहिल्या टप्प्यात ‘मेडिसीन (3 सीट्स)’, ‘ऑर्थोपॅडीक (2 सीट्स)’, ‘गायनॅकोलॉजी (8 सीट्स)’ व ‘पिडीयाट्रीक (4 सीट्स)’ अशा 4 शाखा सुरु कऱण्यात येत असून लवकरच ‘सर्जरी’ याही शाखेला परवानगी प्राप्त होणार आहे.

मेडीकल सायन्स इन्स्टिटयुट सुरु करण्यासाठी महानगरपालिकेच्या वाशी व नेरुळ सार्वजनिक रुग्णालयात सर्व आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे डीन, प्राध्यापक, सहा. प्राध्यापक व आवश्यक कर्मचारीवर्ग उपलब्ध करून घेण्यात आलेला आहे. त्यामुळे या शैक्षणिक वर्षात लवकरच महाविद्यालय सुरू केले जाणार आहे.

महानगरपालिकेच्या आऱोग्य विभागाचे सक्षमीकरण होणार

या पदव्युत्तर पदवी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रशिक्षित एमबीबीएस डॉक्टर पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी येतील व नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयातील रुग्णांवरील उपचारांसाठी या प्रशिक्षित डॉक्टर्सचा उपयोग होईल. याद्वारे महापालिका रूग्णालयात मेडिकल इन्टेसिव्ह केअर, पिडीयाट्रीक इन्टेसिव्ह केअर, इमर्जन्सी ॲण्ड ट्रॉमा सर्व्हिसेस अशा सुपर स्पेशालिटी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. या माध्यमातून महानगरपालिकेच्या आऱोग्य विभागाचे सक्षमीकरण होणार असून नवी मुंबईकर नागरिकांना महानगरपालिका रुग्णालयात अधिक उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.

Web Title: Medical college of navi mumbai municipality will be started permission of national medical commission has been obtained

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2024 | 07:46 PM

Topics:  

  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

Women’s World Cup 2025: महिला क्रिकेट विश्वचषक ठरला ‘पर्यावरणपूरक’! DY पाटील स्टेडियमवर ६३ टन कचऱ्याचे यशस्वी व्यवस्थापन
1

Women’s World Cup 2025: महिला क्रिकेट विश्वचषक ठरला ‘पर्यावरणपूरक’! DY पाटील स्टेडियमवर ६३ टन कचऱ्याचे यशस्वी व्यवस्थापन

मराठी भाषिकांना 80 टक्के नोकऱ्या देणाऱ्या धोरणाचे तीन तेरा; 1लाख नोकऱ्या सरकार परप्रांतीयांच्या घशात घालणार, मनसेचा आरोप
2

मराठी भाषिकांना 80 टक्के नोकऱ्या देणाऱ्या धोरणाचे तीन तेरा; 1लाख नोकऱ्या सरकार परप्रांतीयांच्या घशात घालणार, मनसेचा आरोप

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे घणसोली रस्त्याचे काम रखडले; आयुक्तांनी लक्ष घालण्याची मागणी
3

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे घणसोली रस्त्याचे काम रखडले; आयुक्तांनी लक्ष घालण्याची मागणी

Navi Mumbai : कॅन्सर नोंदणी सुरू करणारी पहिली महानगरपालिका ; नवी मुंबई मनपाची आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी केलं कौैतुक
4

Navi Mumbai : कॅन्सर नोंदणी सुरू करणारी पहिली महानगरपालिका ; नवी मुंबई मनपाची आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी केलं कौैतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.