Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai : हायवे की मृत्यूचा सापळा ? पामबीच मार्गावर दुचाकी स्वाराचा अपघातात मृत्यू

पामबीच मार्गावर एका दुचाकी स्वाराचा अपघात हाऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास एनआरआय सिग्नलच्या पुढे काही अंतरावर हा अपघात झाला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 03, 2026 | 07:58 PM
Navi Mumbai : हायवे की मृत्यूचा सापळा ? पामबीच मार्गावर दुचाकी स्वाराचा अपघातात मृत्यू
Follow Us
Follow Us:
  • हायवे की मृत्यूचा सापळा ?
  • पामबीच मार्गावर दुचाकी स्वाराचा अपघातात मृत्यू
नवी मुंबई /सावन वैश्य : पामबीच मार्गावर एका दुचाकी स्वाराचा अपघात हाऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास एनआरआय सिग्नलच्या पुढे काही अंतरावर हा अपघात झाला. विपुल महेंद्र कंगाली असं अपघातात मृत्यू झालेल्या युवकाच नाव असून तो नागपूरहुन लग्नकार्यासाठी नवी मुंबईत आला असल्याची माहिती समोर येत आहे.

क्वीन नेकलेस म्हणून ओळख असलेल्या पामबीच मार्गाची ओळख आता मृत्यूचा सापळा म्हणून होऊ लागली आहे. कारण या मार्गावर ६० किमी प्रती तास एवढी मर्यादित ठेवली असताना ही काही वाहन चालक हे अती वेगवान वाहन चालवून आपल्यासह इतरांचा देखील जीव धोक्यात घालताना दिसून येत आहेत.

Thane News : ठाण्यातील १८ मजली इमारतीला भीषण आग, दोन जण जखमी तर ७० जणांना वाचवण्यात यश

संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास एनआरआय सिग्नल च्या पुढे काही अंतरावर नेरुळहुन बेलापूर कडे जाण्याच्या दिशेने वेगाने जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराचा अपघात होऊन जागीच मृत्यू झाला आहे. विपुल महेंद्र कंगाली, वय ३० वर्ष, राहणार नागपूर असं मयत युवकाच नाव आहे. विपुल कंगाली हा एक लग्नकार्यासाठी नवी मुंबईत आला होता. अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. तर मयत युवक हा मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालवत होता, त्यामुळे दुभाजकाच्या दगडाला कट लागल्याने त्याची बाईक स्लिप झाली आणि तो खाली पडला, डोक्याला जबर मार लागल्याने मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीचा वेग एवढा प्रचंड होता की अपघात स्थळापासून दुचाकी जवळपास 20 ते 25 फूट पर्यंत दुचाकी घासत गेली असल्याचं यावेळी प्रत्यक्षदर्शीनी यावेळी सांगितलं.

रस्ता सुरक्षा अभियानाच्या दुसऱ्याच दिवशी अपघात

ठाणे सिटीझन फोरमचा लढा ठरला यशस्वी…ट्रस्टला मिळाली ११६ कोटींची जमीन परत

शहरात अपघाताचे प्रमाण कमी व्हावे यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून रस्ता सुरक्षा अभियान नुकतेच राबवले होते. यावेळी सुप्रसिद्ध मराठी कलाकार स्वप्नील जोशी व सुप्रसिद्ध गायक साईराम अय्यर, यांनी हजेरी लावत नागरिकांना रस्ता सुरक्षेचे महत्व सांगितले होते. तसेच वाहतूक पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी रस्ते अपघातात मृत्यू झालेल्यांची आकडेवारी वाचून दाखवली होती. मात्र या रस्ता सुरक्षा अभियानाच्या दुसऱ्याच दिवशी झालेल्या या भीषण अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला असल्याने पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने केलेल्या आवाहनाला नागरिकांनी देखील प्रतिसाद देत वाहतुकीचे नियम पाळावे अश्या चर्चा नवी मुंबईतील नागरिक करत आहेत.

Web Title: Navi mumbai a two wheeler rider died in an accident on palm beach road

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 07:58 PM

Topics:  

  • Accident Death
  • Navi Mumbai
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: माथाडी कामगारांसाठी मोठी घोषणा! वडाळ्यात 3 हजार घरे; वाशी मार्केट यार्डचाही होणार पुनर्विकास
1

Devendra Fadnavis: माथाडी कामगारांसाठी मोठी घोषणा! वडाळ्यात 3 हजार घरे; वाशी मार्केट यार्डचाही होणार पुनर्विकास

Accident News: मोठी बातमी ! कॅबिनेट मंत्र्याचा मुलीसह कार अपघातात मृत्यू; कारला ट्रकची जोरदार धडक बसली अन्…
2

Accident News: मोठी बातमी ! कॅबिनेट मंत्र्याचा मुलीसह कार अपघातात मृत्यू; कारला ट्रकची जोरदार धडक बसली अन्…

Ganeshotsav 2026: अपघातात व्हिडिओ नको, मदतीचा हात द्या! ‘सानपाडाचा राजा’ मंडळाचा माणुसकीचा जागर
3

Ganeshotsav 2026: अपघातात व्हिडिओ नको, मदतीचा हात द्या! ‘सानपाडाचा राजा’ मंडळाचा माणुसकीचा जागर

Navi Mumbai Crime: कामोठ्यात ड्रग्जविरोधात पोलिसांची धडक कारवाई; ६.५ ग्रॅम हेरॉईनसह पाच जण अटकेत
4

Navi Mumbai Crime: कामोठ्यात ड्रग्जविरोधात पोलिसांची धडक कारवाई; ६.५ ग्रॅम हेरॉईनसह पाच जण अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.