Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aditi Tatkare: “महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी…”; मंत्री आदिती तटकरेंचे निर्देश

महामार्गावरील जनसुविधा केंद्राच्या देखभाल व व्यवस्थापनाची जबाबदारी महिला बचतगटांना देण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करावा, असे महिला व बालविकास मंत्री  तटकरे म्हणाल्या.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 01, 2025 | 07:14 PM
Aditi Tatkare: “महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी…”; मंत्री आदिती तटकरेंचे निर्देश
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर महामंडळाच्या कामाची व्याप्ती वाढविण्यात यावी. बचतगटांमार्फत जन सुविधा केंद्रांची देखभाल करण्याबाबत तसेच सर्व्हिस सेक्टरमध्ये रोजगाराच्या जास्तीत-जास्त संधी उपलब्ध करून देणे व शहरी भागातील महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठीच्या योजनांसंदर्भातील प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

मंत्रालयात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजासंदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी सचिव डॉ. अनुपकुमार यादव, माविमच्या व्यवस्थापकीय संचालक वर्षा लड्डा, विभागाचे सहसचिव श्री. ठाकूर, ‘माविम’चे सहायक व्यवस्थापक श्री. गमरे, सल्लागार कुसूम बाळसराफ आदिसह अधिकारी उपस्थित होते.

महिला व बालविकास मंत्री  तटकरे म्हणाल्या की, महामार्गावरील जनसुविधा केंद्राच्या देखभाल व व्यवस्थापनाची जबाबदारी महिला बचतगटांना देण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करावा. या सुविधा केंद्रांमध्ये शौचालये, हिरकणी कक्ष, बचतगटातील व ग्रामीण भागातील महिलांसाठी प्रदर्शन, हस्तकला विक्री केंद्रे, अल्पोपहार यासारखे स्टॉल उभारण्याचे प्रस्तावित करावे.

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासंदर्भात आज मंत्रालयातील दालनात बैठक घेण्यात आली.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सुविधांचा लाभ ग्रामीण भागातील महिलांसह शहरी भागातील महिलांनाही देण्यासाठी महामंडळाच्या कामाची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न आहे. यासंदर्भात… pic.twitter.com/zyIjT5tln9

— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) February 28, 2025

बचतगटांच्या माध्यमातून ग्रामीण आणि दुर्बल घटकातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम माविम मार्फत सुरू असून, ग्रामीण आणि शहरी भागातील सुशिक्षित आणि मध्यमवर्गीय महिलांसाठी व्यावसायिक संधी, वित्तिय जोडणी आणि मार्गदर्शन प्रभावीपणे करण्यासाठी पंडिता रमाबाई वैयक्तिक महिला अर्थार्जन योजना राबविण्यासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही यावेळी तटकरे यांनी दिले.

काय म्हणाल्या आदिती तटकरे?

सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करणे, तसेच दैनंदिन वापरात इंधनाची बचत केल्यास भविष्यासाठी ऊर्जा सुरक्षा, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणाचे उद्द‍िष्ट गाठता येईल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि राज्य शासनाच्या सहकार्याने हरित उर्जेचा वापर करून पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येतात. या अंतर्गत सक्षम २०२४-२५ (संरक्षण क्षमता महोत्सव) १४ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंत्री तटकरे बोलत होत्या.

Aditi Tatkare: “दैनंदिन वापरात इंधन बचत केल्यास…”; मंत्री आदिती तटकरेंनी व्यक्त केला विश्वास

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, भारत सरकारने २०२५ पर्यंत इंधनात २० टक्के इथेनॉल मिश्रण अनिवार्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्यास यामुळे सहाय होणार आहे. नवीकरणीय ऊर्जा सुरक्षितता वाढवणे आणि प्रदूषणमुक्त वातावरण तयार करणे हे आपले उद्द‍िष्ट असले पाहिजे. राज्य समन्वयक उमेश कुलकर्णी यांनी सांगितले की, १४ ते २८ फेब्रुवारीपर्यंत तेल विपणन कंपन्या राज्यभरात संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी मोहीम राबविणार आहे. यामध्ये  विद्यार्थी, तरूण, वाहन चालक, क्लिनर, कर्मचारी, शेतकरी, निवासी संस्था, ग्रामपंचायती, स्वयंसेवी संस्था अशा अनेकांपर्यंत पोहोचून इंधन बचतीचे महत्व, फायदे यासंदर्भात जागृती करण्यात येणार आहे.

 

Web Title: Minister aditi tatkare reviewed the functioning of the womens economic development corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2025 | 07:14 PM

Topics:  

  • Aditi Tatkare

संबंधित बातम्या

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण
1

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील लाडकी बहिणींना १५०० रुपये कधी मिळणार? मंत्री अदिती तटकरे यांनी दिली गुडन्यूज!
2

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील लाडकी बहिणींना १५०० रुपये कधी मिळणार? मंत्री अदिती तटकरे यांनी दिली गुडन्यूज!

Kolhapur : पालकमंत्री पद म्हणजे सर्वस्व नाही Aditi Tatkare
3

Kolhapur : पालकमंत्री पद म्हणजे सर्वस्व नाही Aditi Tatkare

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! जूनच्या हप्त्याविषयी आदिती तटकरे म्हणाल्या, “पात्र लाभार्थ्यांच्या आधार…”
4

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! जूनच्या हप्त्याविषयी आदिती तटकरे म्हणाल्या, “पात्र लाभार्थ्यांच्या आधार…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.