"युतीमध्ये उमेदवार बदलून देण्याची..."; निलेश राणेंच्या शिवसेना प्रवेशावर केसरकरांची प्रतिक्रिया
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यात लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर जवळपास सर्वच पक्षांकडून तयारी केली जात आहे. असे असताना आता माजी केंद्रीयमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काही दिवसांपूर्वी वर्षा निवासस्थानी भेट घेतली. महायुतीत विधानसभेसाठी जागावाटपावर चर्चा सुरू आहे. दरम्यान या सगळ्या चर्चा सुरू असताना माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार यांचे सुपुत्र माजी खासदार निलेश राणे हे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. ते विधानसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत. आता यावर मंत्री दीपक केसरकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“निलेश राणे जर का शिवसेनेत आले तर, त्यांचे स्वागतच असेल. युतीमध्ये उमेदवार बदलून देण्याची प्रथा आहे. एकमेकांचे उमेदवार बदलले जाती, इतकी आमची युती घट्ट आहे,” असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले आहेत. निलेश राणे हे विधानसभा निवडणूक लढ वण्यास उत्सुक आहेत. मात्र ते कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
काय म्हणाले उदय सामंत?
“निलेश राणे हे अत्यंत चांगले कार्यकर्ते आहेत. विधानसभेला ते उभे राहणार आहेत, इतकेच मला माहिती आहे. मात्र निलेश राणे यांनी त्याप्रकरचा निर्णय घेतला तर कोकणातील संपूर्ण शिवसेना त्यांच्या पाठीशी असेल. मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार आहे”, असे उदय सामंत म्हणाले.
निलेश राणे विधानसभा लढवणार
माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. लोकसभा निवडणुकीत नारायण राणे विजयी झाले. आता निलेश राणे यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. दरम्यान आता निलेश राणे कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार हे पहावे लागणार आहे. निलेश राणे यांनी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. माध्यमांशी बोलताना, राणे म्हणाले, ”निलेश राणे विधानसभा निवडणूक लढवणार आहे. यावलेस निलेश राणे विधानसभेत दिसणार आहे. निलेश राणे शंभर टक्के विधानसभा लढवणार आणि जिंकणार पण. मतदारसंघ कोणता असेल हे वरिष्ठ नेतृत्व ठरवेल.” यामुळे निलेश राणे यांची राजकीय इच्छा पुन्हा दिसून आली आहे.