Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मंत्री रविंद्र चव्हाण यांनी तत्कालीन पालकमंत्र्यांकडे भ्रष्टाचाराचा चेंडू टोलवला,तरी राजकोटवरील भ्रष्टाचाराचे काय?-आ. वैभव नाईक

जर संविधानिक पदावर असलेल्या पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना जर एखादा अधिकारी ऑफर देत असेल तर त्या अधिकाऱ्याची केवळ बदली करण्यापेक्षा त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्या अधिकाऱ्याला निलंबित का केले नाही? असा प्रश्न आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित केला आहे.

  • By नारायण परब
Updated On: Sep 28, 2024 | 06:20 PM
मंत्री रविंद्र चव्हाण यांनी तत्कालीन पालकमंत्र्यांकडे भ्रष्टाचाराचा चेंडू टोलवला,तरी राजकोटवरील भ्रष्टाचाराचे काय?-आ. वैभव नाईक
Follow Us
Close
Follow Us:

जिल्हा परिषद प्रशासनातील एका अधिकाऱ्याने दर महिन्याला १० कोटी रुपये मिळवून देण्याची खुली ऑफर पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना दिल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. पालकमंत्री पदाचा कारभार घेतल्यानंतर त्या अधिकाऱ्याची बदली करून त्याचे दुकान बंद केल्याचे रविंद्र चव्हाण यांनी सांगितले. त्यावरून याआधीचे पालकमंत्री नारायण राणे, पालकमंत्री दीपक केसरकर, आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी त्या अधिकाऱ्याचे दुकान सुरु ठेवले होते आणि त्यांच्या कार्यकाळात कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाल्याचा अप्रत्यक्ष आरोप रविंद्र चव्हाण यांनी याआधीच्या पालकमंत्र्यांवर केला आहे. त्यामुळे रविंद्र यांनी भ्रष्टचाराचा चेंडू आता तत्कालीन पालकमंत्र्यांच्या दिशेने टोलावला आहे. मात्र रवींद्र चव्हाण यांच्या कार्यकाळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकोट येथील पुतळ्यात आणि नौदल दिनानिमित्त जिल्हानियोजन मधून खर्च झालेल्या निधीत भ्रष्टाचार झाला त्याचे काय? असा सवाल आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.

जर संविधानिक पदावर असलेल्या पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना जर एखादा अधिकारी ऑफर देत असेल तर त्या अधिकाऱ्याची केवळ बदली करण्यापेक्षा त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्या अधिकाऱ्याला निलंबित का केले नाही? त्या अधिकाऱ्याचे दुकान सुरु ठेवणारे तत्कालीन पालकमंत्री आता सत्तेत असल्यामुळे अधिकाऱ्यावर कारवाई टळली का? त्या अधिकाऱ्याला पाठीशी घालून रविंद्र चव्हाण यांनी अप्रत्यक्षरीत्या भ्रष्टाचाराला पाठिंबा देण्याचेच काम केले. प्रशासनाला लागलेली अशा अधिकाऱ्याची कीड समूळ नष्ट करणे गरजेचे होते. आताही वेळ गेलेली नाही त्या अधिकाऱ्याचे नाव रविंद्र चव्हाण यांनी जाहीर करून त्या अधिकाऱ्याची ईडी चौकशी लावली पाहिजे. जेणेकरून भ्रष्टाचार उघड होऊन कोणकोणत्या पालकमंत्र्यांनी त्या अधिकाऱ्याकडून पैसे मिळवले हे जनतेसमोर येईल. असे खुले आव्हान आ. वैभव नाईक यांनी दिले.

तत्कालीन पालकमंत्र्यांच्या काळात भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध 

माजी पालकमंत्री नारायण राणे, माजी पालकमंत्री दीपक केसरकर, आणि माजी पालकमंत्री उदय सामंत हे होवून गेलेले पालकमंत्री आहेत. ते सध्या विद्यमान पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासमवेत सत्तेत आहेत. रविंद्र चव्हाण यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे तत्कालीन पालकमंत्र्यांच्या काळात भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध होते. अशा भ्रष्टाचारामुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. केवळ ठेकेदारांच्या सोयीची कामे मंजूर करण्यावर भर दिला जातो. लोकांचे प्रश्न सोडविले जात नाहीत, जनतेला न्याय मिळत नाही म्हणून जनता दरबारात प्रश्नांची सरबत्ती होत असल्याची टीका आ. वैभव नाईक यांनी केली.

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी पुतळ्याची जबाबदारी आपली नसून नौदलाची आहे असे त्यांचे म्हणणे असेल तर पुतळ्याच्या कामाची आणि परिसर सुशोभीकरणाची गुणवत्ता का तपासली गेली नाही? ती जबाबदारी पालकमंत्री म्हणून त्यांची नव्हती का? जर यात त्याचा आणि त्यांच्या विभागाचा संबंध नव्हता तर पोलीस स्टेशनमध्ये पालकमंत्र्यांनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने तक्रार का केली. ती तक्रार नौदल अधिकाऱ्यांकडून का करण्यात आली नाही? कोणत्या आधारावर आणि कोणत्या अनुभवावर २४ वर्षीय जयदीप आपटेला पुतळ्याचे काम देण्यात आले. राणेंसोबत जयदीप आपटेचे फोटो आहेत, त्यामुळे त्यांच्या शिफारशीनुसार पुतळ्याचे काम देण्यात आले का? त्याचबरोबर पुतळा कोसळण्याच्या संवेदनशील विषयात पोलिसांनी केलेली कारवाई जनतेसमोर का आणली नाही? जयदीप आपटे याने काय जबाब दिले ते जनतेसमोर येणे गरजेचे होते.

५.५ कोटी रु. निधी त्यासाठी का खर्च करण्यात आला?

पुतळ्याची जबाबदारी नौदलाची होती तर नौदल दिनाचा खर्च देखील नौसेना करते मग जिल्हानियोजन मधून जिल्ह्याच्या विकासाला आलेला ५.५ कोटी रु. निधी त्यासाठी का खर्च करण्यात आला? मात्र हे सर्व गुप्त ठेवून कोणाला वाचविण्याच्या प्रयत्न होत आहे. असे अनेक प्रश्न माझ्याच नव्हे तर प्रत्येक शिवप्रेमींच्या मनात आहेत. पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाला हे आता समितीच्या अहवालात देखील उघड झाले आहे. मात्र शिंदे- फडणवीस सरकारच घटनाबाह्य असल्याने ते भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करणार नाहीत. हा विषय भरकटवण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. त्यामुळे छत्रपतींच्या पुतळ्यात भ्रष्टचार करणाऱ्यांना जनतेने कायमस्वरुपी घरी बसवावे असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.

Web Title: Minister ravindra chavan threw the ball of corruption to the then guardian minister but what about the corruption in rajkot vaibhav naik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2024 | 06:18 PM

Topics:  

  • chatrapati Shivaji Maharaj
  • Malvan

संबंधित बातम्या

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमात महेश मांजरेकर साकारणार कधीही न साकारलेली भूमिका… जोरदार चर्चा!
1

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमात महेश मांजरेकर साकारणार कधीही न साकारलेली भूमिका… जोरदार चर्चा!

शिवराज अष्टकातील सहावे तेजस्वी पुष्प १९ फेब्रुवारी २०२६ ला प्रदर्शित होणार!
2

शिवराज अष्टकातील सहावे तेजस्वी पुष्प १९ फेब्रुवारी २०२६ ला प्रदर्शित होणार!

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५२ वा द्वितीय राज्याभिषेक सोहळा संपन्न; संभाजी ब्रिगेडने ‘रयतेच्या राज्या’ची भावना जपली
3

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५२ वा द्वितीय राज्याभिषेक सोहळा संपन्न; संभाजी ब्रिगेडने ‘रयतेच्या राज्या’ची भावना जपली

Kalyan News :  इतिहासप्रेमींसाठी पर्वणी; गणेशोत्सावाच्या निमित्ताने शहरात शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन
4

Kalyan News : इतिहासप्रेमींसाठी पर्वणी; गणेशोत्सावाच्या निमित्ताने शहरात शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.