Satara Har Ghar Tiranga Abhiyan 2026 : सातार्यातील मोती चौकात १००० तिरंगा ध्वजांचे वाटप; शिवेंद्रसिंहराजेंच्या हस्ते अभियानाचा प्रारंभ
पंतप्रधान मोदीजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या आवाहनानुसार “हर घर तिरंगा” या अभियानांतर्गत सातारा विधानसभा मतदारसंघात प्रत्येक घरी तिरंगा लावण्यासाठी तिरंगा ध्वज उपलब्ध करून दिले असून ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सातारा शहरातील मोती चौक येथे नागरिकांना प्रतिनिधिक स्वरूपात १००० तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपाध्यक्ष एडवोकेट दत्तात्रय बनकर, भा ज पा सातारा विधानसभेचे प्रमुख अविनाश कदम, सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, भा ज पा सातारा जिल्हा सरचिटणीस विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार, मंडल अध्यक्ष वैशाली टंगसाळ, अविनाश खर्शीकर, मारुती चिकणे, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी , सातारा नगरपालिकेचे सर्व सभापती, सर्व नगरसेवक, सातारा जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांच्यासह अँग्रिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






