अमरावती : शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला याबाबत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली. एसटी कामगारांच्या नावावर भाजप आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे. शरद पवार यांच्यासारख्या हिमालयाच्या उंचीच्या नेत्याच्या घरावर असा हल्ला करणं योग्य नाही. (yashomati thakur statement on sharad pawar) असं त्यांनी म्हणटंल आहे.
राष्ट्रपती राजवट आणि शपथविधीची स्वप्नं पाहत राहा, ही महाराष्ट्राची जनता आहे, तुम्हाला आता मरेपर्यंत या मातीत स्थान मिळणार नाही. एसटी कामगारांच्या सर्व प्रश्नांबद्दल आम्हाला सहानुभूती आहे, या प्रश्नावर न्यायालयाने आपला निर्णय दिलेला आहे. आपण सर्वांनी संयम बाळगला पाहिजे अशी प्रतिक्रिया अमरावतीच्या पालकमंत्री व महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.
[read_also content=”धुळ्यात पोलिस प्रशिक्षण केंद्रातील 29 पोलिसांना जेवणातून विषबाधा https://www.navarashtra.com/maharashtra/food-poisoning-of-29-police-at-dhule-police-training-center-nrps-266380.html”]
तर, दोन दिवसांपुर्वी न्यायालयानं दिलेल्या निकालानंतर गुलाल उधळणारे अचानक इतके आक्रमक कसे झाले. निर्णयाचं स्वागत मग सिल्व्हर ओकवर जाण्याचा काय उद्देश होता. हे पोलीस यंत्रणेचं अपयश आहे. पोलिसांना हे आधी कसं कळलं नाही. तिथे जाणारे आंदोलक मीडियाला घेऊन पोहचले. अर्थात मीडियाचे हे कामच आहे की जे आहे ते दाखवणं. मग मीडियाला जे कळलं ते पोलीस यंत्रणेला का कळलं नाही.’ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
[read_also content=”‘हा हल्ला म्हणजे पोलीस यंत्रणेचं अपयश आहे’ – अजित पवार https://www.navarashtra.com/maharashtra/this-attack-is-a-failure-of-the-police-system-syas-ajit-pawar-nrps-266323.html”]