टेंभुर्णी: माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या पंढरपूर तालुक्यातील ४२ गावातून आमदार बबनदादा शिंदे यांच्या प्रचाराचा झंजावात दौरा चालू असून प्रत्येक ठिकाणी आमदार बबनराव शिंदे यांचे प्रचंड उत्साहाने, युवकांची मोटरसायकल रॅली काढून व जेसीबी मधून पुष्पवृष्टी करून स्वागत केले जात आहे. आज पर्यंत मागील पंधरा वर्षात प्रत्येक गावासाठी केलेल्या कोट्यावधी रुपयाच्या विकास कामांचा लेखाजोखा सादर करून आमदार बबन शिंदे स्पष्ट सांगतात की गावोगावच्या सर्व कार्यकर्त्यांनी सावधानी बाळगून, जागरूकपणे प्रचार करून रणजीत शिंदे च मतदानाची टक्केवारी वाढवणे आवश्यक आहे. या निवडणुकीत पंढरपूर तालुक्यातील पांडुरंग परिवार, विठ्ठल परिवार, काळे गट व आमचा शिंदे गट सर्वजण एकत्रितपणे व उत्साहाने कामाला लागलेले आहेत , आता ही निवडणूक आपल्या टप्प्यात आलेली आहे व रणजीत शिंदे यांचा विजय निश्चित आहे.
मागील दोन दिवसात आमदार बबनराव शिंदे यांनी अजन सोंड ,बीटर गाव ,नारायण चिंचोली, सुगाव भोसे, बाबुळगाव, खरातवाडी , आढीव, ईश्वर वाठार शेगाव दुमाला गुरसाळे इत्यादी गावातून प्रचार दौरा आयोजित केला होता. ४२ पैकी कांही मोठ्या गावातून यापुढे प्रचार सभांचे आयोजन केले जाणार असून या झंजावती प्रचार दौऱ्यामुळे बबन शिंदे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे सर्वत्र दिसून येत आहे.
आमदार शिंदे यांचे बरोबर पंढरपूरचे माजी सभापती वामनराव माने सुभाष माने सुधाकर कवडे, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती संजय पाटील भिमानगरकर समाज कल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष तुकाराम ढवळे,कारखान्याचे संचालक पोपट चव्हाण माऊली हळवणकर दिलीप घाडगे सत्यवान थिटे,मोहन अनपट दिलीप आप्पा चव्हाण समाधान गोरे विलास भोसले यांचे सह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
मागील पंधरा वर्षात पंढरपूर तालुक्यातील या ४२ गावात रस्ते वीज पाणी सभामंडप आरोग्य सेवा तीर्थक्षेत्र विकास मंदिर उभारणे पाझर तलाव शेततळी दलित वस्ती सुधारणा अंध अपंग परित्यक्ता विधवा यांच्यासाठी मोठा निधी व सवलती मिळवून देणे अशा प्रकारच्या विकास कामाला प्रत्येक गावात कोट्यावधी रुपयाचा शासकीय निधी मिळवून दिलेला आहे ,त्यामुळे नागरिकांचा आमच्यावर प्रचंड विश्वास व भरघोस प्रेम आहे.
हेही वाचा: शिवाजी सावंत यांचा रणजीत शिंदे यांना पाठिंबा; आमदार बबनदादा शिंदे यांनी केले स्वागत
आमदार शिंदे म्हणाले की या भागातील करकंब येथील विजय शुगर कारखाना आम्ही बँकेकडून विकत घेतलाय त्यामुळे मागील कोणतेही कोणाचेही देणंघेणं आम्ही लागत नाही .या कारखान्यांमध्ये या 42 गावातील ऊस वेळेवर गळीतास नेला जातो व प्रत्येक दहा दिवसाला शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊस बिल जमा केले जाते तसेच कामगार मजूर व इतर कोणाचेही बिल उशिरापर्यंत ठेवले जात नाही .जिल्ह्यातील इतर सर्व साखर कारखान्यांच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा जास्तच दर निश्चित दिला जातो हे सर्वांना माहीत आहे त्यामुळे खोट्या आश्वासनावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी फसू नये. सामाजिक उपक्रम म्हणून मोफत विवाह सोहळा काशीयात्रा बुद्धगया यात्रा नेत्र शस्त्रक्रिया शिबिर रक्तदान शिबिर तुळजापूर व बालाजी यात्रा इत्यादी विविध उपक्रम राबवले जातात .
आमदार शिंदे पुढे म्हणाले की ही विकास कामाची प्रक्रिया न संपणारी व निरंतर कायम चालू ठेवण्यासाठी युवक नेते रणजीत बबनराव शिंदे यांना या निवडणुकीत आपण मोठ्या मताधिक्याने विजयी करा, निवडणूक टप्प्यात आलेली आहे रणजीत शिंदे चा विजय निश्चित आहे तसेच मतदार उत्साही व हुशार आहेत परंतु कार्यकर्त्यांनी घराघरापर्यंत प्रचार करून सफरचंद ही निवडणूक चिन्ह सर्वत्र पोहोचवा व मोठ्या टक्केवारीने रणजीत शिंदेला मतदान करा.
हेही वाचा: माढा विधानसभेत येणार रंगत; संजय कोकाटेंसह भारत शिंदेंचा अभिजीत पाटलांना पाठिंबा
याप्रसंगी सुभाष माने सुधाकर कवडे शिवाजी कांबळे संजय पाटील मोहन अनपट माऊली हळवणकर व प्रत्येक गावातील सरपंच व पदाधिकारी उत्साहाने व विश्वासाने आमदार बबनदादा शिंदे यांनी केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा सादर करून समोरच्या विरोधी उमेदवाराच्या खोट्या लबाड आणि दिशाभूल करणाऱ्या आणि मोठमोठ्या खोट्या आश्वासना वर विश्वास न ठेवता रणजीत शिंदे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आव्हान करतात.
या दौऱ्यात आढीव येथे शिवसेना उबाठाच्या इंद्रजीत गोरे औदुंबर चव्हाण समाधान गोरे यांचे सह किमान 200 कार्यकर्त्यांनी आमदार शिंदे गटात प्रवेश करून आपला पाठिंबा जाहीर केला, आमदार बबनदादा शिंदे यांनी सर्वांचे पुष्पहार घालून स्वागत केले. तसेच करकंब येथे शेकडो कार्यकर्त्यांनी मोठी रॅली काढून प्रचार कार्यालयाचा आमदार बबनदादा शिंदे यांचे हस्ते नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला.