''शरद पवारांमुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा...''; 'या' भाजप नेत्याची जहरी टीका
मुंबई: सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणूक आयोगाकडून विधानसभेच्या निवडणुकीसाठी अधिकृत तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान महाविकास आघाडीकडून मुद्द्यांवरून महायुती सरकारवर टीका केली जात आहे. दरम्यान राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास महाराष्ट्राचा चेहरा बदललेला दिसेल असे वक्तव्य शरद पवारांनी केले आहे. यावरून आता गोपीचंद पडळकर यांनी पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवारांमुळेच राज्याच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर झाला आहे, अशी टीका पडळकरांनी केली आहे.
शरद पवारांनी केलेल्या टीकेवर गोपीचंद पडळकरांनी टीका केली आहे. आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, ”शरद पवार म्हणतात, “सत्ता हातात आल्यावर महाराष्ट्राचा चेहरा बदललेला दिसेल.” पण पवार साहेब, तुमच्यामुळेच महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर झाला आहे.हाराष्ट्राचा सर्वसमावेशक विकास थांबवून पुन्हा सरंजामी राजवट आणायची आहे का? ” असा सवाल पडळकरांनी केला आहे.
‘एक्स’वकरत आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, ”सत्ता हातात आल्यावर महाराष्ट्राचा चेहरा बदललेला दिसेल.” पण पवार साहेब, तुमच्यामुळेच महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर झाला. ५०-६० वर्ष महाराष्ट्र लुटणं, शिवरायांच्या तेजाची झळाळी हरवणं, हेच तुमचं वारसाहक्क आहे. महाराष्ट्राचा सर्वसमावेशक विकास थांबवून पुन्हा सरंजामी राजवट आणायची आहे का? दलित-ओबीसी अत्याचाराचे नवे अध्याय लिहायचे आहेत का? ”
@PawarSpeaks म्हणतात, "सत्ता हातात आल्यावर महाराष्ट्राचा चेहरा बदललेला दिसेल." पण पवार साहेब, तुमच्यामुळेच महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर झाला. ५०-६० वर्ष महाराष्ट्र लुटणं, शिवरायांच्या तेजाची झळाळी हरवणं, हेच तुमचं वारसाहक्क आहे. महाराष्ट्राचा सर्वसमावेशक… pic.twitter.com/5iLER6SX2E
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) September 16, 2024
पुढे बोलताना पडळकर म्हणाले, ”मी पवारांच्या अर्ध्या वाक्याशी सहमत आहे, महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याची जी आवश्यकता होती, ती देवेंद्र फडणवीसांनी पूर्ण केली आहे. शरद पवारांचा शासनकाळ होता,तो काळाकुट्ट होता. शरद पवारांनी भ्रष्टाचार आणि जातीवाद केला. लोकांमध्ये भांडणे लावली. आता त्यांनी हरिनामाचा जप करावा म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये चांगले काम करण्याची इच्छा जागृत होईल,” असे गोपीचंद पडळकर म्हणाले.