MLA Laxman Jagtap and Mukta Tilak came on wheelchair for votoing in vidhansabha
मुंबई : विधान परिषद निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले. आधी कोणत्याही हरकती नव्हत्या पण काँग्रेस पक्षाने अखेरच्या टप्प्यात भाजपाच्या दोन आजारी आमदारांच्या मतदानाला हरकती घेतल्याने राज्यसभेप्रमाणेत याही निवडणुकीत वाद वाढला असून आयोगाने आघाडीचे आक्षेप फेटाळल्यानंतर काँग्रेसने या निर्णयाला कोर्टात आव्हान देण्याची तयारी केली आहे. सर्व आमदारांनी मतदान केल्यानंतर भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसने आक्षेप घेतला(MLA Laxman Jagtap and Mukta Tilak came on wheelchair for votoing in vidhansabha).
या निवडणूकीत गुप्त मतदान आहे. पण टिळक, जगतापांची मतपत्रिका इतर नेत्यांनी मतदान पेटीत टाकली. दोघांच्या मतदानावेळी 2 सहकरी नेते उपस्थित असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. निवडणूकीच्या आचार संहिता 1961 चे उल्लंघन असल्याचा दाखला काँग्रेसने दिला. या आक्षेपामुळे मतमोजणी प्रक्रियेत खोळंबा निर्माण झाला होता.
कुणी जर आजारी असेल, कुणाला वाचता येत नसेल, मत द्यायला कोणत्याही प्रकारची असमर्थता असेल तर ते अन्य कुणाची मदत घेऊ शकतात, पण त्यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम घालून दिलेले आहेत. त्याच नियमांचे पालन भाजपाकडून झालेले नाही. जर दोन्ही उमेदवार आपल्या मतपत्रिकेवर सही करु शकतात तर मग आपली मतपत्रिका मतपेटीत का टाकू शकत नाही, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला.
सगळ्या नियमांचं पालन करुन तसेच रिटर्निंग ऑफिसरच्या परवानगीने संबंधितांनी मतदान केले आहे. काँग्रेसचा घेतलेला आक्षेप तकलादू आहे. त्यांना पराभव दिसतोय, ते नक्कीच तोंडावर आपटतील. यांना विनाशकाले विपरीत बुद्धी आलेली आहे. लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या पक्षनिष्ठेला सॅल्यूट करतो, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या आक्षेपानंतर भाजपा नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
काँग्रेसने घेतलेल्या आक्षेपावर निवडणूक आयोगात खल करण्यात आला. त्यानंतर आयोगाने काँग्रेसचे आक्षेप फेटाळले आहेत. काँग्रेसने घेतलेल्या आक्षेपानंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी काँग्रेसचा आक्षेप फेटाळून लावला आहे. त्यानंतर या अधिकाऱ्यांविरोधात कोर्टात जाणार असल्याचे काँग्रेसने सांगितले. दरम्यान, हा निर्णय आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेला
मत टाकायला असमर्थ असलेल्या सदस्याने सहकाऱ्याची मदत घेतली तरी चालते. फक्त सहकाऱ्याने वयाची 18 वर्षे पूर्ण केलेली असावीत. फक्त संबंधित सहकाऱ्यावर एकच बंधन आहे, ते म्हणजे त्याने कुणाला मत दिले हे सांगू नये.
[read_also content=”या असल्या बाईला आई म्हणायच? पोटच्या मुलाला विकून खरेदी केला टीव्ही, फ्रीझ, वॉशिंग मशीन; पोलिसांनी अटक केल्यावर म्हणाली… https://www.navarashtra.com/crime/the-mother-sold-her-child-and-bought-a-tv-freezer-cooler-nrvk-290262.html”]
[read_also content=”जगातील सर्वात मोठं रहस्य उलगडलं; बर्म्युडा ट्रँगलमध्ये विमाने, जहाजे का गायब का होतात याचा खुलासा अखेर झाला https://www.navarashtra.com/viral/bermuda-triangle-mystery-solved-nrvk-278192.html”]
[read_also content=”‘येथे’ आजही धडधडते भगवान कृष्णाचे हृदय! वैज्ञानिकांनाही याचे रहस्य उमगले नाही https://www.navarashtra.com/viral/the-story-of-lord-jagannath-and-krishnas-heart-nrvk-280509.html”]
[read_also content=”एक महिला तब्बल 36 वर्षांपासून पुरुष म्हणून वावरली पण शेवटी… https://www.navarashtra.com/viral/woman-lives-in-the-guise-of-man-for-36-years-nrvk-280502.html”]