मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडच्या दौऱ्यावर , 65 हजार लोकं येणार; मुंडे बंधू-भगिनी उपस्थित राहणार का? सुरेश धस म्हणाले...
मुंबई: बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यभर चांगलेच तापले आहे. या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. वाल्मीक कराड एसआयटीच्या ताब्यात आहे. तर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन, मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान आज भाजप आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधला.
भाजप आमदार सुरेश धस म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 5 फेब्रुवारी रोजी आष्टी येथे येणार आहेत. आज फडणवीस यांची भेट घेतली. चर्चा केली आणि काही मागण्या देखील केल्या. परळी तालुक्यातील बरदापूर, परळी ग्रामीण आणि शिरसाळा, परळी संभाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये सतत 10 ते 17 वर्षांपासून एकाच ठिकाणी राहणाऱ्या पोलिसांच्या बीड जिल्ह्याच्या बाहेर बदल्या कराव्यात, अशी मागणी केली. ”
“वाल्मीक कराडला फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या सर्वांना सहआरोपी करण्यात यावे. परळी नगरपालिकेचे स्पेशल ऑडिट व्हावे. वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपची चौकशी व्हावी. वाल्मीक कराडशी बोलणाऱ्या महिला अधिकारी कोण याचा शोध घ्यावा. परळीमधील अवैध रखेचे साठे जप्त केले जावेत, अशा मागण्या आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या आहेत.”
“करुणा मुंडेच्या गाडीत पोलीस अधिकाऱ्यांनी पिस्तूल ठेवले. ते साडीतले अधिकारी कोण आहेत? परळी येथे हे कटकारस्थान करण्यात आले आहे. त्यांच्या गाडीत पिस्तूल ठेवणारे अधिकारी आजही बीड पोलिसात आहेत. आका हे बीडचे सुपर पालकमंत्री आहेत. मी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली नाही”
हेही वाचा: “आमदार सुरेश धस यांच्या तांडवाला शासकीय आशीर्वाद…”; खासदार संजय राऊतांचा घणाघात
आमदार सुरेश धस यांच्या तांडवाला शासकीय आशीर्वाद
राज्यामध्ये बीड हत्या प्रकरणावरुन राजकारण तापले आहे. मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्यामुळे सर्व राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात आला. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे बीडमधील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यामध्ये धनंजय मुंडे यांच्याशी संबंध असलेला आरोपी वाल्मिक कराडवर देखील प्रश्न निर्माण होत आहे. या प्रकरणामध्ये भाजप नेते आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार घणाघात केले. तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील हे प्रकरण उचलून धरले. सुरेश धस यांना शासकीय आशीर्वाद असल्याशिवाय ते बीडमधल्या दहशतवादा विरोधात तांडव करणार नाहीत, असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात केज कोर्टाने वाल्मीक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मीक कराडला केज कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याधी केज कोर्टाने वाल्मीक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली होती. आज वाल्मीक कराडची सीआयडी कोठडी संपली होती. त्यामुळे आज वाल्मीक कराडला पुन्हा केज कोर्टात हजर करण्यात आले होते. याशिवाय कराडवर मकोका (MCOCA) लावण्यात आला आहे.