Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आचारसंहितेचा भंग केल्यास होऊ शकते शिक्षा! निवडणूक आयोगाकडून सक्त अंमलबजावणीच्या सूचना

लोकशाही प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी राज्य आयोगाने निवडणूक सक्त अंमलबजावणीच्या सूचना दिल्या असून त्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 14, 2025 | 03:20 PM
Model Code of Conduct Election Commission on Local Body Election 2025 in bhokardan news

Model Code of Conduct Election Commission on Local Body Election 2025 in bhokardan news

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra Local Body Elections : भोकरदन : भोकरदन नगरपालिकेसह अन्य ठिकाणी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिताही तत्काळ लागू झाली आहे. निवडणूक विभागाकडून आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर शिक्षेची तरतूद करण्यात आली असून धर्म, जात आणि प्रलोभनांवर कडक बंदीही घालण्यात आली आहे. लोकशाही प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी राज्य आयोगाने निवडणूक सक्त अंमलबजावणीच्या सूचना दिल्या असून त्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

दरम्यान, आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी जिल्हा निवडणूक विभागाची विविध पथके कार्यरत असून त्यांची जिल्ह्यातील निवडणूका लागलेल्या ठिकाणी बारकाईने लक्ष आहे. प्रशासनाने घालून दिलेले नियम मोडल्यास संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्या काही अतिउत्साही समर्थक, कार्यकत्यांना वेळीच आवर घाला, त्यांना निवडणूक आयोगाच्या नियमांची जाणीव करुन द्या अन्यथा, आचारसंहितेचा भंग झाल्यास त्याप्रकरणी शिक्षाही होऊ शकते हे लक्षात असू द्या, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

सोमवारपासून (ता. १०) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणूक जाहीर होताच या निवडणूक होणाऱ्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेचा थेट परिणाम संबंधित कार्यक्षेत्रात झाला असल्याचे दिसत आहे. लोकशाही प्रक्रिया मुक्त, निष्पक्ष आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी आयोगाने ही संहिता लागू केली असून त्याची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरु आहे. निवडणूक आयोगाने आपल्या नियमात स्पष्ट केले आहे.

संबंधितांवर तातडीची कारवाई

आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणतीही राजकीय, प्रशासकीय किंवा शासकीय यंत्रणा नियमभंग केल्यास तातडीची दंडात्मक कारवाई केली जाईल. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता व निष्पक्षता राखणे हे सर्व पक्षांचे आणि उमेदवारांचे नैतिक व कायदेशीर कर्तव्य आहे. निवडणुका जाहीर झाल्यापासून ते मतमोजणीचा निकाल लागेपर्यंत आचारसंहिता लागू असेल. या काळात राज्य वा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सर्व नियमांचे पालन अनिवार्य राहील, असे निवडणूक विभागाच्या नियमात नमूद करण्यात आले आहे. कोणत्याही व्यक्त्तीच्या धर्म, जात, भाषा यावर भाष्य करता येणार नाही. सरकारी दौरे आयोजित, शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग किंवा मतदारांवर प्रभाव टाकणारी कोणतीही घोषणा पूर्णपणे प्रतिबंधित आहे. मतदारांना आकर्षित करणाऱ्या कोणत्याही नवीन योजना, सवलती, प्रकल्प किंवा कल्याणकारी घोषणा करता येणार नाहीत.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

अतिउत्साही समर्थक, कार्यकत्यांना वैळीच आवर घाला

लोकशाही प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी निवडणूक विभागाची सक्त अंमलबजावणी नियम मोडणाऱ्यांवर निवडणूक विभागाच्या पथकांचे बारकाईने लक्ष असणार आहे.  किंवा समुदायाच्या आधारे मत मागणे कायद्याने गुन्हा आहे. मतदारांना वस्तु, पैसे किंवा आर्थिक प्रलोभन देणे निषिद्ध आहे. मतदानाच्या ४८ तास आधी प्रचार बंद झाल्यानंतर, मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात प्रचार करण्यास सक्त मनाई आहे. रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत ध्वनिवर्धकाचा वापर करता येणार नाही. जागा मालकाच्या लेखी परवानगीशिवाय त्यांची इमारत, भित किंवा ध्वजस्तंभ प्रचारासाठी वापरता येणार नाही. सभांमध्ये गोंधळ, घोषणाबाजी किंवा तोडफोड केल्यास संबंधितांवर तातडीची कारवाई होईल.

नवीन विकासकामे, प्रकल्पांचे भूमिपूजन किंवा उद्घाटन करण्यासाठी विभागाची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. मंत्री वा लोकप्रतिनिधींना निवडणूक असलेल्या मतदारसंघात सरकारी दौरे आयोजित करता येणार नाहीत.

Web Title: Model code of conduct election commission on local body election 2025 in bhokardan news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2025 | 03:20 PM

Topics:  

  • Election Commission
  • Local Body Election
  • Maharashtra Local Body Election

संबंधित बातम्या

Local Body Elections 2025: वडगाव नगरपंचायतीच्या निवडणूक उमेदवारांशिवाय? एकाही उमेदवाराने भरला नाही अर्ज
1

Local Body Elections 2025: वडगाव नगरपंचायतीच्या निवडणूक उमेदवारांशिवाय? एकाही उमेदवाराने भरला नाही अर्ज

नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा
2

नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा

संभाजीनगरमध्ये नगर परिषद निवडणूकीसाठी रणधुमाळी सुरू! आचारसंहितेचे कठोर पालन करण्याचे आव्हान
3

संभाजीनगरमध्ये नगर परिषद निवडणूकीसाठी रणधुमाळी सुरू! आचारसंहितेचे कठोर पालन करण्याचे आव्हान

‘मीच तुमच्या मनातील नगरसेवक’, संभाजीनगरमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून निवडणुकीच्या प्रचारचा ‘श्रीगणेशा’
4

‘मीच तुमच्या मनातील नगरसेवक’, संभाजीनगरमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून निवडणुकीच्या प्रचारचा ‘श्रीगणेशा’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.