
अमरावती : सोमवारपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली. दोन वर्षांच्या काळानंतर निर्बंधमुक्त वातावरणात नवरात्रौत्सव साजरा करण्यात येत आहे .त्यामुळे भाविकांमध्ये कमालीचा उत्साह आहे. यामध्ये सेलिब्रिटिंपासून ते राजकीय नेते मंडळीही उत्साहात सहभागी होतात. अमरावतीमध्येही सध्या नवरात्र उत्सवाची धूम असून गरबा कार्यक्रमात मोठया प्रमाणावर आयोजीत करण्यात येत आहे. अशाच एका गरबा उत्सवाला अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी हजेरी लावली होती. त्यांचा गरबा खेळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
[read_also content=”छगन भुजबळांचे देवी सरस्वती बाबत वक्तव्य; भाजपचा आक्षेप https://www.navarashtra.com/maharashtra/chhagan-bhujbals-statement-about-goddess-saraswati-bjps-objection-nrgm-330198.html”]
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या शहरातील गरबा उत्सवाला हजेरी लावली होती. यावेळी नवनीत राणा यांचा गरबा खेळण्याचा आंनद लुटला. गुजराती आणि हिंदी गाण्यावर ठेका धर खासदार नवनीत राणा गरबा खेळला. त्यांचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला असून नेटकऱ्यांची त्याला चांगलीच पंसती मिळत आहे.
[read_also content=”रशियातील शाळेत गोळीबार; १३ जण ठार, ७ विद्यार्थ्यांसह २० जण गंभीर जखमी https://www.navarashtra.com/world/school-attack-in-russia-13-dead-20-seriously-injured-including-7-students-330170.html”]