MP Shahu Maharaj Chhatrapati expressed views at the Kolhapur akhil bhartiya Maratha mahasangh melava
Kolhapur akhil bhartiya Maratha mahasangh melava : सडोली : अखिल भारतीय मराठा महासंघाचा राज्यस्तरीय मेळावा कोल्हापूरमध्ये पार पडले. यावेळी खासदार शाहू छत्रपती महाराजांनी त्यांच्या भावना व्यक्त केले आहे.खासदार शाहू छत्रपती कोल्हापूर मध्ये मराठा स्वराज्य भवन हे होईलच पण दिल्लीमध्ये देखील मराठ्यांचे स्वराज्य भवन उभारावे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया असे आवाहन कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी केले ते अखिल भारतीय मराठा महासंघाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षात होत असलेल्या राज्यस्तरीय मेळाव्यात बोलत होते. दत्त मंगल कार्यालय फुलेवाडी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
राज्यस्तरीय मराठा मेळाव्याच्या दरम्यान सुरुवातीला अखिल भारतीय मराठा महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. या सभेमध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कार्यकारणीची स्थापना करण्यात आली. यामध्ये राजेंद्र कोंढरे यांची अध्यक्षपदी, राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नरेंद्र पाटील व वसंतराव मुळीक, सरचिटणीसपदी प्रमोद जाधव, कोषाध्यक्षपदी प्रकाश देशमुख, संयुक्त सरचिटणीस पदी गुलाबराव गायकवाड, विभागीय चिटणीसपदी अरविंद देशमुख आदी पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
राज्यस्तरीय मराठा मेळाव्याचा शुभारंभ दीप प्रज्वलनाने करण्यात आला. खासदार छत्रपती शाहू महाराज, खासदार धैर्यशील माने, माजी आमदार प्रकाश आवाडे, मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, उपाध्यक्ष नरेंद्र पाटील, वसंत मुळीक यांच्या उपस्थितीमध्ये झाला. संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा बांधव या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. महिलांची संख्या लक्षणीय होती.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मेळाव्याचे प्रास्ताविक वसंत मुळीक यांनी केले. दरम्यान खासदार धैर्यशील माने यांनी मराठा समाजासाठी आपण आणखी मोठे काम उभारले पाहिजे असे त्यांनी सांगितले. आमदार चंद्रदीप नरके म्हणाले की, मराठा भवन कोल्हापूरमध्ये होण्यास कोणतीही अडचण येणार नाही. मराठा महासंघाने आम्हाला चाकोरीबद्ध समाजासाठी कार्यक्रम आखून दिल्यास आम्ही तो प्रामाणिकपणे पूर्ण करू आणि समाजाच्या पाठीमागे ठामपणे उभा राहू असे आश्वासन दिले.
खासदार धनंजय महाडिक यांनी मराठा समाजाने घालून दिलेली आचारसंहितेचे पालन करावे असे आवाहन केले. महाराष्ट्रावर आलेल्या आपत्तीचा सामना करण्यासाठी मराठा बांधवांनी सढळ हाताने मदत करावी असे आव्हाने त्यांनी केले. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, आ. जयंत आसगावंकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यावेळी मराठा समाजाला संबोधताना श्रीमंत शाहू महाराज छत्रपती म्हणाले की, “कोल्हापूरचे स्वराज्य भवन हे उभारण्यासाठी गेले कित्येक वर्ष लढा सुरू आहे. जागेचा प्रश्न हा अजून सुटलेला नाही तरी देखील आम्ही सर्व पक्ष एकत्र येऊन त्यासाठी लढा नक्कीच देऊ आणि या ठिकाणी एक अद्यावत असे प्रशस्त आणि सुसज्ज मराठा भवन उभारू,” असा विश्वास खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी व्यक्त केला.
यावेळी स्वराज्यरक्षिका रणरागिणी छत्रपती ताराराणी यांच्या 350 व्या जयंतीनिमित्त त्यांचे दुर्मिळ छायाचित्र असलेले कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यात मराठा महासंघाच्या कार्यामध्ये 25 वर्षापेक्षा जास्त काळ योगदान दिल्याबद्दल अनेकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित कंदले तर आभार शैलजा भोसले यांनी मांडले.