घोडेगाव : राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार या भीमाशंकर जोतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात येत असतात. याही वर्षी खासदार सुप्रिया सुळे व प्रतिभा पवार या भीमाशंकरवरून परतत असताना घोडेगाव राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
प्रतिभा पवार व सुप्रिया सुळे भारावून गेल्या
दरम्यान, वळसे पाटील यांच्या अजित पवार गटात गेल्यानंतर प्रथमच सुप्रिया सुळे या आंबेगाव तालुक्यात आल्या परंतु तालुक्यात भीमाशंकरपासून सर्वच ठिकाणी फटाके फोडत भव्य, असे स्वागत व कार्यकर्त्यांच्या प्रेमामुळे प्रतिभा पवार व सुप्रिया सुळे भारावून गेल्या.
मान्यवरांची उपस्थिती
यावेळी घोडेगावच्या सरपंच अश्विनी तिटकारे, उपसरपंच सोमनाथ काळे, भीमाशंकर कारखान्याचे संचालक अक्षय काळे, शहराध्यक्ष किरण घोडेकर, हुसेन शेख, दशरथ काळे, सुनील इंदोरे, किरण राऊत, गोविंद भास्कर तसेच परिसरातील राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Web Title: Mp sule and pratibha pawar received a warm welcome at ghodegaon nryb