Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तारळी प्रकल्पाला MPCB चा थेट ‘स्टॉप वर्क’ आदेश; अदानी प्रकल्पाचे काम तात्काळ बंद करण्याचे निर्देश

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी २० नोव्हेंबर रोजी प्रकल्पस्थळाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान सावारघर येथील गट क्रमांक ३३ व ३४ मध्ये तात्पुरत्या कामगार छावणी आणि अन्य साठवणुकीसाठी उत्खनन व विकासकामे सुरू असल्याचे निदर्शनास आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 21, 2026 | 12:23 PM
तारळी प्रकल्पाला MPCB चा थेट ‘स्टॉप वर्क’ आदेश; अदानी प्रकल्पाचे काम तात्काळ बंद करण्याचे निर्देश

तारळी प्रकल्पाला MPCB चा थेट ‘स्टॉप वर्क’ आदेश; अदानी प्रकल्पाचे काम तात्काळ बंद करण्याचे निर्देश

Follow Us
Follow Us:
  • तारळी पंप स्टोरेज प्रकल्पाचे काम तात्काळ बंद करण्याचे MPCB चे आदेश
  • परवानगीशिवाय उत्खनन व कामगार छावणी उभारल्याचा ठपका
  • पूर्वपरवानगीशिवाय काम सुरू केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा
उंब्रज / अनिल कदम : सातारा जिल्ह्यातील मुरुड (ता.पाटण) येथील तारळी धरण परिसरालगत सुरू असलेल्या अदानी समूहाच्या १५०० मेगावॅट तारळी पंप स्टोरेज प्रकल्पाच्या कामकाजावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. सावारघर गावातील गट क्रमांक ३३ व ३४ येथे आवश्यक संमती आणि परवानग्यांशिवाय उत्खनन, विकासकामे, तात्पुरती कामगार छावणी व अन्य साठवणुकीची कामे सुरू केल्याचा ठपका ठेवत मंडळाने तात्काळ काम बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. २० नोव्हेंबर २०२६ रोजी पुणे प्रादेशिक कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या या आदेशामुळे तारळी प्रकल्पातील कथित पर्यावरणीय नियमभंगाचा मुद्दा आता अधिक गंभीर वळणावर पोहोचला आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी २० नोव्हेंबर रोजी प्रकल्पस्थळाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान सावारघर येथील गट क्रमांक ३३ व ३४ मध्ये तात्पुरत्या कामगार छावणी आणि अन्य साठवणुकीसाठी उत्खनन व विकासकामे सुरू असल्याचे निदर्शनास आले. मात्र, या कामांसाठी मंडळाला पूर्वसूचना देण्यात आली नसल्याचे तसेच आवश्यक संमती व परवानग्या प्राप्त करण्यात आल्या नसल्याचे मंडळाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. इतकेच नव्हे, तर संबंधित उत्खनन व विकासकामांसाठी सक्षम प्राधिकरणाकडून पर्यावरणीय मंजुरी घेण्यात आली नसल्याचाही ठपका ठेवण्यात आला आहे. मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालाचा आढावा घेतल्यानंतर जल व वायू प्रदूषण नियंत्रण कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

थेट काम बंद करण्याचे आदेश

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जल प्रदूषण नियंत्रण कायदा १९७४ च्या कलम ३३-अ आणि वायू प्रदूषण नियंत्रण कायदा १९८१ च्या कलम ३१-अ अंतर्गत संबंधित कामे तात्काळ थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. मंडळाची पूर्वपरवानगी मिळाल्याशिवाय सुरू असलेली अथवा प्रस्तावित उत्खनन व बांधकामाची कामे पुन्हा सुरू करू नयेत, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. परवानग्यांशिवाय काम सुरू ठेवण्याचा प्रयत्न केल्यास मंडळाकडे कायदेशीर कारवाई करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा या आदेशातून देण्यात आला आहे. हा आदेश सक्षम प्राधिकाऱ्याच्या पश्चात मंजुरीने जारी करण्यात आल्याचेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी, सदस्य सचिवांनाही आदेशाची प्रत

या कारवाईची प्रत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव आणि सातारा जिल्हाधिकारी यांना माहितीस्तव पाठवण्यात आली आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासन आणि संबंधित यंत्रणा या आदेशाच्या अंमलबजावणीबाबत काय भूमिका घेतात, याकडेही लक्ष लागले आहे. तारळी प्रकल्पाभोवती पर्यावरणीय परवानग्या, उत्खनन, बांधकाम आणि स्थानिक पातळीवरील तक्रारींचे मुद्दे सातत्याने चर्चेत असताना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या या अधिकृत आदेशामुळे प्रकल्प व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे काम बंद करण्याचे आदेश

विकासकामांच्या नावाखाली पर्यावरणीय नियमांना बगल दिली जात असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आता खुद्द प्रदूषण नियंत्रण मंडळाने काम बंद करण्याचे आदेश दिल्याने तारळी प्रकल्पातील पर्यावरणीय अनुपालनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होते का, संबंधित कामे थांबवली जातात का आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया काय होते, याकडे स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

कोर्टाच्या भीतीने अधिकाऱ्यांची धावाधाव

कोल्हापूर खंडपीठात तारळी अदानी प्रकल्पाच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे याची सुनावणी 5 डिसेंबर रोजी असल्याने थातुरमातुर कारण देत पर्यावरण प्रेमी नागरिकांना कोलदांडा देणारी प्रशासकीय यंत्रणा कागदी घोडे तयार करू लागली आहे 20 नोव्हेंबर रोजी पाटण येथे बोलविण्यात आलेली बैठक गुपचूप गुंडाळली असल्याची चर्चा असून 21 रोजी पुन्हा बैठक आयोजित करण्यात आली आहे अदानी कंपनीचे काही अधिकारी बैठकीला आलेच नाहीत जे आले त्यांनी महत्त्वाची कागदपत्रे दिलीच नसल्याने बैठक गुंडाळली असल्याची गोपनीय माहिती असून याबाबत प्रशासनाने कोणताच।खुलासा केला नसल्याने संशय बळावला आहे.

FAQ

प्रश्न १ : तारळी प्रकल्पावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने काय कारवाई केली?
उत्तर : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रकल्पातील काही कामे तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

प्रश्न २ : कोणत्या कामांवर आक्षेप घेण्यात आला आहे?
उत्तर : आवश्यक संमती व परवानग्यांशिवाय उत्खनन, विकासकामे, तात्पुरती कामगार छावणी आणि साठवणुकीशी संबंधित कामे सुरू असल्याचे आढळले.

प्रश्न ३ : कामे कुठे सुरू असल्याचे आढळले?
उत्तर : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील सावारघर गावातील गट क्रमांक ३३ आणि ३४ येथे ही कामे सुरू असल्याचे मंडळाच्या पाहणीत आढळले.

Web Title: Mpcb issues direct stop work order to tarali project nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 12:23 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.