गोवंडीचा आरएमसी प्लाण्ट होणार बंद! सर्व पक्षांच्या १३ नगरसेवकांचा विरोध; प्रदूषणामुळे टीबी, कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ
Mumbai News: गोवंडी-मानखुर्द (एम-ईस्ट वॉर्ड) परिसरात एका सार्वजनिक मुद्द्यावर अभूतपूर्व राजकीय एकजूट दिसून आली आहे. एआयएमआयएमचे नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य जमीर कुरेशी यांनी विभागीय समितीत परिसरातील चार बेकायदेशीर रेडी-मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्लाण्टविरोधात सातत्याने आवाज उठवत विरोध दर्शवला आहे. या सार्वजनिक चिंतेच्या पार्श्वभूमीवर, भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना ठाकरे आणि अन्य पक्षांच्या १३ नगरसेवकांनी कुरेशी यांना उघडपणे पाठिंबा दिला. या राजकीय दबावापुढे झुकून, पालिकेने २२ ऑक्टोबरपासून त्यांच्या नियंत्रणाखालील एक आरएमसी प्लाण्ट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.(फोटो सौजन्य – AI)
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाचा लवकरच विस्तार होणार; आठवडाभरात निविदाही काढली जाणार
त्याच वेळी म्हाडाच्या नियंत्रणाखाली असलेले उर्वरित तीन आरएमसी प्लाण्ट कायमस्वरूपी बंद करण्यासाठी एक तातडीची बैठक घेण्यात आली. गेल्या दहा वर्षांपासून, गोवंडी-मानखुर्द परिसरातील रहिवासी एसएमएस (बायोमेडिकल वेस्ट) कंपनी, देवनार डंपिंग ग्राऊंड आणि चार रेडी-मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्लाण्टमधून निघणाऱ्या विषारी प्रदूषणामुळे त्रस्त आहेत. यामुळे रहिवाशांचे जीवन कठीण झाले आहे. यापैकी आरएमसी प्लाण्ट सर्वांत धोकादायक आहे. आरएमसी प्लाण्टमधून येणारी वाहने सतत रस्त्यावर रस्त्याच्या पृष्ठभागावर ओला आणि निसरडा थर तयार होतो. हा निसरडा पृष्ठभाग दुचाकीस्वारांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे.
GG जर महापालिकेने आपले आश्वासन मोडले आणि कारखाना बंद केला नाही, तर पक्षीय अजेंडा बाजूला ठेवून, जनहितावर लक्ष केंद्रित करत महापालिकेविरोधात एक तीव्र जनआंदोलन सुरू केले जाईल.विषारी जनतेचे हवेचा आरोग्य विचार आणि करून वाढत्या हा मुद्दा उपस्थित केला. मला आनंद आहे की, सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी तो गांभीर्याने घेतला आणि मला पाठिंबा दिला. त्यामुळे महापालिकेने आरएमसीचे प्लांट बंद करण्याचे आश्वासन दिले आहे.
सणासुदीच्या तोंडावर अनेक शिक्षकांचे रखडले वेतन; शिक्षकांमध्ये अस्वस्थता
८८ आम्ही आरएमसी एसएमएस प्लांटनंतर, कंपनी आणि इतर बेकायदेशीर कारवाया बंद करण्यासाठी महापालिकेमध्ये आवाज उठवू. यामुळे स्थानिकांच्या जीविताला आणि आरोग्याला असलेला धोका थांबेल, अशी माहिती विठ्ठल लोकरे, नगरसेवक, यूबीटी यांनी दिली आहे.






