मुंबई आणि उपनगरात पावसाचं धुमशान पाहायला मिळत आहे. कालपासून सुरु असलेल्या पावासाच्या तुफान बॅटींग सुरु असून हवामान विभागाने पुढील तीन ते चार तास रेड अलर्ट दिला आहे. सततच्या सततच्या मुसळधार पावसाने मुंबईच्या मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नदीकाठच्या नागरिकांचं स्थलांतर करण्यात येत आहे. मिठी नदीचा उगम असलेल्या पवई येथे एक युवक वाहून गेल्याची माहिती देखील समोर आली आहे. मात्र NDRF च्या बचावकर्यामुळे या युवकाला वाचवण्यात यश आलं आहे. नदी पात्राजवळ असलेल्या कुर्लामधील क्रांतीनगर आणि कुर्ला ब्रिज परिसरात राहणाऱ्या नागरिकांना धोका असल्याने घटना स्थळी NDRF दाखल झालं आहे. पुरस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत प्रशासनाचं नागरिकांच्या सुरक्षेसाठी युद्धपाळतीववर बचाव कार्य सुरु आहे.
सुरुवातीला पाण्याची पातळी पाहता नागकांचं स्थलांतर करण्याची आवश्यकता नाही असं सांगण्यात आलं होतं मात्र सततच्या सुरु असलेल्या पावसामुळे मिठी नदीनेन काही वेळातच रौद्र रुप धारण केलं त्यामुळे नागरिकांचं स्थलांतर करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. मिठी नदीची धोकादायक पातळी ही 3.40 मीटर इतकी आहे. आज सकाळीच नदीने 3.10 मीटरची पातळी गाठली, अशा माहिती पालिका आयुक्तांनी दिली. त्यामुळे प्रसंगावधान राखत नदीजवळील 140 कुटुबियांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी पालिका प्रशासन शर्तीने प्रयत्न करत आहे.
मिठी नदीकाठी असेलेले बांद्रा कुर्ला संकुल, संदेश नगर, क्रांती नगर परिसात पुरस्थितीचा धोका निर्माण होत असल्याने खबरदारी म्हणून शक्य त्या सगळ्या सुरक्षा यंत्रणा तैनात केल्या असल्याचं मुंबई पालिका प्रशासनानकडून सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर गरज असेल तरंच घराबाहेर पडा असं आवाहन देखील नागरिकांना केलं जात आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महापालिका (BMC) आणि पोलिसांनी तात्काळ अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाने पुढील तीन ते चार तास मुंबईसाठी धोक्याचे आहेत असा इशारा दिला आहे. समुद्रात तीन ते चार मीटर उंचीच्या लाटा उसळणार असून समुद्रकिनारी नागरिकांना जाण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे मुसळधार पावसाचा सर्वात मोठा फटका हा लोकलला बसला असून मध्य , पश्चिम आणि हार्बर सेवा विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे.