हवामान खात्याने देशभरातील 13 राज्यांमध्ये जोरदार वारे, दाट ढग आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तुमच्या राज्यातील हवामान परिस्थिती जाणून घ्या, नक्की कुठे कुठे पडणार पाऊस?
येत्या 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावासाचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे नागरिकांना अनावश्यक कारणासाठी बाहेर पडू नय़े असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील बहुतांश सर्वच जिल्ह्यांमध्ये खूप पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याने दोघांनी आत्महत्या केली.
मुंबईतील जनजीवन पावसाने पुन्हा एकदा विस्कळीत झाले आहे. शुक्रवारी मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे तर काही ठिकाणी पुराचा इशारा देण्यात आला आहे.
शारा पातळीवरूंन वाहणाऱ्या पंचगंगेनं आज धोका पातळी गाठली आहे. दिवसभर जिल्ह्यात पावसाची उघडझाप असल्याने राधानगरी धरणाचे सुरू असणारे सर्व दरवाजे बंद झाले असून सध्या फक्त धरणाचा एक दरवाजा सुरू आहे.
नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगून नागरिकांनीही पुराच्या पाण्यात वाहने नेण्याचे अनाठायी धाडस करु नये, पाण्यात उतरु नये, असे आवाहन केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दूरदृश्यप्रणालीवरुन जिल्ह्यातील पर्जन्यस्थितीचा आढावा घेतला.
मुंबईत शनिवारपासून पाऊस पडत आहे. सोमवारी सकाळी आर्थिक राजधानीत आणखी मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यानंतर शहरातील अनेक भागात पाणी साचले. वाहतूक कोंडीमुळे लोक अडचणीत सापडले आहेत
जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे व उपजिल्हाप्रमुख प्रशांत मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी जनआक्रोश आंदोलन करत – MSIDC व कंत्राटदाराला जाहीर इशारा दिला आहे.
CM Fadnavis on Mumbai Rain : मुंबईमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तुफान पावसामुळे मुंबई अक्षरशः तुंबली आहे. याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या आहेत.
लातूर जिल्ह्यात सर्वत्र तूफान पाऊस बरसत आहे. जिल्ह्यातील मांजरा, रेणा आणि तेरणा या नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने रेड अलर्ट देण्यात आला.
मध्य भारतात देखील पावसाचा ईशारा हवामान विभागाने दिला आहे. आयएमडीच्या अलर्टनुसार छत्तीसगड, ओडिशा, बिहार, अंदमान-निकोबार द्वीप येथे मुसळधार पाऊस होणार आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये गेले 11 दिवस सलग पाऊस सुरू आहे. मंडी जिल्ह्यात ढगफुटी झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये 10 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
हिमाचल प्रदेशमधील अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. व्यास नदीने तर रौद्रस्वरूप धरण केले आहे. महाराष्ट्रातील देखील अनेक पर्यटक हिमाचल प्रदेशमध्ये अडकल्याचे समजते आहे.