zakir husain and bhagatsingh koshyari
मुंबईः जागतिक किर्तीचे तबला कलाकार उस्ताद झाकीर हुसेन (Zakir Hussain) यांनी मुंबई विद्यापीठातर्फे (Mumbai University) दिलेल्या पदवीचा स्वीकार करणे हा विद्यापीठाचा मोठा सन्मान असून या पुरस्कारामुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी आज येथे केले.
[read_also content=”निवडणुकीची चाहूल लागताच नारळफोड्या गॅंग पुन्हा सक्रीय; शिवेंद्रसिंहराजेंची टीका https://www.navarashtra.com/maharashtra/shivendra-singh-raje-bhosale-talked-about-election-issue-nrka-279196.html”]
मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित विशेष दीक्षांत समारोहात राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते पद्मभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांना संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉक्टर ऑफ लॉ ही पदवी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
राजकारण्यांना इतर लोक आपल्या पुढे गेलेले आवडत नाही; परंतु संगीत क्षेत्रात व इतर विद्याशाखांमध्ये आपला शिष्य आपल्याही पुढे जावा असे गुरुजनांना वाटते, हे विशेष महत्वाचे आहे. दुःखद प्रसंगी संगीत मनाला सांत्वन देते ही संगीताची शक्ती आहे. निसर्गाने प्रत्येकाला काही ना काही प्रतिभा दिली असते. या प्रतिभेला शिस्त, एकनिष्ठपणा व परिश्रमातून फुलवता येते असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आंतरशाखीय अध्ययनास चालना देण्यात येत असून यानंतर विद्यार्थ्यांना विज्ञानासह संगीत देखील शिकण्याची व्यवस्था असेल असे सांगून या धोरणाची अंमलबजावणी चांगली झाली तर विद्यापीठांमधून झाकीर हुसेन, शशिकांत गरवारे यांच्याप्रमाणे प्रतिभावंत विद्यार्थी निर्माण होतील असे राज्यपालांनी सांगितले. पंतप्रधान मोदी ‘मेक इन इंडिया’चे आवाहन करीत आहेत. मात्र गरवारे समूहाने ८० वर्षांपूर्वीच ‘मेक इन इंडिया’ ची सुरुवात केली होती असे राज्यपालांनी सांगितले.