मुंबईत अनंत अंबानींच्या लग्नामुळे वाहतूक नियमावली जारी, 12 ते 15 जुलै दरम्यान या रस्त्यांवरील वाहतूक टाळा
Anant Ambani-Radhika Merchant wedding: आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचे मुंबईत 12 जुलै रोजी लग्न आहे. या विवाह सोहळ्यात जगभरातून व्हिव्हिआयपी येणार आहेत. त्यामुळे मुंबई वाहतूक पोलिसांनी 12 ते 15 जुलैपर्यंत मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. हे वाहतूक निर्बंध बीकेसी कॅम्पसमध्ये १२ जुलै रोजी दुपारी १ ते १५ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लागू असणार आहेत.