Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News: अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत; ६२ कोटींच्या कामांवरून भाजप नेत्यांनेच केला पर्दाफाश

समितीने महाराष्ट्र पणन विभागाकडे ६२ कोटी रुपयांच्या कामांसाठी परवानगी मागितली होती. मात्र, ही कामं नेमकी कोणती आणि कशासाठी आहेत, याची माहिती समितीच्या बांधकाम उपसमितीलाही देण्यात आलेली नव्हती.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 06, 2025 | 02:42 PM
Nashik News: अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत; ६२ कोटींच्या कामांवरून भाजप नेत्यांनेच केला पर्दाफाश
Follow Us
Close
Follow Us:

Nashik News: राज्यतील सत्ताधारी महायुतीतील मंत्री- आमदार-खासदार त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि त्यांच्या वर्तणुकीमुळे सातत्याने महायुतीच्या अडचणी वाढवताना दिसत आहेत. पिंपळगाव बसवंत बाजार समितीच्या ६२ कोटींच्या बांधकाम निविदांवरून मोठा वाद उफाळून आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित गट) चे आमदार दिलीप बनकर हे या समितीचे अध्यक्ष असून, त्यांच्या कार्यकाळात ही वादग्रस्त प्रक्रिया पार पडली. पिंपळगाव बाजार समितीच्या ६२ कोटी रुपयांच्या निविदांच्या गैरव्यवहारप्रकरणी त्यांच्यावर संशय व्यक्त केला जात असून महाराष्ट्र पणन विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

पिंपळगाव बसवंत येथील बाजार समिती ही टोमॅटो आणि डाळिंबाच्या व्यापारासाठी देशभर प्रसिद्ध असून, तिची प्रचंड आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे ही संस्था राजकीय दृष्टिकोनातूनही अतिशय महत्त्वाची मानली जाते. दिलीप बनकर हे या बाजार समितीचे अध्यक्ष असून, त्यांच्या अध्यक्षीय कालावधीत घेतलेल्या ६२ कोटींच्या निविदांमध्ये अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणाचा तिढा दिल्ली दरबारी सुटणार? उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे दोघेही दिल्ली दौऱ्यावर

याच पार्श्वभूमीवर, पणन विभागाने सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून अहवालात दोषी आढळल्यास बनकर यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईची केली शक्यता आहे. ही कारवाई राजकीयदृष्ट्याही महत्त्वाची मानली जात असून, दिलीप बनकर हे अजित पवारांच्या अत्यंत विश्वासातील आमदार म्हणून ओळखले जातात. त्यामुळे या प्रकरणाचा राजकीय परिणामही मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समितीने महाराष्ट्र पणन विभागाकडे ६२ कोटी रुपयांच्या कामांसाठी परवानगी मागितली होती. मात्र, ही कामं नेमकी कोणती आणि कशासाठी आहेत, याची माहिती समितीच्या बांधकाम उपसमितीलाही देण्यात आलेली नव्हती. यामुळे समितीमध्येच प्रचंड संशयाचे वातावरण निर्माण झाले. भाजप नेत्या व समितीच्या बांधकाम समितीच्या सदस्या आर्किटेक्ट अमृता पवार यांनी थेट पणन संचालकांकडे तक्रार दाखल केली. त्यांच्या या तक्रारीनंतरच पणन विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत, जे आमदार दिलीप बनकर यांच्यासाठी अडचणीत ठरण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, ६२ कोटींच्या कामांसाठी प्रसिद्धी दिलेली निविदा स्थानिक वृत्तपत्रांऐवजी थेट इंग्रजी वर्तमानपत्रात प्रकाशित करण्यात आली होती. यामुळे स्थानिक शेतकरी आणि समितीतील इतर सदस्यांनाही याची माहिती नव्हती. केवळ एवढ्यावर प्रकरण थांबले नसून, या निविदा प्रक्रियेवर पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप होत आहे. त्यानुसार, या कामांसाठी फेरनिविदा काढावी, अशी मागणीही अमृता पवार व इतर सदस्यांकडून करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे पिंपळगाव बाजार समितीतील आर्थिक व्यवहार, पारदर्शकता आणि राजकीय हस्तक्षेप यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच, दिलीप बनकर यांच्या कार्यशैलीवरही गंभीर आरोप होत असून, या चौकशीचा निकाल राजकीयदृष्ट्याही महत्वाचा ठरणार आहे.

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत अडकले पुण्यातील २४ पर्यटक; सुप्रिया सुळेंकडून बेपत्ता पर्यटकांची नावांची यादी

भाजप नेत्या अमृता पवार यांनी या प्रकरणी फेसबुक लाईव्हद्वारे खुलासा करत शेतकऱ्यांच्या हितासाठी विरोधक म्हणून जबाबदारीने काम करत असल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की, “बांधकाम उपसमितीला अंधारात ठेवून निर्णय घेतले जात असतील, तर ते शेतकऱ्यांच्या हिताचे कसे ठरू शकतात? आम्ही यास विरोध करत असून गैरप्रकार रोखण्यासाठी ठोस पावले उचलणार आहोत.”

६२ कोटींच्या कामांची निविदा थेट इंग्रजी वर्तमानपत्रांत देण्यात आली होती, यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. स्थानिक शेतकरी, व्यापारी आणि सदस्य यांनाही याबाबत माहिती नव्हती, असे त्यांनी निदर्शनास आणले. या प्रकरणामुळे पिंपळगाव बाजार समितीतील आर्थिक व्यवहारांतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आता चौकशी अहवालानंतर यामध्ये काय उघड होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यानिमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लाडके आमदार अशी दिलीप बनकर यांची चर्चा असते. उपमुख्यमंत्री पवार यांनी आमदार बनकर यांना विशेष तरतूद करून सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून रानवड कारखाना चालविण्यासाठी परवानगी दिली होती. निफाड तालुक्यातील सहकारी संस्थांवर सध्या त्यांचाच वरचष्मा आहे. मात्र यातील काही संस्था लहरी कारभारामुळे अडचणीत आल्याचे चित्र आहे.

 

 

 

Web Title: Another mla of ajit pawar in trouble bjp leaders exposed him for works worth rs 62 crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2025 | 02:42 PM

Topics:  

  • Nashik News

संबंधित बातम्या

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान
1

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik Flood : गोदावरीला महापूर अनेक दुकाने गेली पाण्याखाली, मोठे नुकसान
2

Nashik Flood : गोदावरीला महापूर अनेक दुकाने गेली पाण्याखाली, मोठे नुकसान

Nashik Crime: लोकशाहीच्या स्तंभावरच जीवघेणा हल्ला; मारहाणीत पत्रकार जखमी अन् भुजबळ अ‍ॅक्शन मोडमध्ये
3

Nashik Crime: लोकशाहीच्या स्तंभावरच जीवघेणा हल्ला; मारहाणीत पत्रकार जखमी अन् भुजबळ अ‍ॅक्शन मोडमध्ये

Nashik : आता सिस्टम विरोधात लढाई, शशिकांत शिंदेंचा हल्लाबोल
4

Nashik : आता सिस्टम विरोधात लढाई, शशिकांत शिंदेंचा हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.