Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Boat Accident : पत्नी गर्भवती, ४ वर्षांचं मूल; मुंबई बोट दुर्घटनेत केळशीकर कुटुंबाचा आधार हरपला

मुंबईतील गेट वे ऑफ इंडियानजिक काल सायंकाळी मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला. तर दोघं जण अद्यापही बेपत्ता असून त्यात एका लहान मुलाचा समावेश आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Dec 19, 2024 | 06:15 PM
पत्नी गर्भवती, ४ वर्षांचं मूल; मुंबई बोट दुर्घटनेत केळशीकर कुटुंबाचा आधार हरपला

पत्नी गर्भवती, ४ वर्षांचं मूल; मुंबई बोट दुर्घटनेत केळशीकर कुटुंबाचा आधार हरपला

Follow Us
Close
Follow Us:

मुंबईतील गेट वे ऑफ इंडियानजिक काल सायंकाळी मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला. तर दोघं जण अद्यापही बेपत्ता असून त्यात एका लहान मुलाचा समावेश आहे. नेव्हीच्या अधिकाऱ्यांसह तीन कर्मचाऱ्याचांही मृत्यू झाला आहे. यात नेव्हीच्या मॅकेनिकल इंजिनीअरचा देखील समावेश आहे. तरुण नेव्हीमधील मॅकेलिकल इंजिनीअरच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मंगेश केळशीकर असं त्याचं नाव असून ते बदलापूचे रहिवाशी आहेत. त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी आणि चार वर्षांचा मुलगा आहे. मंगेश यांची पत्नी तीन महिन्यांची गर्भवती आहे. त्यामुळे अशा अडचणीच्या प्रसंगी केळशीकर कुटुंबांचा आधार हरपला आहे.

Mumbai Boat Accident Video : ‘नीलकमल’ला नेव्हीच्या बोटीची धडक कशी बसली; थरारक Video आला समोर, एकदा बघाच नक्की काय घडलं

नेव्हीत मेकॅनिकल इंजिनियर म्हणून कार्यरत होते. कुटुंबात मंगेश हेच एकमेव कमावते होते. त्यांच्या जाण्यानं केळशीकर कुटुंबाचा आधार हरपला आहे. शासनाने तसेच सामाजिक संस्थांनी केळशीकर कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात द्यावा, असं आवाहन स्थानिक रहिवाशांनी केलं आहे. मंगेश केळशीकर यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

मंगेळ खूप मनमिळाऊ स्वभवाचा मुलगा होता. त्याचं वय देखील जास्त नव्हतं. मंगेश यांच्या मागे 4 वर्षांचं बाळ आहे. पत्नी तीन महिन्याची गरोदर आहे. त्यामुळे त्याचा असा अकाली मृत्यू फार वेदनादायी आहे. मंगेशच्या पत्नीच्या मागे कोणीच करता माणूस नाही. तिला सासरे नाहीत. तिला वडील नाहीत. ती एकटी पडली आहे. तिला आता मदतीची नितांत गरज आहे, अशा भावना व्यक्त होत आहेत.

Mumbai Elephanta Boat Accident: समुद्रात बोट उलटली; उपमुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये; यंत्रणांना दिले ‘हे’ निर्देश

मुंबईच्या अरबी समुद्रात नेमकं काय घडलं?

मुंबईच्या समुद्रात काल बुधवारी मोठी दुर्घटना घडली. प्रवासी बोटीला स्पीड बोटीने अचानक धडक दिली. त्यामुळे बोट समुद्रात उलटली.  या बोटीत १०० पेक्षाअधिक प्रवासी होते. मतदकार्य पोहोचेपर्यंत अनेक प्रवासी बुडाले. नेव्हीने हेलीकॉप्टर आणि बोटींच्या मदतीने सर्वांना बाहेर काढलं मात्र तोपर्यंत खूप वेळ झाला होता. यात १३ प्रवाशांना प्राण गमवावे लागले. तर   दिलेल्या धडकेत आतापर्यंत १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण बेपत्ता असल्याचं सांगितलं जात आहे.

मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत

मृतांमध्ये १३ प्रवासी आणि ३ नेव्ही कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आणखी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत देण्याचं आश्वासन दिलं आहे. मात्र या दुर्घटनेमुळे कोणी अनाथ झालं तर कोणाच्या कुटुंबाचा आधार हरपला आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Badlapur navy mechanical engineer died in mumbai boat accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2024 | 05:06 PM

Topics:  

  • Mumbai accident

संबंधित बातम्या

Mumbai Accident : मुंबईतील गोवंडीत डंपरने तिघांना चिरडलं; घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर दुर्घटना
1

Mumbai Accident : मुंबईतील गोवंडीत डंपरने तिघांना चिरडलं; घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर दुर्घटना

Mumbai Accident: ट्रक आणि ती समोरासमोर, चाक डोक्यावरून गेले अन्….काळीज पिळवटणारा अपघात
2

Mumbai Accident: ट्रक आणि ती समोरासमोर, चाक डोक्यावरून गेले अन्….काळीज पिळवटणारा अपघात

हायड्राक्रेनच्या धडकेने वयोवृद्ध महिलेचा मृत्यू; मुंबईतील धक्कादायक घटना
3

हायड्राक्रेनच्या धडकेने वयोवृद्ध महिलेचा मृत्यू; मुंबईतील धक्कादायक घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.