Bandra Terminus Mega Block for 75 Days: प्रवाशांनो लक्ष द्या! वांद्रे टर्मिनसवर ७५ दिवसांचा मेगाब्लॉक; १ डिसेंबरपासून मोठे बदल

पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनसवरील फलाट क्रमांक ५ च्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीसाठी १ डिसेंबर ते १३ फेब्रुवारीदरम्यान ७५ दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामामुळे अनेक मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या थांब्यांमध्ये तसेच सुटण्याच्या स्थानकांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
Bandra Terminus
Bandra Terminus (सौजन्य- सोशलमीडिया)
Published on: 
Updated on: 
  1. वांद्रे टर्मिनसच्या फलाट क्रमांक ५ वर ७५ दिवस दुरुस्तीचे काम.

  2. अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या स्थानकांमध्ये बदल; काही गाड्या बोरिवली आणि दादरहून धावणार.

  3. १ डिसेंबर ते १३ फेब्रुवारीदरम्यान चार उपनगरीय लोकल रद्द.

पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनस येथील फलाट क्र. 5 वरील दुरुस्ती आणि पुन्हा बांधकामासाठी 1 डिसेंबर ते 13 फेब्रुवारी या काळात 75 दिवसांचा मोठा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामामुळे अनेक मेल / एक्स्प्रेस गाड्यांच्या स्थानकांमध्ये बदल करण्यात आलाय. तसेच 4 उपनगरीय लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या. प्रवासाला निघण्याआधी ही यादी एकदा नक्की बघा, नाहीतर ऐनवेळी गोंधळ होईल.

• वांद्रेऐवजी दादरहून सुटणाऱ्या गाड्या'

1. भुज - वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेस - 30 नोव्हेंबर ते 12 फेब्रुवारी दरम्यान ही गाडी वांद्रेऐवजी दादर स्थानकावरच थांबेल. तिथेच तिचा प्रवास संपेल.

2. वांद्रे टर्मिनस - भुज एक्स्प्रेस - ही गाडी वांद्रेऐवजी दादरहून संध्याकाळी 5:40 वाजता सुटेल.म्हणजे भुजला जायचं असेल तर आता तुम्हाला दादरला जावं लागणार आहे, वांद्रेला जाऊन उपयोग नाही.

Bandra Terminus
Mumbai Local Train Viral Video : गर्दीने भरलेल्या लोकलमध्ये आजींचा भन्नाट जुगाड ! डब्यात खुर्ची ठेवून आरामात बसल्या, व्हिडिओ व्हायरल

• दादरऐवजी वांद्रे टर्मिनसवरून धावणाऱ्या गाड्या

काही गाड्या ज्या आधी दादरपर्यंत यायच्या, त्या आता वांद्रे टर्मिनस पर्यंतच येणार आहेत.

1. अजमेर - दादर एक्स्प्रेस - ही गाडी दादर ऐवजी वांद्रे टर्मिनस पर्यंतच धावेल व तिथूनच दुपारी 2:55 वाजता सुटेल.

2. श्री गंगानगर - दादर एक्स्प्रेस - ही पण गाडी वांद्रे टर्मिनसपर्यंतच येईल व दुपारी 2:55 वाजता परतीच्या प्रवासाला निघेल.

3. भगत की कोठी - दादर एक्स्प्रेस - ही गाडी पण वांद्रे टर्मिनसपर्यंतच चालवली जाईल व दुपारी 2:55 वाजता सुटेल.

• बोरिवलीला थांबणाऱ्या गाड्या

1. येणाऱ्या गाड्या - भुज (22904), उधना (19056), मडगाव (10116), जयपूर (19723) आणि दौराई (19625) येथून वांद्रे टर्मिनसकडे येणाऱ्या गाड्या ब्लॉकच्या काळात बोरिवली स्थानकावरच संपतील. त्या पुढे वांद्रेला जाणार नाहीत.

2. जाणाऱ्या गाड्या - परतीच्या प्रवासात उधना (सकाळी 9:40), मडगाव (सकाळी 7:25), जयपूर (सकाळी 9:25) आणि दौराई (सकाळी 9:25) या एक्स्प्रेस गाड्या वांद्रे टर्मिनसऐवजी बोरिवली स्थानकावरून सुटतील.

Bandra Terminus
मुंबईकरांचा प्रवास होणार सुखकर! पश्चिम रेल्वेवर ४ नवे प्लॅटफॉर्म अन् ३०-४० अतिरिक्त लोकल; गर्दीच्या त्रासातून सुटका

• 1 डिसेंबर ते 13 फेब्रुवारी दरम्यान रद्द राहणाऱ्या लोकल

1.चर्चगेट - बोरिवली फास्ट लोकल (दुपारी 2:50)

2. बोरिवली - चर्चगेट स्लो लोकल (दुपारी 3:40)

3. चर्चगेट - बोरिवली एसी फास्ट लोकल (सायंकाळी 5:28)

4. बोरिवली - चर्चगेट एसी फास्ट लोकल (सायंकाळी 6:24)त्यामुळे रोज प्रवास करणाऱ्यांनी वेळेचं थोडं नियोजन करूनच घराबाहेर पडा.