• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Bjp Politics Amit Satam Appointed As Mumbai Bjp City President Replacing Ashish Shelar

BJP Politics: भाजपची तिरपी चाल…;आशिष शेलारांना हटवून अमित साटम यांच्याकडे मुंबई शहर अध्यक्षपदाची सुत्रे

विशेष म्हणजे आशिष शेलार यांनी स्वत:हून  अमित साटम यांच्या मुंबई अध्यक्षपदाच्या नियुक्तीचे ट्विट केले आहे. राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसाठी भाजपने  हे मोठे पाऊल उचलले असावे, असे बोलले जात आहे. 

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 25, 2025 | 11:08 AM
BJP Politics: Amit Satam appointed as Mumbai BJP city president, replacing Ashish Shelar

BJP Politics: आशिष शेलारांना हटवून अमित साटम यांची मुंबई भाजप शहर अध्यक्षपदी नियुक्ती

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Amit Satam appointed as Mumbai BJP city president :  भाजपच्या गोटातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. भाजपने मुंबईत  मोठा खांदेपालट केला आहे.  मुंबई भाजपचे शहर अध्यक्षपदावरून आशिष शेलार यांना हटवून अमित साटम यांच्याकडे मुंबईच्या अध्यक्षपदाची सुत्रे सोपवण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत अमित साटम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

विशेष म्हणजे आशिष शेलार यांनी स्वत:हून  अमित साटम यांच्या मुंबई अध्यक्षपदाच्या नियुक्तीचे ट्विट केले आहे. राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसाठी भाजपने  हे मोठे पाऊल उचलले असावे, असे बोलले जात आहे.

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर पुन्हा राजकारण तापले, मनोज जरांगेना गिरीश महाजनांचा मोला

“कोकणाशी नाळ जोडलेले आणि पक्के मुंबईकर असलेले आमचे मित्र आणि तरुण तडफदार आमदार अमित साटम यांची मुंबई भाजपा अध्यक्ष पदी आज नियुक्ती झाली, त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन !! नागरी चळवळीतून आलेल्या आणि संघर्ष आणि सेवा हाच ज्याचा ध्यास आहे अशा पक्षनिष्ठ कार्यकर्त्याला या पदावर काम करण्याची संधी पक्षाने दिली आहे. माझ्या त्यांना मनापासून शुभेच्छा !!” असे ट्विट करत आशिष शेलार यांनी अमित साटम यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

तसेच, “मला तीन टर्म म्हणजे एकूण नऊ वर्षे मुंबईकरांची सेवा करण्याची संधी ही पक्षाने दिली. या कालखंडात पक्षाचे नेते पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकारी आणि तमाम मुंबईकर यांनी मला खूप प्रेम दिले. सहकार्य केले, लढण्यासाठी ऊर्जा दिली, नवी ओळख दिली आणि जगण्याची एक दिशा दिली. त्यामुळे मी सर्वांचे मनापासून आभार मानतो !”  अशा भावनाही आशिष शेलार यांनी व्यक्त केल्या आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून अमित साटम मुंबई पश्चिम उपनगरात नगरसेवक आणि आमदार म्हणून काम केलं आहे. गेल्या तीन टर्मपासून ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले आहेत. मुंबईतील प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे. अमित साटम यांनी विधानसबा आणि प्रत्येक व्यासपीठावर भाजपची बाजू आक्रमकपणे मांडली आहे. अमित साटम यांच्या कामाची दखल घेत भाजपने त्यांच्या खांद्यावर मुंबईच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सोपवला आहे.

Ganesh Chaturthi 2025: गणपती बाप्पाला तुळस का अर्पण करत नाही? काय आहे यामागील पौराणिक कारण

कोण आहेत अमित साटम?

अमित साटम हे भाजपचे आमदार असून २०१४ पासून ते सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते मुंबईतील अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. अमित साटम यांचा जन्म 15 ऑगस्ट 1976 रोजी मुंबईत झाला. साटम यांनी 1998 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या मिठीबाई कॉलेज ऑफ आर्ट्समधून राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयात बॅचलर ऑफ आर्ट्स ची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी महात्मा गांधी मिशन्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, आणि 2000 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (कार्मिक) ची पदवी घेतली, पदवी मिळवली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रीया

अमित साटम यांच्या नियुक्तीवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आजपर्यंत आशिष शेलार यांनी मुंबई विभागाचे अध्यक्षपद समर्थपणे सांभाळले. २०१७ च्या निवडणुका असो आताच्या निवडणुका असोत. आशिष शेलारांनी उत्तम काम केलं. मंगलप्रभात लोढा यांनीही उत्तम कार्यभार सांभाळला. आशिष शेलार यांच्याकडे पुन्हा जबाबदारी आली. विधानसभेतही चांगले यश मिळाले. मुंबईतील पहिल्या क्रमांकांचा पक्ष म्हणून त्यांनी सिद्ध करून दाखवलं.

फडणवीस म्हणाले, भाजपच्या नव्या संघटनात्मक रचनेत अमित साटम यांच्यावर मोठा भार सोपवण्यात आला आहे. तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले, नगरसेवक म्हणून कार्य केलेले आणि प्रदीर्घ राजकीय कार्यकाळ असलेले साटम यांनी संघटनात्मक जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत. अभ्यासू आणि आक्रमक अशी त्यांची प्रतिमा आहे. मुंबईच्या राजकारणाची जाण आणि कल्पकता त्यांच्याकडे आहे. येत्या काळात त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप मुंबईत घोडदौड राखेल. महायुतीची सत्ता पुन्हा मुंबईत येईल, असा मला विश्वास आहे. सर्व संघटनात्मक जबाबदाऱ्या ते उत्तमरीत्या पार पाडतील. त्यांच्यामागे सर्व ज्येष्ठ नेत्यांचा पाठिंबा आहे. अमित साटम यांना मनःपूर्वक शुभेच्छा,” असेही फडणवीस म्हणाले.

Web Title: Bjp politics amit satam appointed as mumbai bjp city president replacing ashish shelar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2025 | 10:44 AM

Topics:  

  • Ashish Shelar
  • BJP
  • BMC Elections

संबंधित बातम्या

Jayant Patil: “भाजपची अवस्था ‘पिंजरा’मधील मास्तरासारखी”; जयंत पाटील यांची जहरी टीका, एमआयएम-काँग्रेस युतीवरून भाजपला झाडले
1

Jayant Patil: “भाजपची अवस्था ‘पिंजरा’मधील मास्तरासारखी”; जयंत पाटील यांची जहरी टीका, एमआयएम-काँग्रेस युतीवरून भाजपला झाडले

Uddhav Thackeray on BJP: ‘अरे आमची पोरं कशाला पळवता…’, नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली, फडणवीसांवर घणाघाती हल्ला
2

Uddhav Thackeray on BJP: ‘अरे आमची पोरं कशाला पळवता…’, नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली, फडणवीसांवर घणाघाती हल्ला

Navi Mumbai Election : “आमची लढाई “नाईक जनता पार्टी” विरोधात” ; नरेश म्हस्केंचा गणेश नाईकांवर हल्लाबोल
3

Navi Mumbai Election : “आमची लढाई “नाईक जनता पार्टी” विरोधात” ; नरेश म्हस्केंचा गणेश नाईकांवर हल्लाबोल

BJP अन् RPI च्या उमेदवारांचा गृहभेटीवर भर; भाजपला मतदान करण्याचे केले आवाहन
4

BJP अन् RPI च्या उमेदवारांचा गृहभेटीवर भर; भाजपला मतदान करण्याचे केले आवाहन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीच्या दिवशी शिवलिंगावर अर्पण करा या गोष्टी, जीवनात येईल सुख समृद्धी

Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीच्या दिवशी शिवलिंगावर अर्पण करा या गोष्टी, जीवनात येईल सुख समृद्धी

Jan 10, 2026 | 10:51 AM
Bihar Crime: मायेचं नातं रक्ताने माखलं! आईने विषारी गहू खाऊ घालून दोन चिमुकल्यांना मारलं, बिहार येथील घटना

Bihar Crime: मायेचं नातं रक्ताने माखलं! आईने विषारी गहू खाऊ घालून दोन चिमुकल्यांना मारलं, बिहार येथील घटना

Jan 10, 2026 | 10:49 AM
नेताजीनगर, बोराडेनगर भागाचा कायापालट करणार; प्रशांत जगताप यांचा विश्वास

नेताजीनगर, बोराडेनगर भागाचा कायापालट करणार; प्रशांत जगताप यांचा विश्वास

Jan 10, 2026 | 10:47 AM
Thane Municpal News: माझ्या नवऱ्याने यांच्या बायका पळवून नेल्या काय? मीनाक्षी शिंदेंची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल

Thane Municpal News: माझ्या नवऱ्याने यांच्या बायका पळवून नेल्या काय? मीनाक्षी शिंदेंची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल

Jan 10, 2026 | 10:41 AM
शेअर बाजारात हाहाःकार! 5 दिवसात 13 लाख कोटी रूपये स्वाहा, का आली भयानक अवस्था?

शेअर बाजारात हाहाःकार! 5 दिवसात 13 लाख कोटी रूपये स्वाहा, का आली भयानक अवस्था?

Jan 10, 2026 | 10:32 AM
Amazon Sale 2026: शॉपिंगचा उत्सव येतोय! कंपनीने जाहीर केली तारीख, स्मार्टफोनपासून फॅशनपर्यंत… सेलमध्ये मिळणार या सुपरहिट डील्स

Amazon Sale 2026: शॉपिंगचा उत्सव येतोय! कंपनीने जाहीर केली तारीख, स्मार्टफोनपासून फॅशनपर्यंत… सेलमध्ये मिळणार या सुपरहिट डील्स

Jan 10, 2026 | 10:28 AM
Raj Thackeray on Mahayuti: १५०० रुपये १५ दिवसांत संपतात..; राज ठाकरेंची लाडकी महिलांना योजनेवर टिका

Raj Thackeray on Mahayuti: १५०० रुपये १५ दिवसांत संपतात..; राज ठाकरेंची लाडकी महिलांना योजनेवर टिका

Jan 10, 2026 | 10:21 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Meghna Bordikar On Supriya Sule :  लाडकी बहीण योजनेवरून मेघना बोर्डीकरांची सुप्रिया सुळेंवर टीका

Meghna Bordikar On Supriya Sule : लाडकी बहीण योजनेवरून मेघना बोर्डीकरांची सुप्रिया सुळेंवर टीका

Jan 09, 2026 | 08:07 PM
Kalyan :  KDMC पॅनल 17 मध्ये कुणाल पाटील यांची प्रचारात आघाडी

Kalyan : KDMC पॅनल 17 मध्ये कुणाल पाटील यांची प्रचारात आघाडी

Jan 09, 2026 | 07:48 PM
Latur Election : काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी अजित पवार गटाला पुन्हा डिवचलं

Latur Election : काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी अजित पवार गटाला पुन्हा डिवचलं

Jan 09, 2026 | 07:11 PM
Chiplun News : 8 महिने हेलपाटे; तरी ठेव परत नाही; पोफळी पतसंस्थेवर सभासदांचा संताप

Chiplun News : 8 महिने हेलपाटे; तरी ठेव परत नाही; पोफळी पतसंस्थेवर सभासदांचा संताप

Jan 09, 2026 | 06:20 PM
Kolhapur News : ‘आप’ आणि शाहू आघाडीच्या उमेदवारांकडून मतदारांना स्टॅम्पवर शपथपत्र

Kolhapur News : ‘आप’ आणि शाहू आघाडीच्या उमेदवारांकडून मतदारांना स्टॅम्पवर शपथपत्र

Jan 09, 2026 | 06:17 PM
Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Jan 08, 2026 | 07:22 PM
Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Jan 08, 2026 | 07:08 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.