मुंबई महापालिकेचा कारभार होणार डिजिटल! 'ई-ऑफिस' प्रणाली लागू; १४ हजार कर्मचाऱ्यांचा टप्प्याटप्प्याने समावेश
वरळी येथील ‘कमांड अँड कंट्रोल सेंटर’मध्ये आयोजित पालिका विभागांच्या मासिक आढावा बैठकीत ‘ई-ऑफिस’च्या पूर्वतयारीचा आणि अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त डॉ. विपिन शर्मा, अभिजीत बांगर, डॉ. अविनाश ढाकणे यांच्यासह
सहआयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त व खातेप्रमुख उपस्थित होते.
‘ई-ऑफिस’च्या सुरळीत वापरासाठी पालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत नोडल अधिकाऱ्यांसाठी ‘प्रशिक्षकांचे प्रशिक्षण’ आयोजित केले जाणार आहे. तसेच प्रत्यक्ष कामकाजादरम्यान येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी ‘केंद्रीकृत हेल्पडेस्क’ सुरू करण्यात येत आहे.
Success has many fathers…; मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती यांची ‘ती’ पोस्ट चर्चेत
कागदी कारभाराला चाप, फाईल्सचा मागोवा घेणे सुलभ
राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने विकसित केलेल्या या प्रणालीमुळे पालिकेतील पारंपरिक कागदी फाईल्सचा वापर थांबणार आहे. या प्रणालीत इलेक्ट्रॉनिक फाईल्स तयार करणे, त्या संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवणे, आवक-जावक पत्रव्यवहाराची नोंद ठेवणे आणि त्यावर डिजिटल स्वाक्षरीने मंजुरी देणे शक्य होणार आहे. यामुळे एखादी फाईल नेमकी कोणत्या टेबलावर आणि किती काळापासून प्रलंबित आहे, याचा मागोवा घेणे वरिष्ठांना थेट शक्य होईल. परिणामी, निर्णयप्रक्रियेतील विलंब टळून प्रशासकीय उत्तरदायित्व निश्चित करता येईल.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)






