नवरात्रीच्या भंडाऱ्यात 13 वर्षाचा मुलगा जेवण करायला गेला होता. त्यावेळी बाजूला असलेले नाल्याचे झाकण उघडे होते. त्याचवेळी नजरचुकीमुळे अपघात झाला आणि हा मुगला नाल्यात पडला.
नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ कामाने जसा वेग घेतला, तसं विविध प्रकल्प विमानतळाच्या आसपासच्या परीसरात उभारण्यास सुरुवात झाली आहे. भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजणाऱ्या पुढील २० वर्षांचे या परिसराचे नियोजन केले आहे.
वाहतूक कोंडी प्रवाशांसाठी आणि स्थानिकांसाठी देखील डोकेदुखी ठरत आहे. गेले कित्येक दिवस या वाहतूक कोंडीच्या त्रासाला कंटाळलेल्या स्थानिकांना आणि प्रवाशांना आता यातून दिलासा मिळणार असल्याचं दिसून येत आहे.
पर्यावरणाच्या संरक्षणासाठी गणेशोत्सवाच्या काळात कृत्रिम तलाव पालिकेच्या वतीने उभारण्यात आलेली होती. मात्र आता हीच कृत्रिम तलावं नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे.
पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत सुरू असलेल्या अभय योजनेला पनवेलकरांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 500 कोटींपेक्षा जास्त मालमत्ता कर वसुली झाली आहेे.
महापालिका क्षेत्रात असलेल्या 37 अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांशी संवाद साधून या इमारती तातडीने रिक्त कराव्यात, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.
ठाणे महापालिकेच्या पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्थेअंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये गणेश मूर्तींच्या विसर्जनाला भाविकांनी याही वर्षी चांगला प्रतिसाद दिला आहे.
महापालिकेची पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना फसली असल्याचं दिसून येत आहे. शहरात लाखो रुपयांत कृत्रिम विसर्जन तलाव उभारले गेले; मात्र भाविकांनी त्याकडे पाठ फिरवली असल्याचं दिसत आहे.
घोडबंदर रोड येथील वाहतूक कोंडीची समस्या आता वाढती डोकेदुखी ठरत आहे. याचपार्श्वभूमीवर परिसरातील रस्ता रुंदीकरणा प्रकल्प हाती घेण्यात येत होता, मात्र या रुंदीकरणास स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध दर्शविला आहे.