Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्यमंत्री तुमच्या शब्दाचा तरी मान ठेवतात का ? असे विचारत लता मंगेशकरांच्या स्मारकासाठी राम कदमांचे शरद पवारांना पत्र

लता मंगेशकर यांच्या स्मारकासाठी (Memorial Of Lata Mangeshkar) भाजपचे आमदार राम कदम (Ram Kadam Wrote A letter To Sharad pawar) यांनी शरद पवार यांना पत्र पाठवले आहे

  • By साधना
Updated On: Feb 08, 2022 | 05:16 PM
sharad pawar and ram kadam

sharad pawar and ram kadam

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: लता मंगेशकर यांच्या स्मारकासाठी (Memorial Of Lata Mangeshkar) भाजपचे आमदार राम कदम (Ram Kadam Wrote A letter To Sharad pawar)  यांनी मुख्यमंत्र्याना पत्र लिहिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे  (Sharad Pawar) सर्वेसर्वा शरद पवार यांनाही पत्र पाठवले आहे. या पत्रात शिवाजी पार्कमध्येच लतादीदींचे स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी राम कदम यांनी केली.

[read_also content=”50% जागांवर सरकारी कॉलेजप्रमाणेच फी; खासगी वैद्यकीय महाविद्यालय, डिम्ड विद्यापीठासाठी नवे नियम https://www.navarashtra.com/latest-news/fees-similar-to-government-colleges-in-50-of-seats-new-rules-for-private-medical-college-deemed-university-nrvk-234694.html”]

शरद पवार यांना पत्र पाठवत आग्रह
राम कदम यांच्या पत्राला मुख्यमंत्री कार्यालयाकडून कोणतेही उत्तर देण्यात आले नसल्याने आता राम कदम यांनी शरद पवार यांना पत्र पाठवत आग्रह केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, शरद पवारजी तुम्ही महाराष्ट्र सरकारला लतादीदींचे अंत्यसंस्कार झाले त्याठिकाणी त्यांचे स्मारक उभारायला सांगाल का ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकार किमान शरद पवार यांच्या बोलण्याचा मान तरी ठेवतात का, हे पाहू, असे नमूद करत राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांवर दबावतंत्राचा वापर केल्याचे मानले जात आहे.

स्मारकाचे राजकारण करु नका
दरम्यान शिवाजी पार्कवर लता मंगेशकर यांचे स्मारक उभारण्यात यावे, या भाजप आमदार राम कदम यांच्या मागणीला शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देताना लतादीदींच्या स्मारकाचे राजकारण करु नका, असा इशारा भाजपला दिला होता. लता मंगेशकर यांचे स्मारक उभारणे ही इतकी सोपी बाब नव्हे. लतादीदी आपल्या देशाच्या आहेत आणि जगाच्याही आहेत. त्यामुळे जागतिक स्तरावर नोंद घेतली जाईल, अशाप्रकारचे लतादीदींच्या आठवणींना उजाळा देणारे स्मारक महाराष्ट्रात नक्की उभारले जाईल. महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार नक्की त्याचा विचार करेल. असे संजय राऊत यांनी म्हटले होते.

राजकीय पक्षांमध्ये मतभेद
मात्र वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यानी शिवाजी पार्क मध्ये स्मारक उभारण्यास विरोध केला आहे. हे खेळाचे मैदान आहे आणि ते एकमेव मोठे मैदान आहे त्यामुळे स्मारक अन्यत्र केले जावे,असे आंबेडकर यांनी म्हटले आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदिप देशपांडे यांनी देखील व्टिट करत शिवाजी पार्कऐवजी लता मंगेशकरांचे स्मारक अन्यत्रच हवे असे म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की शिवाजी पार्क हे खेळाचे मैदान आहे आणि ते दादरच्या जनतेच्या संघर्षामुळे टीकून राहिले आहे. त्यांनी म्हटले आहे की राजकीय खेळीसाठी मैदानाचा बळी नको. मात्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यानी मात्र शिवाजी पार्क येथेच लताजींचे स्मारक हवे असल्याचे समर्थन केले आहे.

Web Title: Bp leader ram kadam wrote a letter to sharad pawar demanding memorial of lata mangeshkar on shivaji park nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2022 | 05:15 PM

Topics:  

  • Lata Mangeshkar
  • Ram Kadam

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis News: ‘मुंबई महापालिकेत पापाची हंडी आम्ही फोडली’;फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं
1

Devendra Fadnavis News: ‘मुंबई महापालिकेत पापाची हंडी आम्ही फोडली’;फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं

पहलगाम हल्ल्यानंतर जावेद अख्तर यांची प्रतिक्रिया, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर आणि फवाद खानविषयी केलं महत्वाचं विधान
2

पहलगाम हल्ल्यानंतर जावेद अख्तर यांची प्रतिक्रिया, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर आणि फवाद खानविषयी केलं महत्वाचं विधान

Dinvishesh : लता मंगेशकर दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित; जाणून घ्या 04 एप्रिलचा इतिहास
3

Dinvishesh : लता मंगेशकर दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित; जाणून घ्या 04 एप्रिलचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.