
याबाबत उच्च न्यायालयात 11 नोव्हेंबर 2014 आणि 10 मार्च 2017 रोजी जनहित याचिका दाखल केली – होती. त्या जनहित याचिकेनुसार न्यायालयाने मुंबईसह राज्यातील सर्व रेल्वे स्थानकांत आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरु करण्याच्या सुचना -केल्या होत्या, त्यानुसार रेल्वे प्रशासनाने स्थानकात – आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारण्यास सुरुवात केली. मार्गावरील 36 स्थानकांपैकी 18 स्थानकात आपत्कालीन वैद्यकीय कक्ष कार्यरत आहे. मध्य रेल्वे मार्गावरुन दररोज 39 तर पश्चिम रेल्वे मार्गावरुन 30 लाख प्रवासी प्रवास करतात.
उपनगरी स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय सेवा विस्तारण्यात मध्य रेल्वेचा मुंबई विभाग अपयशी ठरत आहे. सध्या घाटकोपर, भायखळा, कल्याण आणि वाशी या चार स्थानकांवर कार्यरत आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उपलब्ध आहे. ही सेवा अधिक स्थानकांवर सुरू करण्याचे सातत्याने प्रयत्न होत असूनही इच्छुक खासगी भागीदारांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आपत्कालीन वैद्यकीय कक्षांचा विस्तार रखडलेला आहे. 24 मार्च 2025 रोजी 15 स्थानकांसाठी काढलेली निविदा 23 एप्रिल रोजी उघडली गेली, मात्र एकही अर्ज मिळाला नाही.
Ans: रेल्वे अपघात, पडणे किंवा अचानक तब्येत बिघडल्यास प्रवाशांना तातडीची वैद्यकीय मदत मिळावी यासाठी मध्य रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू करण्यात येत आहेत.सध्या किती स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू आहेत?
Ans: मध्य रेल्वेच्या एकूण 36 स्थानकांपैकी 18 स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष कार्यरत किंवा प्रक्रियेत आहेत.
Ans: इ-लिलाव प्रक्रिया पूर्ण झालेल्या 10 स्थानकांमध्ये कांजूरमार्ग आणि इगतपूरी या स्थानकांचा समावेश आहे. सध्या घाटकोपर, भायखळा, कल्याण आणि वाशी या चार स्थानकांवर वैद्यकीय कक्ष प्रत्यक्ष कार्यरत आहेत.