फोटो सौजन्य सोशल मिडिया
Shivaji Park CJP Protest : काल दिल्लीसह मुंबईत निवडणुक अधिकारी ज्ञानेश कुमार यांच्या राजिनाम्यासाठी सीजेपीचं आंदोलन पाहायला मिळाले; कालच्या आंदोलनात आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. मुंबईत झालेल्या आँगस्ट क्रांती मैदानाजवळ अनेक आंदोलकांची धरपकड करण्यात आली.यात बॅालिवूड अभिनेता इम्रान खान आणि महात्मा गांधीचे पंतू तुषार गांधी देखील सहभागी झाले होते.आंदोलना दरम्यान यांना ताब्यात घेण्यात आले.त्यावेळेस वातावरण चिघळल्याचे पाहण्यास मिळाले.
आज पुन्हा कॅाक्रोच जनता पार्टीचे (CJP) मुंबईत आंदोलन होणार आहे. हे आंदोलन आज दुपारी 04 वाजता करण्यात येणार असून हे आंदोलन दादर येथिल शिवाजी पार्क येथे होणार आहे. यासाठी पोलीसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आला आहे. आज शिवाजी पार्कवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा प्रतीकात्मक निरोप समारंभ साजरा केला जाईल अशी माहिती आहे.
आज शिवाजी पार्क येथे कॅाक्रोच जनता पार्टीचे(CJP) आंदोलन होणार असून, पोलीसांनी आता कठोर भूमिका घेतली आहे, शिवाजी पार्कात मोठ मोठ्या पिंजरा गाड्या आणण्यात आल्या आहेत. गेल्या 02 आॅक्टोंबर ला शिवाजी पार्कात आंदोलन करण्यात आले होते.
तेव्हा आंदोलकांसाठी पोलीस बंदोबस्त केला होता. कालजशी आंदोलकांची धरपकड झाली तशी परिस्थिती आज सुद्धा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत.
निवडणुक अधिकारी ज्ञानेश कुमार यांच्या राजिनाम्यासाठी ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत, काल दिल्ली मध्ये आंदोलन तापल्याचे पाहण्यास मिळाले. या वेळेस शिवाजी पार्कात सुद्धा आंदोलन होणार आहे. दादर शिवाजी पार्क येथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून निवडणुक अधिकारी ज्ञानेश कुमार यांना प्रतिकात्मक निरोप देण्यात येणार आहे.






