Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पालिका अतिक्रमणाचा शोध आता सेटलाईटद्वारे घेणार! बेकायदा बांधकामे ओळखण्यासाठी नवीन प्रयोग

मुंबईतील १९६० पूर्वीची सर्व बांधकामे अधिकृत मानली जातात. त्यामुळे पालिकेने १९६० पासूनच्या उपग्रहीय छायाचित्रांचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र एवढी जुनी छायाचित्र मिळणे शक्‍य नसल्याचे निविदा स्पर्धेत सहभागी झालेल्या कंपन्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे पालिकेने १९९० पासूनच्या छायाचित्रांचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. १९९० ते २०२० पर्यंतच्या मुंबईची उपग्रहीय छायाचित्र मिळवण्यात येतील. या छायाचित्रांमधील बदल शोधण्यासाठी एंटरप्राईझ जीआयएस सिस्टीम तयार करण्यात येणार आहे.

  • By Navarashtra News Network
Updated On: Nov 15, 2021 | 05:17 PM
पालिका अतिक्रमणाचा शोध आता सेटलाईटद्वारे घेणार! बेकायदा बांधकामे ओळखण्यासाठी नवीन प्रयोग
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – गेल्या काही वर्षांत मुंबईत अतिक्रमण वाढली असून बेकायदा बांधकामे, अतिक्रमण याचा शोध उपग्रहावरुन घेण्याचा निर्णय घेतला आहे. १९९० ते २०२० पर्यंतच्या सेटलाईटवरुन घेतलेल्या छायाचित्रांचा अभ्यास करण्यात येणार असून या कामासाठी मुंबई महापालिका ११ कोटी २० लाख रुपये खर्च करणार आहे. दरम्यान, उपग्रहाद्वारे छायाचित्रे घेत अतिक्रमण व बेकायदा बांधकामे ओळखण्यासाठी हा नवीन प्रयोग करण्यात येणार आहे.

मुंबईत जागा मिळेल तिकडे अनधिकृत बांधकामे होत असून मुंबईला अतिक्रमणाचा विळखा बसला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने २०१८ मध्ये पालिकेला मुंबईतील अतिक्रमणावर अंकुश ठेवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पालिकेने मुंबई शहरांचे ३६० अंशात सर्वेक्षण केले आहे. तर, आता जुनी उपग्रहीय छायाचित्र बनवून त्यानुसार अतिक्रमण ठरविण्यात येणार आहे. यासाठी महानगर पालिकेने निविदा मागवल्या असून यासाठी तज्ञ कंपनीची नियुक्ती करुन हे काम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या स्थायी समितीच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

मुंबईतील १९६० पूर्वीची सर्व बांधकामे अधिकृत मानली जातात. त्यामुळे पालिकेने १९६० पासूनच्या उपग्रहीय छायाचित्रांचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र एवढी जुनी छायाचित्र मिळणे शक्‍य नसल्याचे निविदा स्पर्धेत सहभागी झालेल्या कंपन्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे पालिकेने १९९० पासूनच्या छायाचित्रांचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला.

कसे होणार काम!

१९९० ते २०२० पर्यंतच्या मुंबईची उपग्रहीय छायाचित्र मिळवण्यात येतील. या छायाचित्रांमधील बदल शोधण्यासाठी एंटरप्राईझ जीआयएस सिस्टीम तयार करण्यात येणार आहे. पालिकेकडे उपलब्ध असलेल्या माहितीसह नवी माहिती एकत्रीत करुन अनधिकृत बेकायदा बांधकामे ओळखणे,अतिक्रमण ठरविण्यात येणार.

नोंदवलेल्या बदलांच्या तपासणीचे विश्‍लेषण करण्यासाठी पालिका सॉफ्टवेअरची खरेदी करणार आहे. या खरेदीसाठी मदत करण्याची जबाबदारी संबंधीत कंत्राटदाराची असणार आहे.

Web Title: Corporation will now detect encroachment through satellite new experiments to identify illegal constructions nrkk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2021 | 05:17 PM

Topics:  

  • Illegal Constructions

संबंधित बातम्या

अंमलबजावणी संचालनालयाची मुंबईत मोठी कारवाई; 12 ठिकाणी छापेमारी, सर्वत्र एकच खळबळ…
1

अंमलबजावणी संचालनालयाची मुंबईत मोठी कारवाई; 12 ठिकाणी छापेमारी, सर्वत्र एकच खळबळ…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.