Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता याला काय म्हणावं? जिवंत होण्याच्या आशेने मृतदेह तब्बल 4 वर्षे फ्रीजरमध्ये; दरमहा 1.60 लाखही दिले

कुरार गावात कोकणीपाडा परिसरातील एका डे-केअर सेंटरमध्ये हा मृतदेह ठेवलेला होता. परिसरात दुर्गंधी पसरल्यानंतर लोकांनी पोलिसांना माहिती दिली आणि हा प्रकार उघडकीस आला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 01, 2026 | 03:23 PM
आता याला काय म्हणावं? जिवंत होण्याच्या आशेने मृतदेह तब्बल 4 वर्षे फ्रीजरमध्ये; दरमहा 1.60 लाखही दिले

आता याला काय म्हणावं? जिवंत होण्याच्या आशेने मृतदेह तब्बल 4 वर्षे फ्रीजरमध्ये; दरमहा 1.60 लाखही दिले

Follow Us
Follow Us:

मुंबई : भविष्यात कधी तरी विज्ञानाच्या मदतीने मृत व्यक्तीला पुन्हा जिवंत करता येईल, या आशेने एका कुटुंबाने 78 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह 4 वर्षे फ्रीजरमध्ये जपून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार मालाड परिसरात समोर आला आहे. कुरार गावात कोकणीपाडा परिसरातील एका डे-केअर सेंटरमध्ये हा मृतदेह ठेवलेला होता. परिसरात दुर्गंधी पसरल्यानंतर लोकांनी पोलिसांना माहिती दिली आणि हा प्रकार उघडकीस आला. मृतदेह जतनासाठी कुटुंबाकडून दरमहा १.६० लाख रुपये दिले जात असल्याची माहिती आहे.

संबंधित व्यक्तीचा कॅन्सरच्या आजाराने ९ जून २०२२ रोजी मृत्यू झाला होता. मृताची मुलगी अमेरिकेत राहते. वडिलांशी तिचे भावनिक नाते होते. अमेरिकेत क्रायोनिक्स तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मृतदेह अतिशय कमी तापमानात जतन केला जातो. भविष्यात विज्ञानाच्या प्रगतीमुळे अशा व्यक्तीला पुन्हा जिवंत करता येईल, अशी या कुटुंबाची धारणा होती. यातूनच मृतदेह जतन करण्यासाठी कुटुंबाने मालाडमधील डे-केअर सेंटरची मदत घेतली.

अमेरिकेत तंत्रज्ञानाची नेटवर शोधली माहिती

पोलिसांनी मृताच्या मुलीची चौकशी केली असता, वडिलांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. शक्य तितका काळ आम्हाला पार्थिव जतन करून ठेवायचे होते. त्यासाठी इंटरनेटवर माहिती शोधली आणि अमेरिकेतील क्रायोनिक्स तंत्रज्ञानाची माहिती मिळाली, असे तिने सांगितले.

बीएमसीचे 3 महिने आधी सेंटरला सील

मुंबई महापालिकेच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधित डे-केअर सेंटर बीएमसीने 3 महिन्यांपूर्वी सील केले होते. तेव्हा येथे फ्रीजरमध्ये मृतदेह ठेवल्याचे अधिकाऱ्यांना कसे लक्षात आले नाही, असा प्रश्न पडला आहे.

तज्ज्ञ डॉक्टरही चक्रावून गेले

कुटुंबीयांनी पोलिसांकडे मृत्यू प्रमाणपत्र आणि बीएमसी दिलेली कागदपत्रे दिली आहेत. मृतदेहाची स्थिती तपासण्यासाठी कूपर रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेतली जात असून, हा प्रकार पाहून डॉक्टरही चक्रावून गेले आहेत.

असा कायदा आहे काय, तपासणी सुरू

मृतदेह अशा पद्धतीने जतन करणे भारतात कायदेशीर आहे का, कागदपत्रांच्या पडताळणीनंतर या प्रकरणात पुढील कारवाई केली याचाही तपास पोलीस करत आहेत. वैद्यकीय तपासणी आणि जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Maharashtra Drought 2026 : शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; कर्जवसुली स्थगित, बँकांना 30 एप्रिल 2027 पर्यंतची मुदत

Web Title: Dead body kept in freezer for four years in hope of coming back to life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 03:23 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.