2028 ते 2030 पर्यंत महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवणार - फडणवीस
मुंबई: “आज हरयाणा जे घडलं तेच येत्या नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रातही पाहायला मिळणार आहे. गेल्या निवडणुकीत हरयाणात भाजपला 40 जागा मिळाल्या होत्या. लोकसभेत 10 पैका पाच जागा मिळाल्या. पण या निवडणुकात भाजपने थेट 50 जागांचा मिळवल्या. जवळपास 60 वर्षांनंतर पहिल्यांदाच एक पक्ष तिसऱ्यांदा हरयाणात सत्तेत येणार आहे.” अशी प्रतिक्रीया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली आहे.
हरयाणा आणि जम्मू-कश्मीर विधानसभा निवडणुकांचे आज निकाल जाहीर झाले. हरयाणात भाजपने 50 जागांवर आघाडी मिळवत दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर महाराष्ट्रातही मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवरही चांगलाच निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “लोकसभेच्या निवडणुकीनंतर मी म्हणालो होतो की, आम्हाला हरवण्याची ताकद कुठल्याच विरोधी पक्षात नव्हती. आम्ही विरोधी पक्षाकडून हरलो नाही, अपप्रचार या चौथ्या पक्षाने आम्हाला हरवलं. अपप्रचारामुळेच लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा कमी झाल्या.
हेही वाचा: “हा विजय मूर्खांच्या नंदनवनात…”; हरयाणातील विजयावर देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना डिवचलं
फडणवीस म्हणाले, “आता आपण महाराष्ट्र आणि देशभरात फेक नरेटीव्हला थेट नरेटीव्हने उत्तर द्यायच, असं ठरवलं आहे. याची पहिली कसोटी हरयाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये होती. हरयाणाच्या निकालावर महाविकास आघाडीचे नेते काल रात्रीपासून स्क्रिप्ट लिहीत होते. सकाळी 9 वाजताचा भोंगा हा रात्रीपासून तयारी करून बसला होता. आता काय काय बोलू आणि काय नको असे त्याला वाटत होते. आता मला त्यांना विचारायच आहे की आता कस वाटतंय?” असा खोचक सवालही देवेंद्र फडणवीसांनी खासदार संजय राऊत यांना विचारला.
जनतेशी बेईमानी करून निवडून आलेल्या लोकांना जनता आता त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार आहे. जे हरयाणामध्ये घडल तेच नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात पाहायला मिळणार आहे.आजचा हरयाणाचा विजय हा भाजपचा आणि कार्यकर्त्यांचा विश्वास वाढवणार विजय आहे. तर हा विजय मूर्खांच्या नंदनवनात वावरणाऱ्यांना जमिनीवर आणणारा विजय आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
हेही वाचा:‘तुम्ही तिथे बसलात हे तर आमचचं पाप..’; मुंबईच्या सभेत उद्धव ठाकरेंची तुफान फटकेबाजी