गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपच्या नेत्यांमध्ये एकमेकांच्या नेत्यांचे गुन्हे जगताशी असलेले लागेबांधे, व्यवहार आणि हितसंबंध यावरून चिखलफेक सुरू आहे. त्यात अहमहिका लागल्यासारखे मुख्यमंत्रीपदावर राहिलेल्या नेत्यांकडूनही आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. राज्यातील सर्वसामान्य जनतेचे जगण्याचे खरे प्रश्न यात बाजुला पडले असून राजकारणाचे गुन्हेगारीकरण हा स्व गोपीनाथ मुंडे यांच्या काळातील भाजपच्या राजकीय अजेंड्यावरील विषय सध्याच्या भाजपसह सा-याच राजकीय पक्षांनी किती कसा आणि केंव्हा आत्मसात केला असावा याचे दिशादर्शन होत राहते.
तेलगी बनावट स्टँम्प घोटाळ्याच्या प्रकरणात मंत्रालयात दलालांची फळी कशी कार्यरत असते याचे सर्वात प्रथम जाहीर वर्णन मुद्रीत माध्यमातून प्रकाशित झाले होते. त्या काळात अंतिम तोतला या नावाच्या दलालाबाबतची माहिती देखील प्रसिध्द झाली होती. आणि सत्ता कुणाही पक्षाची येवो मंत्रालयात आनि उच्च सत्ता वर्तुळाभोवती माध्यमे, प्रशासकीय अधिकारी आणि दलालांच्या त्याच त्या लोकांची वहिवाट सुरू असते आणि तेच ख-या अर्थाने या लोकशाही यंत्रणामध्ये पडद्यामागे मोठ्या दिग्दशर्नाचे काम अव्यक्तपणे करत असतात हेच अंतिम सत्य असल्याचे एका लेखात म्हटले होते. बाहेर सामान्य लोकांसाठी देश धर्म नितीमत्ता प्रशासन सत्ता आणि न्याय या सोज्वळ शब्दांमागे भेसूरपणे अशी अनियंत्रीत सत्ताकेंद्रे काम करत असतील अशी सूतराम कल्पना ऐरवी येवू नये अशी ही व्यवस्था आहे. असो
या ठिकाणी हे सारे ‘जात्यावरची ओवी’ म्हणतात तसे आठवण्या मागचे कारण गोपीनाथ मुंडे यांचे जुने सहकारी राहिलेल्या भाजपचे आमदार अमित साटम यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या काही नेत्यानी १९९३च्या दंगलीनंतर एन एन व्होरा कमिटीच्या अहवालातील शिफारशी उघड करून त्यावर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. या अहवालात गुन्हे जगत आणि राजकीय नेत्याच्या सबंधावर झगझगीत प्रकाश टाकण्यात आला आहे. देशाची आर्थिक राजधानी म्हटल्या जाणा-या मुंबईवर डॉनच्या समांतर यंत्रणाची कशी पकड असते आणि ते देखिल या अर्थकारणाच्या आडोश्याने त्यांचे गुन्हे जगताचे व्यवहार राजकीय नेत्यांच्या आशिर्वादाने चालवत असताता याचे सिनेमँटीक वाटावे असे वर्णन या अहवालातून समोर येण्याची शक्यता आहे.
काय म्हटले आहे या एन एन व्होरा समितीच्या अहवालात? त्याबाबत थोडी माहिती या निमित्ताने घेण्याचा प्रयत्न करूया. सर्वोच्च न्यायालयात एक वकील अश्विनीकुमार उपाध्याय यानी रिट पिटीशन दाखल केली आहे की १९९३च्या एनएन व्होरा अहवालानुसार कारवाई करण्यात यावी. १९९३च्या मुंबईस्फोटानंतर राजकारणी प्रशासकीय अधिकारी आणि गुन्हेगारी जगताच्या संबधाबाबत या अहवालात अनेक खुलासे करण्यात आले आहेत. याचिकाकर्त्यानी न्यायालयाला विनंती केली होती की या अहवालाती निष्कर्ष जाहीर करावे, आणि मुंबईत गुन्हेगारांच्या कारवायात सामिल असलेल्या नेते, अधिका-यांची नावे उघड करावी.
याचिकाकर्ते यांचे मत होते की, मुंबईच्या दंग्या मागच्या सा-या तपासातील तथ्य नागरीक म्हणून जाणून घेण्याचा भारतीयांचा अधिकार आहे. ऍड उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयात हे देखील नमूद केले होते की संसदेत या जो शंभर पानी अहवालाचा मसुदा १९९५मध्ये पटलावर ठेवण्यात आला तो अपूर्ण आहे. यातील केवळ अकरा पाने जनतेच्या माहितीसाठी देण्यात आली आणि अन्य अहवालातील माहिती दडवून ठेवण्यात आली. याचिकाकर्त्येने न्यायालयात हे देखील सांगितले की या अहवालात सांगण्यात आलेल्या कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना नंतरच्या काळात अंमलात आणण्यात आल्या नाहीत. याचिकाकर्त्याने याचिकेच्या प्रेअरमध्ये म्हटले होते की या अहवालाच्या सत्यप्रति आणि त्यावर केंद्रीय तपास यंत्रणानी केलेल्या कार्यवाहीच्या संपूर्ण माहितीसह प्रत उपलब्ध करून द्यावी.
बाबरी मशीद पडल्यांनतर जाने १९९३मध्ये मुंबईत झालेल्या दंगलीनंतर त्या काळातील पंतप्रधान पीव्ही नरसिंहराव यांच्या सरकारने केंद्रीय गृहसचिव एनएन व्होरा यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली. या समितीने राजकारणी, प्रशासकीय अधिका-यांचे गुन्हे जगाताशी असेलेले संबंध शोधण्याचा प्रयत्न केला. या समितीमध्ये केंद्रीय गुप्तचर संस्था रॉचे प्रतिनीधी होते. तसेच सीबीआय, आयबीचे अधिकारी होते. या समितीने अहवालात नमूद केले की, १९९३च्या बॉम्बस्फोटांच्या वेळी मुंबईत गुन्हेगारी जगताचे समांतर सरकार कार्यरत होते. ९ जुलै १९९३ रोजी हा अहवाल केंद्रीय मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात आला. ज्यात १९९३ च्या मुंबई स्फोटांबाबत अनेक रहस्यांचा उलगडा करण्यात आला होता.
गुन्हेगारी जगाताचे अनभिषिक्त प्रमुख समजले जाणा-या दाऊद इब्राहिम, इकबाल मिरची यांच्यासोबत गुजरात आणि महाराष्ट्रातील तत्कालीन सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्याचे लागेबांधे, हितसंबंध होते. यावर अहवालात सविस्तर माहिती देण्यात आली होती. त्यानंतर १ऑगस्ट १९९५ रोजी हा अहवाल केवळ मर्यादीत अकरा पानांच्या माहितीसह संसदेच्या पटलावर ठेवण्यात आला. मात्र हे त्यानंतर बाहेर आले की मूळ अहवालात श़ंभर पाने होती. असे असलेतरी जी अकरा पाने समोर आली त्यातून गुन्हे जगातील इक्बाल मिरची याचे नाव देशासमोर आले.
व्होरा समितीच्या अहवालात त्याच्याबद्दल नमूद करण्यात आले होते की, “मुंबईचा इक्बाल मिरची हा ८०च्या दशकात मुंबईत येणारा प्रवासी होता. मालवाहू जहाजांसोबत येवून तो सिगरेट आणि लिकर (दारू) चा व्यापार करून नफा कमावत होता. मागील काही वर्षापासून मिरची याने रियल इस्टेटच्या व्यवसायातही कोट्यावधीची माया कमावली आहे. त्याची अनेक बँकात खाती आहेत आणि लाखोचा व्यवहार त्यातून तो करत आहे.” “मिरची याचा व्यवसाय जोमात येण्यामागचे महत्वाचे कारण असे की, संबंधीत व्यापार आणि व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणांनी वेळेवर कधीही त्याच्या गैरव्यवहारांची चौकशी केली नाही आणि कारवाई टाळली. त्यामुळे त्याचे अनिर्बंध साम्राज्य तयार झाले आणि ते सरकारी यंत्रणेच्या आवाक्याबाहेर गेले. जर मिरची याची सखोल चोकशी झाली तर त्याच्या आडून ज्यांनी अनिर्बंध फायदे मिळवले त्यांच्या हितसंबंधाचा शोध घेतला जावू शकतो”. आधार:(पृष्ट ३ १९९३ एन एन व्होरा समिती)
त्यानंतर तत्कालीन विरोधीपक्षातील नेत्यानी संसदेत सरकारवर दबाव वाढवला आणि व्होरा समितीच्या अहवालातील दडवलेल्या माहितीचा जाब विचारण्यास सुरूवात केली. राज्यसभा सदस्य दिनेश त्रिवेदी यानी गृहमंत्र्याना थेट सवाल केला की हा अहवाल उघड केल्यास गुन्हेगारांना मदत करणा-या राजकीय नेत्याची नावे समोर आल्याने सरकार अडचणीत येईल यासाठीच हा अहवाल दडविण्यात आला आहे काय? त्यानंतर त्रिवेदी यानी देखील सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली मात्र त्यांना त्यात यश आले नाही. त्यामुळे कथित सरकारी यंत्रणा, राजकीय नेते सिने जगतातील अभिनेते आणि पाकिस्तानातील आयएसआय – यांच्यातील हितसंबंधातून सामाजिक तणाव कसा निर्माण झाला याची माहिती गुलदस्त्यात राहिली.
१९९३च्या व्होरा समितीच्या अहवालात नमूद करण्यात आले होते की, काही माफियांनी अंमली पदार्थांचा व्यापार सुरू केला होता. तसेच त्यांनी शस्त्रास्त्रांची तस्करी सुरू केली होती. त्यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ आणि दहशतवादाचे नेटवर्क देशात उभारण्यात आले होते. एन एन व्होरा समितीने निरिक्षण नोंदविले होते की, निवडणूक लढविणा-या नेत्यांचे मुल्यांकन त्यांच्या या उद्योगातील हितसंबंधाच्या आधारे केले जावू लागले होते. मुंबईतील बॉम्बस्फोटांच्या घटना आणि त्याचवेळी गुजरातच्या सुरत आणि अहमदाबाद येथील सामाजिक हिंसाचाराच्या घटना यातून पाकिस्तानच्या आयएसआयच्या मार्फत देशात सामाजिक तणाव निर्माण करण्यासाठी समाजकंटकाना समर्थन दिले जात आहे. “ मुंबई स्फोटांच्या तपासात वेळोवेळी ही गोष्ट ठळकपणे समोर आली की, गुन्हे जगताशी सरकारी यंत्रणांच्या अधिकारी, राजकीय नेते, व्यापारी, व्यावसाईक आणि सिने जगतातील लोकांचे घनिष्ठ संबंध आहेत.” असे अहवालात नमूद करण्यात आले होते.
एन एन व्होरा समितीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे की, दाऊद इब्राहिम आणि त्याच्या संबंधीत टोळीच्या लोकांचे व्यवहार मेमन बंधू आणि अन्य हितसंबंधी लोकांसोबत अनेक वर्षापासून सुरू होते. त्यांच्यात एक प्रस्थापित नेटवर्क तयार झाले होते. हे सारे त्यांना सरकारी यंत्रणातून कुणाचे संरक्षण मिळाल्याशिवाय शक्य नव्हते. त्यातही सिमाशुल्क, आयकर आणि पोलीस किंवा तत्सम.” गुप्तचर यंत्रणाच्या सहकार्याने व्होरा समितीने काही राजकीय नेते अधिकारी यांचे नामोल्लेखही या अहवालात केल्याचे सांगण्यात येत आहे. १९७० पासून १९९३ पर्यंत दाऊद आणि मिरची याना ज्यानी वेळोवेळी आश्रय किंवा संरक्षण दिले. काही तत्कालिन गुप्तचर विभागाच्या निवृत्त अधिका-याना आशा आहे की मोदी सरकार या व्होरा समितीच्या अप्रकाशित शंभर पानी अहवालातील सत्य जाहीर करेल. याचे कारण केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यानी अलिकडेच असे वक्तव्य केले होते की, माजी नागरी उड्डयण मंत्री प्रफुल्ल पटेल यांचे कथित स्वरूपात इक्बाल मिरची याची पत्नी हाजरा मेमन यांच्यासोबत आर्थिक व्यवहार होते.
या मध्ये गुप्तचरांच्या हवाल्याने व्होरा समितीने महाराष्ट्र आणि गुजरातमधील अनेक तत्कालिन आणि सध्याच्या नेत्यांचे गुन्हेगारी जगताशी असलेले कथित संबंध स्पष्ट केले होते. मागील वर्षी सक्तवसुली संचलनालयाने युपीए सरकारच्या काळातील मंत्री प्रफुल्ल पटेल आणि इक्बाल मेमन यांच्यातील व्यवहारांबाबत चौकशी सुरू केली होती. त्यानंतर इल्बाल मिरची ऊर्फ इक्बाल मेमन यांच्या काही मालमत्ता ताब्यात घेण्याची कारवाई ईडीमार्फत सुरू करण्यात आली होती.
या कारवाई संदर्भात माजी मंत्री प्रफुल्ल पटेल आणि त्यांच्या पत्नी वर्षा पटेल यांची देखील चौकशी करण्यात आली होती. मिरची यांच्या कुटूंबियांच्या भारतातील आणि विदेशातील ज्या मालमत्तांवर कारवाई करण्यात आली त्यात मुंबईतील ऍनी बेझंट मार्ग वरळी येथील १५ मजल्यांची इमारत ‘सिजे हाऊस’ ची बांधणी भागीदारी कराराने मिरची आणि मेसर्स मिलेनियम डेवलपर्स प्रा लि. यानी २० ०६ -०७ मध्ये केल्याचे तसेच इमारतीचे चार मजले विकासकाने मिरची कुटूंबियाना दिल्याचे स्पष्ट झाले होते. माजी मंत्री पटेल आणि त्यांच्या पत्नीचे समभाग या मिलेनियम डेवल्पर्स प्रा लि मध्ये होते. यामध्ये हे देखिल उल्लेखनीय म्हणावे लागेल की पटेल यांच्या कुटूबियाच्या सिजे ग्रुप मार्फत देशात तंबाखू उत्पादानांचा मोठ्या प्रमाणात व्यापार केला जात होता. येत्या काळात २०२४च्या निवडणुकांपूर्वी कधीतरी या सा-या व्होरा समिती मधील सांगाड्यांचा शोध घेतला जाईल आणि नामीगिरामी नेते आणि त्यांच्या पूर्वायुष्यातील माहितीचा गौप्यस्फोट केला जाईल अशी सध्याच्या वादंगाची दिशा असल्याचे दिसत आहे त्या निमित्ताने सध्या इतकेच!
[read_also content=”लग्नानंतर पहिल्यांदाच नव्या नवरीला घरी एकटं सोडून रात्रपाळीला गेला होता नवरा; एका रात्रीत होत्याचं नव्हत झाल https://www.navarashtra.com/thane/excitement-in-virar-on-ain-diwali-the-body-of-the-newlyweds-was-found-naked-nrvk-199463.html”]
[read_also content=”पुण्यात खळबळ! लग्नाच्या दहा दिवस आधीच पोलिस कर्मचारी असलेल्या महिलेची आत्महत्या; मोबाईलमध्ये सापडला मोठा पुरावा https://www.navarashtra.com/latest-news/the-suicide-of-a-woman-who-was-a-police-officer-ten-days-before-the-wedding-in-pune-large-evidence-found-in-mobile-nrvk-199496.html”]
[read_also content=”जन्मदात्या आईनेच आपल्या दोन मुलांना जमिनीवरुन आपटून आपटून मारले; मुलं मेल्याची खात्री करण्यासाठी असं काही केलं की पोलिसही हादरले- पाहा व्हिडिओ https://www.navarashtra.com/latest-news/in-delhi-a-mother-killed-her-children-nrvk-198840.html”]
[read_also content=”मुंबईतील मच्छी बाजारांमध्ये ही वस्तु आता अजीबात पहायला मिळणार नाही; BMC ने घेतलाय मोठा निर्णय https://www.navarashtra.com/latest-news/boxes-of-thermocol-will-be-banished-from-the-fish-market-the-corporation-will-buy-plastic-containers-nrvk-197723.html”]
[read_also content=”काय म्हणायचं या बाईला? ना लाज, ना लज्जा… पटवला स्वत:पेक्षा 15 वर्षाने लहान बॉयफ्रेंड! महिन्याला तब्बल 11 लाख पगार देऊन त्याच्याकडून करुन घ्यायची नको ती कामं https://www.navarashtra.com/latest-news/rich-woman-pays-rs-11-lakh-a-month-to-boyfriend-15-years-younger-than-her-to-do-housework-nrvk-192294.html”]
[read_also content=”टेंन्शन कमी होत डोकंही राहतं शांत; शिव्या देण्याचे आहेत जबरदस्त फायदे https://www.navarashtra.com/latest-news/tension-decreases-head-stays-calm-swearing-has-tremendous-benefits-185488.html”]
[read_also content=”भारतीयांनी काढले चीनचे दिवाळे! चिनी वस्तूंवर बहिष्कार; 50 हजार कोटींचा फटका https://www.navarashtra.com/latest-news/indians-take-out-chinese-bust-boycott-on-chinese-goods-a-blow-of-rs-50000-crore-nrvk-197764.html”]
[read_also content=”‘याच’ रिक्षातून तरुणीला बलात्कार ठिकाणी घेऊन जायचे आणि… डोंबिवलीतील सामूहिक बलात्कार प्रकरणात 33 जणांचा समावेश https://www.navarashtra.com/latest-news/33-people-involved-in-gang-rape-case-in-dombivali-nrvk-185412.html”]
[read_also content=”काय म्हणायचं या बाईला? कुत्र्याशी SEX केला? न्यायालयात खटला सुरु https://www.navarashtra.com/latest-news/woman-accused-of-sexually-abusing-dog-nrvk-177537.html”]
[read_also content=”आई-वडिल बेडवर झोपायचे आणि भाऊ-बहिण खाली जमिनीवर; रोज रात्री बहिण असं काही करायची की… मुलीचा निर्लज्जपणा पाहून पोलिसही हादरले https://www.navarashtra.com/latest-news/in-mumbai-a-sister-raped-her-brother-nrvk-172906.html”]
[read_also content=”एकत्रित काम करा अन्यथा… शिवसेनेचा राष्ट्रवादी, काँग्रेसला इशारा https://www.navarashtra.com/latest-news/work-together-otherwise-shiv-senas-warning-to-ncp-congress-nrvk-185790.html”]
[read_also content=”अनिल देशमुखांवर धक्कादायक आरोप; अहवाल लीक करण्यासाठी CBI अधिकाऱ्याला ‘iPhone 12 Pro’ची लाच दिल्याचा दावा https://whttps://www.navarashtra.com/latest-news/shocking-allegations-against-anil-deshmukh-claims-to-have-bribed-a-cbi-official-with-iphone-12-pro-to-leak-the-report-nrvk-177642/ww.navarashtra.com/pune-news-marathi/land-scam-worth-rs-200-crore-in-pune-signature-of-chandrakant-patil-and-other-ministry-officials-on-the-fake-order-nrvk-177639.html”]
[read_also content=”खून करणाऱ्यांना फाशी तर चोरी करणाऱ्यांचे अवयव कापले जातात; सगळ्यात डेंजर आहेत ताबिवानी कायदे https://www.navarashtra.com/latest-news/murderers-are-hanged-and-thieves-are-mutilated-the-most-dangerous-are-the-tabiwani-laws-nrvk-170103.html”]
[read_also content=”तालिबान किती श्रीमंत? अफू लागवडीसह आणखी काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत https://www.navarashtra.com/latest-news/how-rich-is-the-taliban-what-else-is-the-source-of-income-along-with-poppy-cultivation-170106.html”]
[read_also content=”‘या’ मंदिरात गेल्यावर होतो मृत्यू; संशोधक व वैज्ञानिक मृत्युच्या भितीने इथे जात नाही https://www.navarashtra.com/latest-news/pluto-is-the-ancient-temple-of-god-in-turkey-if-anyone-enters-this-temple-he-is-killed-nrvk-164606.html”]
[read_also content=”सायन्स फॅक्ट; कच्चे सॅलड खाल्ल्याने अनेक आजारांना निमंत्रण https://www.navarashtra.com/latest-news/science-fact-eating-raw-salads-invites-many-ailments-nrvk-164609.html”]
[read_also content=”किराणा दुकानातही मिळणार वाईन; पवारांची ईच्छा उद्धव ठाकरे करणार पूर्ण https://www.navarashtra.com/latest-news/wine-will-also-be-available-at-grocery-stores-uddhav-thackeray-will-fulfill-pawars-wish-nrvk-164211.html
[read_also content=”विकृताने अचानक अनोखळी महिलेला घट्ट मिठी मारली अन्… गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार https://www.navarashtra.com/latest-news/the-pervert-suddenly-hugged-a-strange-woman-and-shocking-type-at-the-crowded-dadar-railway-station-nrvk-163725.html”]