Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Assembly Polls Dates Announcement Live: महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जाहीर; ‘या’ दिवशी होणार मतदान, प्रत्येक अपटेड एका क्लिकवर

Maharashtra, Jharkhand Assembly Elections 2024 dates LIVE Updates: केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या पत्रकानुसार नवी दिल्लीतील विज्ञान भवनातमहाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्याच्या निवडणुका जाहीर केल्या जाणार आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 24, 2024 | 11:37 AM
Assembly Polls Dates Announcement Live: महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जाहीर; ‘या’  दिवशी होणार मतदान, प्रत्येक अपटेड एका क्लिकवर
Follow Us
Close
Follow Us:

EC Assembly Elections Poll Date Annoucemnt LIVE  : केंद्रीय निवडणूक आयोगकडून आज  महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीची आज घोषणा केली जाणार आहे. आज दुपारी 3.30 वाजता निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर कऱणार आहे.  येत्या 26 नोव्हेंबर ला विधानसभेची मुदत संपत आहे. त्यामुळे त्यापूर्वीच निवडणुका घेणे बंधणकारक असल्याने आजच या निवडणुकाची घोषणा होऊ शकते, असे सांगितले जात आहे.  केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या पत्रकानुसार नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आज दुपारी साडेतीन वाजता महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्याच्या निवडणूका जाहीर केल्या जाणार आहेत. महाराष्ट्रातील बहुप्रतिक्षित निवडणुकीत सत्ताधारी महायुती (भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी) आणि विरोधी महाविकास आघाडी (काँग्रेस, शिवसेना यूबीटी आणि राष्ट्रवादी-एसपी) या दोन प्रमुख आघाड्यांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील या निवडणुकांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

The liveblog has ended.
  • 15 Oct 2024 04:08 PM (IST)

    15 Oct 2024 04:08 PM (IST)

    निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडवणीसांचे एकाच शब्दात ट्विट

    केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा करताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत प्रतिक्रीया दिली आहे. फडणवीसांनी त्यांच्या ट्विटरवर "शंखनाद...." असे लिहीत आपली प्रतिक्रीया दिली आहे.

  • 15 Oct 2024 04:05 PM (IST)

    15 Oct 2024 04:05 PM (IST)

    महाविकास आघाडीचाच विजय होणार- जयंत पाटील

    महाविकास आघाडीचाच विजय होणार. निवडणुकीची वाट बघणारा मतदार निवडणुकीत महायुतीला त्यांची जागा दाखवेल, अशी प्रतिक्रीया शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी  दिली आहे.

  • 15 Oct 2024 04:01 PM (IST)

    15 Oct 2024 04:01 PM (IST)

    महाराष्ट्रापाठोपाठ झारखंडच्याही निवडणुकांबाबत माहिती

    मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, 'झारखंडमध्ये एकूण मतदारांची संख्या 2.6 कोटी आहे, त्यापैकी 1.29 कोटी महिला आणि 1.31 कोटी पुरुष मतदार आहेत. प्रथमच मतदारांची संख्या 11.84 लाख आहे. झारखंडमध्ये 29,562 मतदान केंद्रे असतील. 24 जिल्ह्यांतील 81 विधानसभा जागांवर मतदान होणार आहे. त्यापैकी 44 जागा सर्वसाधारण प्रवर्गातील आहेत. तर, 9 जागा एससीसाठी आणि 28 जागा एसटी प्रवर्गासाठी राखीव आहेत. निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेदरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, झारखंडमध्ये एकूण 2.6 कोटी मतदार आहेत.

  • 15 Oct 2024 03:53 PM (IST)

    15 Oct 2024 03:53 PM (IST)

    महाराष्ट्रातील निवडणुकांची तारीख जाहीर

    महाराष्ट्रातील निवडणुकां एकाच टप्प्यात होणार असून  20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होतील. 29 ऑक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल कऱता येणार आहेत. महाराष्ट्रातील निवडणुकांसाठी 22 ऑक्टोबर 2024 ला अधिसूचना जारी केली जाईल.  23 ऑक्टोबर 2024  ते  29 ऑक्टोबर 2024 या  काळात अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर 30 ऑक्टोबरला अर्जांची छाननी केली जाईल.  तर 4 नोव्हेंबर 2024 रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असेल. 20 नोव्हेंबर 2024 रोजी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडेल. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर केले जातील. अशी माहिती निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे. तसेच, जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे यासाठी निवडणूक आयोगा मार्फत काही नागरिकांना घर बसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असेही सांगण्यात आले आहे.

     

     

  • 15 Oct 2024 03:50 PM (IST)

    15 Oct 2024 03:50 PM (IST)

    महाराष्ट्रात एकूण 9 कोटी 63 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार

    केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांबाबत माहिती दिली. केंद्रीय निवडणूक आयोगाचे अध्यक्ष राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली आहे, महाराष्ट्रात 9 कोटी 63 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.  यात पुरूष 4 कोटी 93  आणि महिलां 4 कोटी 60 लाख मतदारांचा समावेश असणार आहे. महाराष्ट्राती एकूण मतदारसंघ 288 मतदारसंघ आहेत.  या 288 मतदारसंघात  एकूण मतदान केंद्र 1 लाख 186 मतदानकेंद्रे असतील. यात ग्रामीण भागात  57 हजार 601 मतदान केंद्रे असतील तर  शहरात 42 हजार 582 मतदान केंद्रांचा समावेश  असेल.  राज्यात पहिल्यांदाच मतदान करणारे 18 लाख 67 नवमतदार आहेत. याशिवाय  6 लाख 2 हजार  दिव्यांग मतदार असून  12 लाख 5 हजार ज्येष्ठ नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

     

     

     

  • 15 Oct 2024 03:28 PM (IST)

    15 Oct 2024 03:28 PM (IST)

    निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीसाठी मोठे मु्द्दे

    दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे आणि नंतर अजित पवार हे हिंदुत्व आणि विकासाचा मुद्दा उपस्थित करून भाजपमध्ये आले.
    एकनाथ शिंदे यांना लोकसभेच्या 7 जागा मिळाल्याने त्यांची वाढती लोकप्रियताही महायुतीसाठी प्रभावी ठरू शकते.
    नरेंद्र मोदींचा करिष्मा, शहरी भागात भाजपची चांगली पकड आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिंदे यांना सोबत घेणे याचाही परिणाम होऊ शकतो.

    कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग, मुंबई मेट्रो, नवी मुंबई विमानतळ असे मोठे प्रकल्प दाखवून आपण विकासाच्या राजकारणाकडे वाटचाल करत असल्याचा दावा महायुती करू शकते.हिंदुत्वाचा मुद्दाही महत्त्वाचा बनला असून, मुस्लिम समाजाने ज्या पद्धतीने या योजनेला मतदान केले, त्याला 'व्होट जिहाद' म्हणत हिंदूंना एकत्र करण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे.

  • 15 Oct 2024 03:25 PM (IST)

    15 Oct 2024 03:25 PM (IST)

    महाराष्ट्रासह झारखंडच्याही निवडणुकांची घोषणा

    केंद्रीय निवडणूक  आयोग आज महाराष्ट्रासह झारखंड विधानसभेच्या निवडणुकाही जाहीर कऱण्याची शक्यता आहे. छोटा नागपूर पठारावरील जंगलांनी व्यापलेल्या झारखंडमध्ये विधानसभेच्या एकूण 81  जागांसाठी निवडणूक होणार आहे. विधानसभा निवडणुकीत पूर्ण बहुमतासह सरकार स्थापन करण्याचा जादूई आकडा 42 जागांचा आहे. गेल्या विधानसभा निवडणुकांबद्दल म्हणजे 2019 बद्दल बोलायचे तर झारखंड मुक्ती मोर्चा  30 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता. JMM नंतर, भारतीय जनता पक्षाने25 जागा जिंकल्या होत्या.

  • 15 Oct 2024 03:12 PM (IST)

    15 Oct 2024 03:12 PM (IST)

    महायुती आणि महाविकासआघाडीमध्ये सध्या कोणाकडे किती आमदार

    2019 मध्ये आघाडीतून लढलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला 54  जागा मिळाल्या होत्या. यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष तिसऱ्या स्थानावर होता. तर कॉँग्रेस ४४ जागा जिंकून चौथ्या क्रमाकांवर होती. मात्र दोन वर्षांपूर्वी राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष एकसंघ राहिले नाहीत. त्यामुळे आता महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामधील कोणत्या पक्षाकडे किती संख्याबळ आहे, ही जाणून घेऊयात.

    महायुतीमध्ये सध्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस व इतर मित्रपक्ष अशी युती आहे. तर महाविकास आघाडीकडे कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे अशी आघाडी आहे. सध्या राज्यात महायुतीचे सरकार आहे. महायुतीकडे 162 जागांचे बहुमत आहे. महाविकास आघाडीकडे 105 जागा आहेत

  • 15 Oct 2024 02:52 PM (IST)

    15 Oct 2024 02:52 PM (IST)

    निवडणूक जाहीर होण्यापूर्वी शरद पवारांचे मोठे विधान

    महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आज (15 ऑक्टोबर ) घोषणा होणार आहे. निवडणूक आयोग दुपारी पत्रकार परिषद घेऊन तारखा जाहीर करणार आहे. दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे वक्तव्य समोर आले आहे. ते म्हणाले की, माझे वय 84 वर्ष असूनही मी थांबणार नाही. इतकंच नाही तर मी ९० वर्षांचा झालो तरी असाच काम करत राहीन. महाराष्ट्राला योग्य मार्गावर आणणारच आणि त्यासाठी सदैव काम करणार असल्याचं शरद पवार यांनी एका कार्यक्रमात म्हटलं आहे.

  • 15 Oct 2024 02:48 PM (IST)

    15 Oct 2024 02:48 PM (IST)

    निवडणुका जाहीर होण्याआधी निवडणूक आयुक्तांचे मोठे विधान

    देशभरातून आतापर्यंत विरोधीपक्षांतील अनेक नेत्यांकडून ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.  ईव्हीएमवर विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी उत्तर दिले आहे. “जनता मतदानात भाग घेऊन प्रश्नांची उत्तरे देत असतात. पण  ईव्हीएम बद्दल बोलत असाल तर ईव्हीएम  ते 100 टक्के  फुल प्रुफ आहेत.” असं राजीव कुमार यांनी म्हटलं आहे.

  • 15 Oct 2024 02:38 PM (IST)

    15 Oct 2024 02:38 PM (IST)

    नवी दिल्लीतील विज्ञान भवनात होणार पत्रकार परिषद

    केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यातच महाराष्ट्राचा दौरा करत राज्यातील निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला होता. त्यानंतर  आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत 26नोव्हेंबर पूर्वी सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असेही आयोगाकडून सांगण्यात आले होते. तसेच, आचारसंहितेचा कालावधी 30  दिवसांचा असल्यामुळे कोणत्याही क्षणी निवडणुकांची घोषणा होऊ शकते. केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या पत्रकानुसार नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आज दुपारी साडेतीन वाजता महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्याच्या निवडणूका जाहीर केल्या जाणार आहेत.  दरम्यानस लोकसभा निवडणुकांनंतर राज्यात लगेचच विधानसभा निवडणुकांच्या तयारीला सुरूवात झाली होती. गेल्या काही दिवसांपासून राजकीय पक्षांचे दौरे, मेळावे, सभाही सुरू होत्या. पण आता या निवडणुकीची रणधुमाळी अधिकच तीव्र होणार आहे. निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि झारखंड राज्यांच्या निवडणुका जाहीर होतील.

Web Title: Election commission announcement on maharashtra jharkhand assembly elections poll date live updates in marathi nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2024 | 02:34 PM

Topics:  

  • Jharkhand Election

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.