Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 23 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हाफकीन महामंडळाचे माजी संचालक सुनील महिंद्रकर यांना सोडवेना ‘राजयोग’; बदली होऊनही हाफकीनमध्येच ठाण मांडून

माजी व्यवस्थापकीय संचालक सुनील महिंद्रकर यांनी हाफकीन महामंडळातील अत्यंत महत्वाची त्रिगुणी कल्चर ही राष्ट्रीय संपत्ती विकण्यासाठी पुढाकार घेतला होता. याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात विविध राजकीय नेत्यांनी आवाज उठवला होता.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 23, 2026 | 07:16 AM
हाफकीन महामंडळाचे माजी संचालक सुनील महिंद्रकर यांना सोडवेना 'राजयोग'; बदली होऊनही हाफकीनमध्येच ठाण मांडून

हाफकीन महामंडळाचे माजी संचालक सुनील महिंद्रकर यांना सोडवेना 'राजयोग'; बदली होऊनही हाफकीनमध्येच ठाण मांडून

Follow Us
Follow Us:

मुंबई / नीता परब : परळ स्थित हाफकिन महामंडळाचे वादग्रस्त व्यवस्थापकीय संचालक सुनील महिंद्रकर यांची राज्य सरकारने महिन्याभरापूर्वी बदली केली. तर हाफकीन महामंडळाचा कार्यभार रमेश चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात यावा, असा शासन निर्णय जारी करण्यात आला असताना देखील महिंद्रकर हे या ना त्या कारणाने केबिनमध्ये अथवा कार्यालयात सतत येत असतात, तर महामंडळाचे शासकीय निवासस्थान नाममात्र शुल्क भरून कुटुंबासह राहत असल्याचेही समोर आले आहे. माजी संचालकाच्या कार्यालयीन हस्तक्षेपाबाबत कर्मचाऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

माजी व्यवस्थापकीय संचालकांची महिन्याभरापूर्वीच बदली

माजी व्यवस्थापकीय संचालक सुनील महिंद्रकर यांनी हाफकीन महामंडळातील अत्यंत महत्वाची त्रिगुणी कल्चर ही राष्ट्रीय संपत्ती विकण्यासाठी पुढाकार घेतला होता. याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात विविध राजकीय नेत्यांनी आवाज उठवला होता. याशिवाय महाराष्ट्र दिनी उलटा राष्ट्रध्वज फडविल्याने वाद निर्माण झाला होता. परिणामी, त्यांची १९ मे २०२६ राजी राज्य सरकारने बदली करत हाफकीन महामंडळाचा कार्यभार रमेश चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करण्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला होता.

Pune News : कमाल ! पहिल्याच प्रयत्नात ‘एमएमसीसी’चे १२ विद्यार्थी झाले Chartered Accountant

तात्पुरत्या स्वरुपात जारी करण्यात आलेल्या या निर्णयानंतर काही दिवसातच राज्य सरकारने ९ जून २०२६ रोजी नवा शासन निर्णय काढत महिंद्रकर यांची बदली ॲडिशनल कंट्रोलर ऑफ स्टॅम्प या पदावर मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली आहे. असे असताना देखील मागील महिन्याभरापासून महिंद्रकर हे हाफकीन महामंडळाच्या कार्यालयात या-ना त्या कारणाने ठाण मांडून बसलेले असल्याचे कर्मचारी सांगतात.

महिंद्रकर यांना हाफकीनचा राजयोग सोडवेना

महिंद्रकर यांची बदली होऊन महिना उलटत आला तरीही, अद्यापही ते हाफकीनच्या शासकीय निवासस्थानात राहत असल्याचे समोर आले आहे. निवासस्थानाचे घरभाडे भत्ता ४१ हजार ५५० रुपये आहे. तर शासकीय निवासस्थानात कुटुंबासह राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना घरभाडे भत्ता मिळत नाही. परंतु महिंद्रकर हे हाफकिन महामंडळाच्या चार बीएचके १५०० स्क्वेअर फूट निवासस्थानात कोणतेही घरभाडेचे शु्ल्क न भरता राहत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

हाफकीन महामंडळाचा नियम काय?

हाफकिन महामंडळाशी निगडीत परराज्यातून येणारे पाहुणे यांना राहण्यासाठी गेस्ट हाऊस पॉलिसीनुसार प्रति दिवस ५०० रुपये आकारले जातात व पाहुण्यांना राहण्यास दिले जाते. परंतु, महिंद्रकर हे घरभाडे भत्ता न भरण्याकरीता प्रति दिवस ५०० रुपये या अनुषंगाने जुलै २०२५ पासून राहत आहेत. यानुसार महिन्याला केवळ १५ हजार रुपये भरत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. नियमानुसार, बदलीनंतर निवासस्थान रिक्त करणे गरजेचे असूनही निवासस्थानात राहत असल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

निवासस्थानासाठी हाफकीन महामंडळाच्या तिजोरीला कात्री

महिंद्रकर यांनी राजयोग निवासस्थानात स्वत:च्या सुखसोयींसाठी १३,२०,२६७ किंमतीचे खाजगी सामान खरेदी केली. ज्यामध्ये ११,४२,००० किंमतीचे जिमचे साहित्य, ट्रेडमिल, डमबेल्स सायकल, ३४,००० रुपये किंमतीचे एअर कंडीशन, ५५,००० किंमतीचे टेलिव्हिजन, ४८,९७० किंमतीचे चप्पल स्टँड, कपाट, खुर्च्या, ५०,८९५ किंमतीचे म्युझिक सिस्टिम, ५५,१२४ किंमतीचे कर्टन फॅब्रिक, १५,९३० किंमतीचे लोखंडी कपाट, १८,२०० किंमतीची आक्वाग्वार्ड वॉटर प्युरिफायर मशीन, ३,५८,८३८ किंमतीचा अॅप्पल कंपनीचा आयपॅड, ३,१०,९८९ किंमतीचे प्रिंटर मशीन, गोदरेज कंपनीचे ७०,८०९ किंमतीचे लॉकर तिजोरी, ७९,६३२ रुपये किंमतीचे वॉल पेपर,३०,३२० रुपये किंमतीचे सागाच्या लाकडाचा देवारा, उंबरठा, चौरंग, इत्यादी वस्तू महामंडळाच्या तिजोरीतून खरेदी करण्यात आल्या असल्याची माहिती माहिती अधिकारातून समोर आली आहे.

महिंद्रकर यांच्यावर कारवाईचे आदेश

महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा दादू बनसोडे यांनी २ ऑक्टोबर २०२५ रोजी तत्कालीन मुख्य सचिव राजेश कुमार मीना यांना लेखी पत्र पाठवून महिंद्रकर यांनी महामंडळाच्या निधीतून वैयक्तिक गरजेपोटी आणि निवासस्थानाच्या सुशोभिकरण्यासाठी लाखो रुपये खर्च केले, याविषयी चौकशी करण्याचे आदेश आणि वरिष्ठांच्या आदेशांचे न पालन केल्यामुळे महिंद्रकर यांच्यावर योग्य ती प्रशासकीय कारवाई करावी, असे लेखी आदेश मुख्य सचिव यांना दिले होते.

राष्ट्रीय संपत्ती त्रिगुणी कल्चर का विकत आहात? अन्न व औषध प्रशसानाचा सवाल

हाफकीन महामंडळात असलेली राष्ट्रीय संपत्ती त्रिगुणी कल्चर का विकत आहात? महामंडळ स्वत: लसीचे उत्पादन का करू शकत नाही, असे प्रश्न अन्न व औषध प्रशासनान १ जून २०२६ रोजी पत्र पाठवून व्यवस्थापनाला विचारले आहेत. या पत्राचे उत्तर देखील बदली होवूनही महिंद्रकर यांनी दिली असल्याबाबतची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सुरु आहे. बदली झाल्यानंतर जुन्या कार्यालयात हस्तक्षेप करणे योग्य आहे का? असा सवाल कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे.

सुनील महिंद्रकर यांच्याशी संपर्क नाही

याबाबत हाफकीन महामंडळाचे माजी व्यवस्थापकीय संचालक सुनील महिंद्रकर यांच्याशी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: Former haffkine corporation director sunil mahindrakar has not yet vacated his government residence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 07:11 AM

Topics:  

  • Haffkine Institute

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.